Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शुगर असणाऱ्या व्यक्तींनी रोज किती पाणी प्यायला हवे? कमी पाणी पिण्याचा शुगरचा त्रास वाढण्याशी असतो संबंध?

शुगर असणाऱ्या व्यक्तींनी रोज किती पाणी प्यायला हवे? कमी पाणी पिण्याचा शुगरचा त्रास वाढण्याशी असतो संबंध?

Diabetes: Drinking More Water Can Help Reduce Blood Sugar ब्लड शुगर कायम राहिल कंट्रोल, फक्त कधी व किती प्रमाणात पाणी पिणे हे माहित असणे गरजेचं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2023 03:23 PM2023-03-05T15:23:15+5:302023-03-05T15:24:19+5:30

Diabetes: Drinking More Water Can Help Reduce Blood Sugar ब्लड शुगर कायम राहिल कंट्रोल, फक्त कधी व किती प्रमाणात पाणी पिणे हे माहित असणे गरजेचं..

How much water should people with diabetes drink daily? Is drinking less water linked to increased risk of diabetes? | शुगर असणाऱ्या व्यक्तींनी रोज किती पाणी प्यायला हवे? कमी पाणी पिण्याचा शुगरचा त्रास वाढण्याशी असतो संबंध?

शुगर असणाऱ्या व्यक्तींनी रोज किती पाणी प्यायला हवे? कमी पाणी पिण्याचा शुगरचा त्रास वाढण्याशी असतो संबंध?

जल है तो जीवन है. आपण हे वाक्य ऐकलंच असेल. पाण्याशिवाय पृथ्वीवर जगणं कठीण आहे. स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी महत्वाचे आहे. उन्हाळ्यात पाणी प्यायलाच हवे. किडनी स्टोन असणाऱ्यांना पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून शरीरातून स्टोन लघवीद्वारे बाहेर पडते. दरम्यान, मधुमेहाच्या रुग्णांना देखील भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

ग्लोबल डायबिटीज कम्युनिटी वेबसाइटनुसार, ''पाण्यात कर्बोदके किंवा कॅलरी नसतात. यामुळेच मधुमेह असलेल्या लोकांसाठी पाणी पिणे फायदेशीर आहे. अनेक अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांना द्रवपदार्थाची जास्त गरज असते. पाणी रक्तातून अधिक ग्लुकोज बाहेर काढण्यास मदत करते''(Diabetes: Drinking More Water Can Help Reduce Blood Sugar).

पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा डिहायड्रेशनचा धोकाही वाढतो, ते टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. हायड्रेटेड राहून आपण किडनीही निरोगी ठेवू शकता.

पोटात जंत झाल्याचं सांगणारी ६ लक्षणे, पचनासह तब्येतीवर होतात गंभीर परिणाम

द यूरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटी यामधील अभ्यासानुसार, ''महिलांनी दररोज किमान १.६ लिटर पाणी प्यावे, तर पुरुषांनी दररोज किमान २ लिटर पाणी प्यावे. याशिवाय द्रवपदार्थांचा आहारात समावेश करावा, जेणेकरून शरीराला पुरेसे पाणी मिळू शकेल आणि शरीर हायड्रेट ठेवता येईल.

उन्हाळयात रोज लिंबू पाणी प्यावे का? कुणी आणि कधी - किती प्यावे?

जर आपण दररोज जास्त पाणी पिण्यास सुरुवात केली तर, हायपरग्लायसेमिया आणि मधुमेहाचा धोका टाळता येऊ शकतो. उन्हाळ्यात पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर तुम्हाला साधे पाणी प्यायचे नसेल तर आपण त्यात लिंबाचा रस मिसळून पिऊ शकता. अथवा इतर फळांचा रस मिक्स करून पिऊ शकता.''

Web Title: How much water should people with diabetes drink daily? Is drinking less water linked to increased risk of diabetes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.