Join us   

शरीरातील टॉक्सिन्स कमी करण्यासाठी तासाभरात कुणी किती प्यावं? जास्त पाणी पिणंही ठरू शकतं घातक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2024 5:36 PM

How Much Water Should You Drink Per Day? : डिटॉक्सिफिकेशनसाठी तासाभरात 'इतकं' पाणी पिणं गरजेचचं..

कमी पाणी प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशनची लक्षणे दिसू लागतात (Drinking Water). त्यामुळे पाणी पीत राहणं गरजेचं आहे. पाणी प्यायल्याने बरेच आजार दूर राहतात (Health Tips). पण जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर, डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा, रक्तदाब कमी होणे, पायांना सूज येणे, बद्धकोष्ठता, गडद रंगाची लघवी यांसारख्या समस्या निर्माण होतात.

त्याचवेळी, जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशन होते. अशा स्थितीत वारंवार लघवी होणे, शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता, उलट्या आणि मळमळ, हात-पायांचा रंग बदलणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकते. त्यामुळे तासाभरात नेमकं किती पाणी प्यावं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल(How Much Water Should You Drink Per Day?).

तासाभरात नेमकं किती पाणी प्यावं?

हार्वर्ड मेडिकल स्कूल, या वेबसाईटनुसार, आपल्या शरीराला किती पाण्याची गरज आहे, हे वय, शारीरिक हालचाल, लिंग, शरीराचे तापमान, आणि शारीरिक वजन यावर अवलंबून असते. तरीही दर तासाला आपण २ ते ३ कप पाणी प्यायला हवे. जर आपण व्यायाम करत असाल तर, याचे प्रमाण वाढूही शकते. निरोगी व्यक्तीने दिवसातून २- ३ लिटर पाणी प्यावे.

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

पुरेसं पाणी पिण्याचे फायदे

- पेशींना पोषण आणि ऑक्सिजन वितरीत करणे

- शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत

- पचनसंस्था राहते उत्तम

- बद्धकोष्ठतेचा त्रास होतो कमी

- ब्लड शुगरची पातळी राहते नियंत्रणात

- शरीराचे सामान्य तापमान राखणे

- शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित राखण्यास मदत.

लघवीचा रंग तपासा

लघवीचा रंग आरोग्याविषयी अनेक गुपिते उघड करतो. उदाहरणार्थ, लघवीच्या रंगावरून आपण पाणी जास्त पीत आहात की कमी हे कळू शकते. जर आपल्याला लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर, डिहायड्रेशनचे लक्षण असू शकते. जर वारंवार पांढऱ्या रंगाची लघवी होत असेल तर, हे ओव्हरहायड्रेशनचे लक्षण असू शकते.

वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..

ही पेय पिणे टाळा

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वेबसाईटनुसार, 'तहान भागवण्यासाठी अल्कोहोल किंवा कॅफिनयुक्त पेय पिणे टाळावे. शिवाय साखरयुक्त किंवा कार्बोनेटेड पेये पिऊ नयेत. यामुळे रक्तातील साखर तर वाढतेच शिवाय डिहायड्रेशनही होते.

टॅग्स : हेल्थ टिप्सपाणीआरोग्य