Join us   

वजन घटवण्यासाठी भरपूर म्हणजे नेमकं किती पाणी प्यायचं? पाहा कमी वेळात फिट होण्याचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 11:54 AM

How much Water to Drink for Weight Loss : वेगानं वजन कमी करायचं अससेल तर हेल्दी डाएटसह रोज व्यायाम करणं, ६ ते ८ तासांची झोप घेणं, भरपूर पाणी पिणं यांसारख्या उपायांचा समावेश करायला हवा.

हेल्थ एक्सपर्ट असो किंवा जिम ट्रेनर वजन कमी करण्यासाठी दोन कंडीशन्स समोर ठेवतात. एक म्हणजे तुम्हाला रोज व्यायाम करावा लागेल आणि दुसरं म्हणजे भरपूर पाणी प्यायला हवं. (How Drinking More Water Can Help You Lose Weight) पण काहीजणांना सतत पाणी प्यायला अजिबात आवडत नाही. त्यांना तहानही लागत नाही. अशावेळी पाणी प्यायल्यानं खरंच वजन कमी होतं का असा प्रश्न पडतो. (How much Water to Drink for Weight Loss)

पाणी प्यायल्यानं खरंच वजन कमी होतं का?

वेगानं वजन कमी करायचं असेल तर हेल्दी डाएटसह रोज व्यायाम करणं, ६ ते ८ तासांची झोप घेणं, भरपूर पाणी पिणं यांसारख्या उपायांचा समावेश करायला हवा. कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप घ्यायला हवी. भरपूर पाणी प्यावं.  रोज भरपूर पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म रेट वाढतो, भूक कमी लागते आणि शरीरातील फॅट्स आपोआप कमी होऊ लागतात.

जास्त पाणी पिण्याचे नुकसान

कोणताही पदार्थ  गरजेपेक्षा जास्त खाल्यास शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. माणसाचं शरीर ६६ टक्के पाण्यानं बनलेलं असतं. अशा स्थितीत तुम्ही जास्त पाणी प्यायलात  तर शरीरातील मीठाचं संतुलन बिघडतं. यामुळे उलट्या होणं, डोके दुखी, अशा समस्या वाढतात.

तब्येत लुकडीसुकडी पण पोट प्रचंड सुटलं? ५ पदार्थ खा, लवकरच वजनात दिसेल घट

वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यावं?

रोज २ ते २.३ लिटर पाणी प्यायची सवय ठेवा. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर व्यायाम सुरू करण्याच्या १ तास आधी पाणी प्या. याशिवाय व्यायाम करताना मध्ये मध्ये थोडं पाणी पिऊ शकता. स्वत:ला कायम हायड्रेट ठेवा. जे लोक रोज व्यायाम करतात त्यांना भरपूर घाम येतो. त्यांच्या शरीरातील पाणी बाहेर निघतं. अशा लोकांनी वर्कआऊट करताना ३५० मिलीलिटर पाणी प्यायला हवं.

रोजच्या आहारात  भरपूर पाण्याचा समावेश करा. कच्ची ब्रोकोली, गाजर, ओवा, काकडी, आलूबुखार यांचा आहारात समावेश करून तुम्ही वॉटर इन्टेक वाढवू शकता.  जेवणाच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर पाणी प्या.  जर तुम्ही जेवता जेवता पाणी प्यायलात तर जठराग्नी शांत होऊ शकते यामुळे पचनक्रिया संथ होते.  सकाळी उठल्यानंतर १ ते २ ग्लास गरम पाणी प्या नंतर चहा, कॉफी घ्या.

टॅग्स : हेल्थ टिप्सकिचन टिप्सपाणीफिटनेस टिप्स