उन्हाळ्याच्या दिवसात नेहमीपेक्षा जास्त उष्णता शरीरात तयार होते. अशावेळी जास्तीत जास्त पाणी पिण्याची आवश्यकता असते. जर पाणी योग्य प्रमाणात प्यायले गेले नाही तर डिहायड्रेशन होतं आणि शरीरात पाण्याचं प्रमाण घटतं. यामुळे त्वचेचे आजार, पचनाचे आजारही उद्भवू शकतात. (How many liters of water should you drink in summr)
तज्ज्ञांच्यामते हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसातून किमान 2 ते 2.5 लिटर पाणी प्यावे. (Tips for Staying Hydrated During the Summer Heat) उन्हाळ्यात 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. असे केल्याने तुम्ही हायड्रेटेड राहाल आणि किडनी स्टोन सारख्या समस्या टाळता येतील. (How Much Water Does Your Body Need During Summer)
जास्त वेळ पाणी कमी प्यायल्यास किडनी स्टोनसह अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत प्रत्येकाने पुरेसे पाणी प्यावे. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहिल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे तुमच्या शरीराचे तापमान राखले जाते.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत करते. योग्य हायड्रेशनमुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि स्नायूंची कार्यक्षमता वाढते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की योग्य हायड्रेशनचे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. यामुळे तुमची विचार प्रक्रिया सुधारते.
डॉक्टर अमरेंद्र पाठक सांगतात की, ''पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे, कारण ते आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवीच्या स्वरूपात बाहेर काढण्यास मदत करते. सर्व लोकांनी त्यांच्या गरजेनुसार पाणी प्यावे, परंतु जे लोक किडनी स्टोनच्या समस्येशी झुंज देत आहेत त्यांना अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून मूत्रपिंडाचा दगड लघवीद्वारे बाहेर पडण्यास मदत होईल. आहारात द्रव पदार्थांचाही समावेश करावा जेणेकरून शरीरातील द्रवपदार्थाचे प्रमाण नियंत्रित राहून आरोग्य सुधारता येईल.''