Join us   

How Often Should You Change Your BedSheets?: बेडशीट, पडदे धुवायला वेळ नाही? इन्फेक्शन वाढण्याआधी १ सोपी ट्रिक वापरा, बेडशीट झटपट स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 1:48 PM

How Often Should You Change Your BedSheets?: एकच चादर जास्त वेळ पलंगावर ठेवल्याने ऋतुमानानुसार होणारे आजार, श्वसनाचे आजार, लैंगिक आजार, निद्रानाश, त्वचेच्या समस्या, अॅलर्जी असे अनेक आजार होऊ शकतात.

बहुतेक घरांमध्ये बेडशिट अस्वच्छ दिसल्यावर बदलतात किंवा आपल्यासोयीनुसार बदलतात. तुम्हालाही ही सवय असेल तर वेळच बदलायला हवी. बेडशीट वेळेवर न बदलण्याच्या सवयीमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तज्ज्ञांच्या मते, बेडशीटच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कारण एकच चादर जास्त वेळ पलंगावर ठेवल्याने ऋतुमानानुसार होणारे आजार, श्वसनाचे आजार, लैंगिक आजार, निद्रानाश, त्वचेच्या समस्या, अॅलर्जी असे अनेक आजार होऊ शकतात. (How frequently you should change your bed sheets disadvantages of dirty bedsheet) 

बेडशीटमधील घाण आपल्याला सहज दिसू शकत नाही. अशा स्थितीत धुळीचे कण, घाम आणि शरीरातील मृत त्वचेमुळे जंतू वाढू लागतात, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. काही लोक आळशीपणामुळे बेडशीट बदलत नाहीत. जर तुम्हीही या श्रेणींमध्ये येत असाल तर तुम्ही चुकीचे करता. (How Often Should You Change Sheets) बायोहॅकर आणि मानसशास्त्रज्ञ टिम ग्रे यांनी यापूर्वी इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की संशोधनानुसार, निमोनिया आणि गोनोरियाशी संबंधित बॅक्टेरिया तुमच्या पलंगावर 7 दिवसात वाढू लागतात. यामुळेच लोकांनी आपल्या बेडशीट्स वारंवार बदलायला हव्यात.

एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 4 पैकी 1व्यक्ती 30 दिवसांतून एकदा आपले अंथरुण धुते. सेव्हिल युनिव्हर्सिटीच्या जीवशास्त्र विभागाने सूक्ष्मदर्शकाखाली 4 आठवडे जुनी बेडशीट्स पाहिली. नमुने तपासले, ज्याचा परिणाम अतिशय धोकादायक होता.  खरं तर, घाणेरड्या चादरींमध्ये बॅक्टेरॉईड्स आढळून आले, ज्याचा निमोनिया, गोनोरिया आणि अपेंडिसाइटिसशी संबंध आहे. याशिवाय फुसोबॅक्टेरिया देखील आढळून आले, जे घशात संसर्ग पसरवतात. यामुळे लेमियर सिंड्रोम आणि निसेरियालिस होऊ शकतो, ज्यामुळे गोनोरिया होऊ शकतो.

तज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने आपल्या बेडशीट आठवड्यातून एकदा धुवाव्यात. हे शक्य नसल्यास, दोन आठवड्यातून एकदा तरी चादरी धुवा. आपल्या शरीरातून दररोज ४० हजार मृत पेशी बाहेर पडतात, त्या आपल्या बेडशीटवरही पडतात. ज्यामुळे बॅक्टेरिया वाढतात, जे आपली प्रतिकारशक्ती आणि झोप खराब करतात. दर 6 महिन्यांनी जुन्या चादरी काढून नवीन बेडशीट विकत घ्याव्यात, असेही तज्ज्ञांचे मत आहे. अशा स्थितीत तुम्हीही या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि वेळेत चादर धुवून बदलत राहा.

१)

२)

टॅग्स : स्वच्छता टिप्सहेल्थ टिप्ससुंदर गृहनियोजन