Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोजच्या वापरातले अंडरगारमेंट्स कधी बदलावेत? इन्फेक्शन टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

रोजच्या वापरातले अंडरगारमेंट्स कधी बदलावेत? इन्फेक्शन टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

How Often Should You Get New Underwear : रोजच्या वापरातले अंडरगारमेंट्स कधी बदलावेत? याची एक्सपायरी डेट कधीपर्यंत असते?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 02:08 PM2023-04-23T14:08:47+5:302023-04-23T20:21:13+5:30

How Often Should You Get New Underwear : रोजच्या वापरातले अंडरगारमेंट्स कधी बदलावेत? याची एक्सपायरी डेट कधीपर्यंत असते?

How Often Should You Get New Underwear : Facts when should you replace your old underwear and why | रोजच्या वापरातले अंडरगारमेंट्स कधी बदलावेत? इन्फेक्शन टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

रोजच्या वापरातले अंडरगारमेंट्स कधी बदलावेत? इन्फेक्शन टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

जितकं लक्ष आपण आपल्या कपड्यांकडे देतो तितंकच लक्ष अंडर गारमेंट्ससकडेही द्यायला हवं.  इनरवेअर्सच्या वापराबाबत निष्काळजीपणा केल्यास गंभीर आजारही होऊ शकतात. अनेकजण एकाच अंडरवेअरचा वापर वर्षानुवर्ष करतात तर काहीजण पूर्ण फाटेपर्यंत इनरवेअर्स वापरतात. इनरवेअर्स  वेळीच बदलणं आवश्यक आहे. (Underwear facts when should you replace your old underwear and why)

जुन्या अंडरवेअरमुळे फिटिंग तर बिघडतेच, पण त्यामुळे अॅलर्जी आणि इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. एनवाययू स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर फिलिप टियरनो म्हणतात की कोणत्याही अंडरवेअरची एक्सपायरी डेट नसते. जर तुमचे इनरवेअर्स खूप सैल झाले असेल किंवा त्यात छिद्र असतील तर तुम्ही ते बदलण्यास अजिबात उशीर करू नये. (How Often Should You Get New Underwear)

तज्ज्ञांच्यामते  लूज-फिटिंग अंडरवेअर तुम्हच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. याशिवाय जास्त घट्ट अंडरवेअर देखील तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. यामुळे तुमचे लक्ष विचलित होईलच, पण प्रायव्हेट पार्टमध्ये इरिटेशन होईल. एवढेच नाही तर जुनी अंडरवेअर खराब होऊ लागते, तेव्हा त्यात ओलावा निर्माण होऊ लागतो, त्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात आणि बॅक्टेरियाच्या वाढीमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. खूप जुने आणि खराब स्थितीत असलेले अंडरवेअर घातल्याने त्वचेवर पुरळ उठण्याची शक्यता असते.

इनरवेअर्स कधी बदलावे?

तज्ज्ञांच्यामते प्रत्येकाने त्यांचे इनरवेअर्स दर 6 महिन्यांनी बदलले पाहिजे, जरी ते उत्तम स्थितीत असले तरीही. अंडरवेअरशी संबंधित आणखी एक चूक जी लोक सहसा करतात ती म्हणजे ते अनेक दिवस न धुता वापरतात. असे असताना हे कधीही करू नये. तेच अंडरवेअर जास्त वेळ न धुता वापरणे हे तुमच्या प्रायव्हेट पार्टच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे संसर्गासह अनेक समस्या उद्भवू शकतात.

Web Title: How Often Should You Get New Underwear : Facts when should you replace your old underwear and why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.