Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > How to prevent heart attack : हिवाळ्याच्या दिवसात वाढतो हार्ट अटॅकचा धोका; जीवघेण्या अटॅकपासून बचावाचे उपाय, कारणं जाणून घ्या

How to prevent heart attack : हिवाळ्याच्या दिवसात वाढतो हार्ट अटॅकचा धोका; जीवघेण्या अटॅकपासून बचावाचे उपाय, कारणं जाणून घ्या

How to prevent heart attack : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळा हा सर्व लोकांचा आवडता ऋतू असला तरी या ऋतूत हृदयविकाराचा झटकाही अधिक येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 12:57 PM2021-11-22T12:57:15+5:302021-11-22T13:18:25+5:30

How to prevent heart attack : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळा हा सर्व लोकांचा आवडता ऋतू असला तरी या ऋतूत हृदयविकाराचा झटकाही अधिक येतो.

How to prevent heart attack :  Heart attack risk factors during winter season know how to stay safe | How to prevent heart attack : हिवाळ्याच्या दिवसात वाढतो हार्ट अटॅकचा धोका; जीवघेण्या अटॅकपासून बचावाचे उपाय, कारणं जाणून घ्या

How to prevent heart attack : हिवाळ्याच्या दिवसात वाढतो हार्ट अटॅकचा धोका; जीवघेण्या अटॅकपासून बचावाचे उपाय, कारणं जाणून घ्या

हृदयविकाराचा (Heart Attack) झटका हे सध्या मृत्यूचे सर्वात सामान्य कारण बनलंय. एक दशकापूर्वीपर्यंत, हृदयविकाराचा झटका ही वाढत्या वयाची समस्या मानली जात होती, परंतु आता ३० ते ४० वर्षे वयाच्या लोकांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे ऐकायला मिळत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जीवनशैली आणि आहारातील अनियमितता, इतर अनेक घटक देखील हृदयविकाराचा झटका वाढवू शकतात. याशिवाय हवामानातील बदल, विशेषत: हिवाळ्याच्या काळात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढू शकतो. याबाबत लोकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. (How to prevent heart attack )

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळा हा सर्व लोकांचा आवडता ऋतू असला तरी या ऋतूत हृदयविकाराचा झटकाही अधिक येतो.  हेसुद्धा लक्षात ठेवण्याची गरज आहे. केवळ श्वसनाचे आजार आणि प्रादुर्भावच नाही तर हृदयरोग्यांसाठीही हिवाळा आव्हानात्मक असू शकतो. डॉ. हृदयरोग तज्ज्ञ डॉ आरिफ खान यांनी अमर उजालाशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

हिवाळ्यात वाढतो हृदयरोगाचा धोका

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे मुख्य कारण काय आहे हे स्पष्ट होत नाही? तथापि, असे मानले जाते की ऋतूंसोबत शरीराच्या तापमानात होणारे बदल हृदयावर परिणाम करतात. अनेक अभ्यासांनी असे सुचवले आहे की हिवाळ्यात पक्षाघात, हृदयविकाराचा झटका, अचानक हृदयविकाराच्या समस्यांचा धोका जास्त असतो.

कारणं

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात शरीरातील मज्जासंस्थेची क्रिया वाढते, त्यामुळे रक्तवाहिन्यांचे आकुंचनही वाढते. या स्थितीला व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन असे म्हणतात. अशा स्थितीत रक्तदाब वाढू लागतो ज्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्त पंप करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. तसेच थंड हवामानात बाहेरील तापमानामुळे काही परिस्थितींमध्ये हायपोथर्मिया होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब होतात, शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यात अडचण निर्माण होते. या सर्व परिस्थितीमुळे हृदयविकाराचा झटका येतो.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आरिफ खान सांगतात, हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होते तेव्हा शरीराला स्वतःच्या उष्णतेचे नियंत्रणात करण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते. ज्या लोकांना आधीच हृदयविकाराची समस्या आहे, किंवा ज्यांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला आहे, त्यांनी अशा हवामानात विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या काळात शरीराला ऑक्सिजनची गरजही वाढते. हृदयाला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो.

असा करा बचाव

सध्या तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढत आहे, त्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्तींनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. देखभालीसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करा. हिवाळ्यात शरीर सक्रिय ठेवा, घराबाहेर व्यायाम करण्यापेक्षा हलका व्यायाम करणे चांगले. नियमित शारीरिक हालचाल आणि व्यायाम तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासोबतच हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.

Web Title: How to prevent heart attack :  Heart attack risk factors during winter season know how to stay safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.