Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ठेवणीतल्या अंथरूण, पांघरुणाला कुबट वास येतो, शिंकाचा त्रास वाढतो? ५ उपाय, कपडे सुगंधी

ठेवणीतल्या अंथरूण, पांघरुणाला कुबट वास येतो, शिंकाचा त्रास वाढतो? ५ उपाय, कपडे सुगंधी

Home remedies: कपाटात, बॉक्समध्ये स्वच्छ धुवून घड्या घालून ठेवलेल्या चादरींना, बेडसीटला किंवा इतर अंथरूण- पांघरूणाला थोड्याच दिवसात कुबट वास येऊ लागतो. हा वास घालविण्यासाठी करून बघा हे सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 01:14 PM2022-01-12T13:14:14+5:302022-01-12T13:15:12+5:30

Home remedies: कपाटात, बॉक्समध्ये स्वच्छ धुवून घड्या घालून ठेवलेल्या चादरींना, बेडसीटला किंवा इतर अंथरूण- पांघरूणाला थोड्याच दिवसात कुबट वास येऊ लागतो. हा वास घालविण्यासाठी करून बघा हे सोपे उपाय...

How to remove odour from clothes, bedsheets, 5 remedies to keep them fresh and scented | ठेवणीतल्या अंथरूण, पांघरुणाला कुबट वास येतो, शिंकाचा त्रास वाढतो? ५ उपाय, कपडे सुगंधी

ठेवणीतल्या अंथरूण, पांघरुणाला कुबट वास येतो, शिंकाचा त्रास वाढतो? ५ उपाय, कपडे सुगंधी

Highlightsसंसर्गजन्य आजार, शिंकाचा त्रास, त्वचेचे आजार पसरू नयेत म्हणून आरोग्यासाठीही हे उपाय करणं खूप गरजेचं आहे. 

रोजच्या अंथरूण, पांघरूण व्यतिरिक्त कपाटात किंवा दिवानाच्या बॉक्समध्ये एक्स्ट्राचे अनेक कपडे असतात. पाहुण्यांसाठी किंवा थंडीमध्ये जास्तीची पांघरूणं लागतात म्हणून ती साठवून ठेवलेली असतात. बऱ्याचदा नेमकं होतं काय की पाहूणे आले म्हणून त्यांच्यासाठी आपण ही साठवणीतली (how to store extra bedsheets and clothes) एक्स्ट्राची पांघरूणं, बेडसीट्स काढतो, पण नेमका त्याचाच कुबट वास येऊ लागतो. मग अशी पांघरूणं काही पाहुण्यांना देता येत नाहीत. प्रत्येकीलाच कधी ना कधी हा अनुभव आलेला असतो. म्हणूनच तर असं होऊ नये आणि ठेवणीतले कपडेही सुवासिक, सुगंधित आणि फ्रेश रहावेत, यासाठी हे काही सोपे घरगुती उपाय करून बघा. कपडे राहतील. यातून काही संसर्गजन्य आजार, शिंकाचा त्रास, त्वचेचे आजार पसरू नयेत म्हणून आरोग्यासाठीही हे उपाय करणं खूप गरजेचं आहे. 

 

१. कपडे स्वच्छ धुवून मगच ठेवा..(proper wash)
अंथरूण पांघरूण एकदा जरी वापरायला काढलं असेल तरी त्याला स्वच्छ धुवून, एक दोन दिवस उन्हात वाळवून मगच कपाटात ठेवा. एकदा जरी वापरायला काढलेलं पांघरूण तसंच पुन्हा कपाटात ठेवून दिलं तरी त्याला काही दिवसात वास येऊ लागतो. त्यामुळे कोणतंही पांघरूण न धुता कपाटात ठेवायचं नाही, हा पाहिला नियम कायम लक्षात ठेवा.

 

२. साडी कव्हर वापरा (use saree cover)
हा एक खूप चांगला उपाय आहे. साडी ठेवण्यासाठी जसे साडी कव्हर वापरतो, तसेच प्रत्येक पांघरुणासाठी स्वतंत्र साडी कव्हर वापरा. या उपायामुळेही पांघरूणाला घाण, कुबट वास येत नाही. याचा दुसरा फायदा असा की एका कपड्याचा वास दुसऱ्या कपड्याला लागत नाही. त्यामुळे ते जास्त स्वच्छ आणि हायजेनिक राहतात.

 

३. कपड्यांना ठराविक काळाने उन द्या (keep them in sun light)
बॉक्समध्ये किंवा कपाटात कपडे खूप दिवस बंदच राहिले, तर त्यांना कुबट वास सुटतो. त्यामुळे ठराविक महिन्यांच्या गॅपनंतर कपड्यांना उन दाखवणे गरजेचे आहे. गच्चीवर, अंगणात जिथे उन येईल तिथे या कपड्यांच्या घड्या ठेवा आणि तास- दोन तास त्यांना उन द्या. दर दोन महिन्यातून एकदा उन दिल्यास कपड्यांना वास येत नाही अणि त्यातील बॅक्टेरियाही नष्ट होतात.

 

४. या सुगंधित वस्तूंचा वापर करा 
कपाटातले कपडे सुगंधित रहावेत यासाठी डांबराच्या गोळ्या वापरल्या जातात. हा एक चांगला उपाय आहे. पण यामुळे अनेक जणांना ॲलर्जी होते. त्यामुळे ते डांबराच्या गोळ्यांचा वापर टाळतात. या गोळ्यांची ॲलर्जी असेल तर लवंगा, कापूर, कडुलिंबाचा पाला, चाफ्याची सुकलेली फुले, उदबत्त्यांचे रिकामे झालेले पाकिट यांचा वापर करा. या वस्तू कपडे ठेवले असतील त्या कप्प्यात पसरून ठेवल्यास कपड्यांना या वस्तूंचा हलका सुगंध येतो आणि ते फ्रेश वाटतात. 

 

५. बेकींग सोडा (use of baking soda)
ठेवणीतल्या कपड्यांना वास येऊ नये, म्हणून हा एक उत्तम उपाय आहे. यासाठी एका डबीत बेकींग सोडा घ्या. त्यामध्ये कोणतेही परफ्युम, अत्तर किंवा इसेंशियल ऑईल टाका आणि ही डबी झाकण न लावता कप्प्यात ठेवून द्या. कपड्यांना हा अत्तराचा मंद सुगंध येईल आणि ते फ्रेश राहतील.  
 

Web Title: How to remove odour from clothes, bedsheets, 5 remedies to keep them fresh and scented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.