Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज खा १ चमचा पांढरे तीळ, ४ फायदे - आजार टाळा आणि मिळवा भरपूर एनर्जी

रोज खा १ चमचा पांढरे तीळ, ४ फायदे - आजार टाळा आणि मिळवा भरपूर एनर्जी

How Sesame Seeds Affect Cholesterol बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यापासून यकृत निरोगी ठेवण्यापर्यंत, गुणकारी तिळाचे पाहा फायदे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2023 05:11 PM2023-05-14T17:11:50+5:302023-05-14T17:12:46+5:30

How Sesame Seeds Affect Cholesterol बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यापासून यकृत निरोगी ठेवण्यापर्यंत, गुणकारी तिळाचे पाहा फायदे..

How Sesame Seeds Affect Cholesterol | रोज खा १ चमचा पांढरे तीळ, ४ फायदे - आजार टाळा आणि मिळवा भरपूर एनर्जी

रोज खा १ चमचा पांढरे तीळ, ४ फायदे - आजार टाळा आणि मिळवा भरपूर एनर्जी

मानवी शरीरात कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात. गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल. गुड कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, पण बॅड कोलेस्टेरॉलमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते. बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. ज्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, थायरॉइड, ब्रेन स्ट्रोक यासारखे आजार वाढतात.

बॅड कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर, पांढऱ्या तिळाचा आहारात समावेश करा. त्यात 15 टक्के सॅच्युरेटेड फॅट, 41 टक्के पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि 39 टक्के मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. यासंदर्भात, लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या आहारतज्ज्ञ काजल तिवारी यांनी पांढऱ्या तिळाचे फायदे सांगितले आहे(How Sesame Seeds Affect Cholesterol).

तिळाचे फायदे

कोलेस्टेरॉल नियंत्रित करते

तीळ हेल्दी फॅट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. यासह चयापचय सुधारते. या बियांमध्ये मेथिओनाइन देखील असते, जे यकृत निरोगी ठेवण्यासोबतच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात ठेवते.

विड्याचे पान खाण्याचे ५ फायदे, काँस्टीपेशन ते डायबिटिसवर गुणकारी

एका संशोधनानुसार, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटमुळे कोलेस्ट्रॉल खूप कमी होते. यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. दोन महिने रोज 40 ग्रॅम तीळ खाल्ल्यास बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल.

यकृत निरोगी ठेवते

तिळामध्ये मेथिओनाइन असते, जे यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते. तिळाच्या बियांमध्ये आढळणारा आणखी एक घटक म्हणजे ट्रिप्टोफॅन. जे शरीराला शांत झोप देण्यास प्रोत्साहित करते.

हाडे मजबूत होतील

आहारतज्ञांच्या मते, तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि झिंक मुबलक प्रमाणात आढळते, जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. तिळामध्ये प्रथिने आणि अमीनो ऍसिड असते. ज्यामुळे स्नायू मजबूत होतात. तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

कुणाचं नाव चटकन आठवत नाही, कामांचा विसर पडतो? ४ गोष्टी खा, स्मरणशक्ती वाढेल

त्वचेसाठी फायदेशीर

तीळ त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. हे त्वचेला आवश्यक पोषण देते. तीळ नैसर्गिकरित्या स्काल्पखाली तेल तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे केस निरोगी आणि चमकदार राहतात. यासह त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

Web Title: How Sesame Seeds Affect Cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.