बाजारात अनेक फॅशनेबल आउटफिट्स मिळतात. मात्र ते घालतं तरी मनासारखा, विशेषत: सेलिब्रिटींचा असतो तसा परफेक्ट लूक मिळत नाही. फिटिंग अजागळच दिसतं किंवा काहीतरी बेढब. मग महागड्या फॅशनेबल आऊटफिट घालण्याचा आनंदही मिळत नाही. त्याचं कारण असतं अशा ड्रेसेससाठी योग्य इनरवेअर घालण्याचं गणित. ब्रा चा चुकीचा प्रकार आणि आकार. जर योग्य ब्रा घातली नाही, तर ड्रेस नीट दिसत नाही. (Best way to use nipple covers) सहसा स्त्रिया फक्त कॉटनची साधी ब्रा किंवा पॅडेड ब्रा खरेदी करतात. पण उन्हाळ्यात पॅडेड ब्रा घातल्याने स्तनांमध्ये घाम येऊ लागतो. रॅश येते, अस्वस्थ वाटू लागतं. त्यात अनेकजणी निपल्स झाकण्यासाठी पॅडेड ब्रा घालतात पण त्यामुळ स्तन जास्तच मोठे दिसू लागतात. एकूण आकार बेढब दिसतो. (How to Attach Nipple Covers)
त्याउलट जर कॉटनच्या नॉन-पॅडेड ब्रा घातल्या तरीही ढब नीट दिसत नाही. काही कपड्यांतून निपल्स दिसतात. त्यानं अनेकदा संकाेचायला होतं. काहीजणींचा ब्रा वापरायलाच विरोध असतो. या साऱ्या समस्यांवर आता उपाय म्हणजे निपल कव्हर्स किंवा निपल पॅच. सध्या अनेकजणी हे निपल कव्हर वापरतात आणि ब्रा ला पर्याय म्हणूनही ते वापरता येऊ शकतात.
निपल्स कव्हरचे प्रकार
१) सिलिकॉन लिफ्ट निपल कव्हर्स
हे निपल कव्हर्स नेकलाइन असलेल्या ड्रेससह घालता येतात. ब्रा घालायची नसेल तरी सिलिकॉन लिफ्ट निप्पल कव्हर्स उपयुक्त ठरतील. या प्रकारच्या स्तनाग्र कव्हरमध्ये एक विस्तृत टेप असतो, ज्यामुळे स्तनाग्र वरच्या बाजूस उचलता येतात. अशी निप्पल कव्हर्स तुम्हाला मार्केटमध्ये ५०० ते ३५० रुपयांपर्यंत मिळतील.
सुरकुत्या, म्हातारपणाच्या खुणा झटक्यात हटवतं व्हॅम्पायर फेशियल; 'या' ट्रिटमेंटसाठी किती खर्च येतो?
२) हार्ट शेप निपल्स कव्हर
जर तुम्ही नॉर्मल ब्रा घातली असेल आणि तुमचे स्तनाग्र त्यामध्ये दिसत नसेल तर तुम्ही यासाठी हार्ट शेप निपल कव्हर किंवा पॅचेस वापरू शकता. यामुळे तुमची समस्या दूर होईल. बाजारात तुम्हाला हार्ट शेपचे निप्पल कव्हर्स 300 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत मिळतात.
३) सिलिकॉन निपल्स कव्हर
हे निप्पल कव्हर्स खूप मऊ असतात आणि तुम्ही ते सहज लावू शकता. नॉन-पॅडेड ब्रासह या प्रकारचे निप्पल कव्हर सोबत ठेवा. ते कॅरी करून तुम्ही आरामात कोणताही पोशाख घालू शकता. बाजारात 150 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत हे निपल्स कव्हर्स मिळतील.
निपल्स कव्हरचा वापर कसा करायचा?
१. हायजिन सगळ्यात महत्त्वाचं. स्वच्छतेची काळजी घ्या. निपल कव्हर वापरण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावू नका. यानंतर तुम्ही निपल्स कव्हरचा मागील स्टिकर काढा आणि त्यांना सुरक्षितरित्या निपल्सवर ठेवा. आता निप्पल कव्हर पेस्ट करा आणि हलक्या हातांनी दाबा.
हवं तेव्हा काढून टाका.
२. निप्पलवर जखमा असल्यास किंवा निप्पलच्या आजूबाजूची त्वचा असल्यास निप्पल कव्हर वापरू नये.
३. स्तनाग्र कव्हर काढताना चुकूनही कोणतीही तीक्ष्ण, धारधार वस्तू वापरू नका.
४. खूप घाम येत असल्यास, वापरलेले निप्पल कव्हर आधी स्वच्छ करा आणि नंतर ते पुन्हा वापरा.