Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चहा प्यायल्यामुळे ॲसिडीटी होते? चहा घेण्याआधी 'हा' उपाय करा, अजिबात त्रास होणार नाही

चहा प्यायल्यामुळे ॲसिडीटी होते? चहा घेण्याआधी 'हा' उपाय करा, अजिबात त्रास होणार नाही

How To Avoid Acidity After Having Tea?: चहा प्यायल्यानंतर ॲसिडीटीचा त्रास होतो, अशी तक्रार अनेकजण करतात. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर डॉक्टरांनी सांगितलेला हा सोपा उपाय करून बघा.. (simple tricks and tips to reduce acidity)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2024 05:09 PM2024-09-07T17:09:14+5:302024-09-07T17:09:57+5:30

How To Avoid Acidity After Having Tea?: चहा प्यायल्यानंतर ॲसिडीटीचा त्रास होतो, अशी तक्रार अनेकजण करतात. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर डॉक्टरांनी सांगितलेला हा सोपा उपाय करून बघा.. (simple tricks and tips to reduce acidity)

how to avoid acidity after having or drinking tea? simple tricks and tips to reduce acidity | चहा प्यायल्यामुळे ॲसिडीटी होते? चहा घेण्याआधी 'हा' उपाय करा, अजिबात त्रास होणार नाही

चहा प्यायल्यामुळे ॲसिडीटी होते? चहा घेण्याआधी 'हा' उपाय करा, अजिबात त्रास होणार नाही

Highlightsआपल्याला बहुतांश वेळा असा अनुभव येतो की बरेच जण चहा समोर आला की तो पिण्याच्या आधी पाणी पितात आणि मग त्यानंतरच चहा घेतात.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे वातावरण थोडं थंड झालं, पाऊस पडू लागला की हमखास चहा प्यावा वाटतो. कारण या वातावरणात चहा पिण्याची मजाच काही वेगळी. वाफाळता गरमागरम सुगंधित चहा समोर यावा, असं आपोआपच वाटू लागतं. पण जेव्हा प्रत्यक्षात काही जणांसमोर जेव्हा असा चहा येतो, तेव्हा ते तो घेणं टाळतात. कारण चहा प्यायल्यामुळे त्यांना ॲसिडीटी हाेते (simple tricks and tips to reduce acidity). तुम्हालाही असाच त्रास होत असेल, चहामुळे ॲसिडीटी वाढते आहे, असं जाणवत असेल तर चहा घेण्यापूर्वी फक्त १ छोटंसं काम करा. (how to avoid acidity after drinking tea? )

 

चहा पिऊन ॲसिडीटी वाढू नये म्हणून काय उपाय करावा?

आपल्याला बहुतांश वेळा असा अनुभव येतो की बरेच जण चहा समोर आला की तो पिण्याच्या आधी पाणी पितात आणि मग त्यानंतरच चहा घेतात.

गॅसही न पेटवता अगदी झटपट करता येतील असे ३ प्रकारचे मोदक!! चवदार मोदकांची घ्या रेसिपी

त्या लोकांची ही सवय अतिशय याेग्य असून चहा घेण्यापूर्वी दोन घोट पाणी आवर्जून प्यावं, असं तज्ज्ञ सांगत आहेत. याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ deepak_daiya या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ते सांगतात की चहा घेण्यापूर्वी जर आपण दोन घोट पाणी प्यायलं तर यामुळे तोंडातली लाळ पाण्यात मिसळून आपल्या पोटात जाते.

 

या लाळेमुळे लिव्हरमधील असे काही घटक ॲक्टीव्ह होतात, जेणेकरून मग चहा प्यायला तरी ॲसिडीटी वाढत नाही. पण म्हणून तुम्ही पाणी पिऊन दिवसांतून कितीही कप चहा घ्यावा, असं नाही.

दारासमोर काढा गौरीची नाजूक- सुंदर पाऊलं! बघा झटपट होणाऱ्या सोप्या रांगोळी डिझाईन्स

अतिप्रमाणात चहा पिणे चुकीचेच आहे. आरोग्यासाठी चांगले नाही. पण जर दिवसांतून दोन- तीन वेळा चहा घेऊनही ॲसिडीटी वाढल्यासारखी वाटत असेल तर एकदा हा उपाय करून पाहावा. शिवाय काही जणांचं असंही मत आहे की चहा पिण्याआधी जर आपण पाणी प्यायलं तर दातांवरचा थर पाण्यात मिसळतो आणि निघून जातो. त्यामुळे मग दातांवर चहाचा पिवळेपणा येत नाही. 


 

Web Title: how to avoid acidity after having or drinking tea? simple tricks and tips to reduce acidity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.