Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दुपारी जेवल्यानंतर ऑफिसमध्ये खूप झोप येते? दुपारची झोप उडवण्याच्या २ ट्रिक्स, फ्रेश राहाल

दुपारी जेवल्यानंतर ऑफिसमध्ये खूप झोप येते? दुपारची झोप उडवण्याच्या २ ट्रिक्स, फ्रेश राहाल

How to avoid daytime sleepiness : तज्ज्ञांच्यामते दुपारच्या जेवणानंतर रक्तातील ग्लुकोज वाढते आणि जेव्हा ते सामान्य पातळीवर परत येते तेव्हा मेंदू आणि स्नायूंची उर्जा कमी होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 03:29 PM2023-02-24T15:29:23+5:302023-02-24T15:43:12+5:30

How to avoid daytime sleepiness : तज्ज्ञांच्यामते दुपारच्या जेवणानंतर रक्तातील ग्लुकोज वाढते आणि जेव्हा ते सामान्य पातळीवर परत येते तेव्हा मेंदू आणि स्नायूंची उर्जा कमी होते.

How to avoid daytime sleepiness : Best Ways to Avoid Daytime Sleepiness | दुपारी जेवल्यानंतर ऑफिसमध्ये खूप झोप येते? दुपारची झोप उडवण्याच्या २ ट्रिक्स, फ्रेश राहाल

दुपारी जेवल्यानंतर ऑफिसमध्ये खूप झोप येते? दुपारची झोप उडवण्याच्या २ ट्रिक्स, फ्रेश राहाल

रात्री कितीही चांगली झोप झाली असली तरी दुपारी जेवल्यानंतर खूपच झोप येते असं प्रत्येकाच्याच बाबतीत होतं. त्यात जर रात्री जागरण झालं असेल किंवा उशीरा डोळे लागले असतील पूर्ण दिवस कंटाळवाणा जातो.  (Tips to Avoid Daytime Sleepiness) अशावेळी तुम्ही घरी असाल तर एक  नॅप किंवा दुपारची २ तासांची पूर्ण झोप घेऊ शकता पण ऑफिसला गेल्यावर प्रोब्लेम होतो. (Excessive daytime sleepiness solution) डोळ्यांवर भरपूर झोप आलेली असतानाही डोळे ताणून काम पूर्ण करावं लागतं. दुपारच्या  झोपेची कारणं आणि ही झोप उडवण्याचे उपाय समजून घेऊया. (Things you can try to help your sleeping habits)

दुपारी झोप येण्याचं कारण (Causes of  day time sleep)

रात्रीच्या झोपेचा वेळ असा असतो की जेव्हा आपण गाढ झोपेत असतो. एक्सपर्ट्सच्यामते अधिकाधिक लोकांसाठी ही वेळ  सकाळी ३ ते ४ वाजता संपते.   सर्काडियन रिदमची सायकल १२ तासांनतर झोपेची पुन्हा मागणे करते जेणेकरून शरीराला परत रिलॅक्स करता येईल. 

तज्ज्ञांच्यामते दुपारच्या जेवणानंतर रक्तातील ग्लुकोज वाढते आणि जेव्हा ते सामान्य पातळीवर परत येते तेव्हा मेंदू आणि स्नायूंची उर्जा कमी होते. त्यामुळे दिवसा झोपेचा त्रास जाणवू लागतो. जर तुम्ही दुपारच्या जेवणात भात, पास्ता, ब्रेड किंवा इतर ग्लुकोजयुक्त पदार्थ खात असाल तर ब्लड शुगर वेगानं वाढते. यामुळे सेल्स एनर्जीपर्यंत संथ गतीनं पोहोचतात. यामुळे दुपारची झोप येऊ शकते.

दुपारी झोप येऊ नये म्हणून काय करायचं? (Solution for daytime sleep)

जॉन हॉपकिन्स यांच्यामते दुपारच्या झोपेपासून सुटका मिळवण्यासाठी रात्रीची झोप सुधारली पाहिजे. ज्यासाठी तुम्हाला पुरेसे पाणी पिणे, व्यायाम, पुरेशी झोप इ. याशिवाय तुम्ही दिवसा पॉवर नॅप घेऊन या समस्येपासून मुक्त होऊ शकता.  जर तुम्ही सकाळी ५ च्या दरम्यान उठत असाल तर दुपारी  १० ते १५ मिनिटांची पॉवर नॅप घेतल्यानं फ्रेश वाटू शकता.  ऑफिसमध्ये जेवल्यानतंर लगेच डेस्कवर न बसता थोडं चालून या, पायऱ्यावर चढ, उतर करा. यामुळे झोप उडण्यास मदत होईल.
 

Web Title: How to avoid daytime sleepiness : Best Ways to Avoid Daytime Sleepiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.