Join us   

How to avoid diabetes :  अचानक वाढणारी ब्लड शुगर नेहमी कंट्रोलमध्ये राहील; डायबिटीसला लांब ठेवण्यासाठी या घ्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 1:17 PM

How to avoid diabetes Simple Tips to Prevent Blood Sugar Spikes :  तुम्हाला डायबिटीस नसला तरीही, तुमच्या आहाराच्या निवडींचा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होतो हे जाणून घ्यायला हवं  

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत अनेकांना डायबिटीसचा सायलेंट किलर आजार  उद्भवतो. विशेष म्हणजे या आजाराची लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे लोक सुरूवातीला गांभीर्यानं घेत नाहीत. डायबिटीस असलेल्यांनी त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. (Diabetes Care Tips) अनेक महिला रोजच्या कामाच्या गडबडीत नाश्ता करण्यावर आणि जेवणाच्या वेळांवर फारसं लक्ष देत नाहीत.   (Nutrition Advice For Avoiding Blood Sugar Spikes)

उरलेलं शिळं खाण्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. परिणामी  बहुसंख्य महिलांमध्ये डायबिटीसचा लाईफस्टाईल डिसीज उद्भवतो. तुम्हाला डायबिटीस नसला तरीही, तुमच्या आहाराच्या निवडींचा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होतो हे जाणून घ्यायला हवं.(Reasons of diabetes) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी आहाराच्या काही सवयी बदलायला हव्यात. (How to control blood sugar level)

1) नाश्ता वेळेवर करा 

बर्‍याच लोकांना असे वाटते की एक किंवा दोन वेळचं जेवण वगळणे हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जर तुम्ही जेवण पूर्णपणे टाळण्याऐवजी दिवसभरात लहान जेवण खाल्ले तर ते तुमच्या शरीरासाठी (Blood Sugar Level Control Tips) चांगले आहे.  हेल्दी नाश्ता केल्याने वजन निरोगी ठेवण्यात मदत होते. जर तुम्ही सकाळचा नाश्ता करणं टाळलं तर रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. 

रोज व्यवस्थित ब्रश करूनही तोंडातून दुर्गंधी येते? ५ उपाय घ्या वेळी अवेळी येणार्‍या दुर्गंधी नेहमी राहील दूर

२) अतिरिक्त कार्ब्स घेणं टाळा

कार्बोहायड्रेट्स पचनाच्या वेळी ग्लुकोजमध्ये मोडतात, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. रिफाईन कार्बोहायड्रेट, जसे की पांढरा ब्रेड आणि पास्ता, त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर पदार्थांपेक्षा जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अधिक वेगाने वाढते. ही वाढ टाळण्यासाठी, धान्य किंवा क्विनोआ आणि ब्राऊन राईस सारखे कार्बोहायड्रेट्ससारखे हळूहळू पचणारे कार्बोहायड्रेट खाण्याचा प्रयत्न करा. ते देखील पोषक आणि फायबरने भरलेले असतात.

रोज पावडर लावून घराबाहेर पडता? परफेक्ट लूकसाठी कॉम्पॅक्ट अन् लूज पावडरमध्ये काय फरक असतो,जाणून घ्या

३) जास्त प्रमाणात प्रोटीन घेणं

 प्रथिने शरीरासाठी निरोगी असतात. परंतु एकाच वेळी ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. म्हणून तुम्ही रोजच्या नाश्याताल, जेवणाला जे काही खात आहात त्यावर व्यवस्थित लक्ष द्या. 

४) जास्त फॅट्सयुक्त आहार

फॅट्समुळे तुमच्या रक्तप्रवाहात ग्लुकोजचे शोषण होण्यास वेळ लागतो, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या रक्तप्रवाहात एकाच वेळी जास्त ग्लुकोज प्रवेश करते, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते.

५) सोडायुक्त पदार्थ

सोडा, गोड चहा आणि फळांच्या रसामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते सेवन केल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होते. म्हणून रात्री झोपताना सोडायुक्त, कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. 

टॅग्स : मधुमेहआरोग्यहेल्थ टिप्स