Join us   

रोजच्या २ सवयींमुळे हार्मोनल असंतुलन वाढते, शरीरासह मनाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2023 6:45 PM

Common Toxic Chemicals and How to Avoid Them : आपल्या शरीरावर नेमका कशाचा बरा वाईट परिणाम होतो हे समजून घेऊया, लहानशा चुका पडतात महागात...

आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स असतात आणि सर्व हार्मोन्सचे काम वेगळे असते. हे सर्व हार्मोन्स शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. त्यामुळे एकाचे जरी संतुलन बिघडले तर शरीराच्या इतर अवयवांच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो. शरीरात हार्मोन्सच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर आजार आणि समस्या उद्भवू शकतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागांचे कार्य योग्यरित्या करणे आणि हार्मोन्सची पातळी योग्य ठेवणे खूप महत्वाचे आहे. 

हार्मोनल असंतुलन शरीरात उद्भवणाऱ्या अनेक रोगांचे कारण असू शकते. दैनंदिन जीवनात अशी अनेक विषारी द्रव्ये आपल्या शरीरात पोहोचतात, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. या विषांमुळे आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. अनेक वेळा नकळत आपण आपल्या रुटीनमध्ये अशा अनेक गोष्टींचा समावेश करतो, ज्यामुळे आपले नुकसान होऊ शकते. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये अशा काही खास गोष्टी आपण करतो ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्सचे प्रमाण वाढून 'हार्मोन्स इम्बॅलेन्सची' समस्या उद्भवते. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या मास्टर्स न्यूट्रिशनिस्ट मनप्रीत यांनी आपल्या रोजच्या रुटीनमधील २ सवयी बदलण्याचा सल्ला दिला आहे. मनप्रीत या हार्मोन आणि गट हेल्थ कोच आहेत(How to Avoid Harmful Toxins in Your Everyday Life).

कोणत्या २ रोजच्या सवयींमुळे आपल्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते ? 

१. प्लॅस्टिकच्या बॉटल्स डबे, कंटेनर वापरणे टाळा :- अन्नपदार्थ ठेवण्यासाठी किंवा पाणी वाहून नेण्यासाठी जवळपास सर्व घरांमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि कंटेनरचा वापर केला जातो. त्यात अनेक धोकादायक रसायने असतात जी नैसर्गिकरित्या शरीरात तयार होणाऱ्या इस्ट्रोजेनला त्रास देतात आणि यामुळे  अंतःस्रावी कार्य प्रणालीमध्ये चढ -उतार होऊ शकतात. यामुळे वंध्यत्व, लठ्ठपणा, मधुमेह आणि स्तनाचा कर्करोग असे आजार होऊ शकतात. प्लॅस्टिकच्या बाटल्या व डब्याऐवजी आपण स्टील, काच आणि तांब्याचे डबे आणि बाटल्या वापरणे हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. 

सेक्सनंतर महिलांनी स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी ५ उपाय, इन्फेक्शन-आजार राहतील दूर...

प्रियांका चोप्राने तिसाव्या वर्षीच केले होते एग्ज फ्रिजिंग! ते नेमके काय असते?

२. रूम फ्रेशनर्समुळे हार्मोनल असंतुलन होते :- अनेकदा आपण घर आणि वाहनांमध्ये सुगंधासाठी एअर फ्रेशनरचा वापर करतो. त्यात phthalates हे अधिक प्रमाणात असतात. जे आपल्या एंडोक्राइन सिस्टमच्या कार्यांमध्ये अडथळा आणू शकतात. यामुळे शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते. तसेच यामुळे अ‍ॅलर्जी, दमा आणि डोकेदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो. त्यामुळे घर आणि वाहनांमध्ये सुगंध पसरवण्यासाठी सुगंधित मेणबत्त्या व अगरबत्तीचा वापर करावा. 

जाॅगिंग रोज करण्याचा फायदा होतो की तोटा ? ५ गोष्टी जॉगिंग करतानाच काय चालतानाही विसरु नका...

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स