सततच्या ताण-तणावामुळे हार्ट अटॅक येणं हे खूपच कॉमन झालं आहे. ऑक्सिफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लेटेस्ट अभ्यासात हा खुलासा झाला आहे की हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. अचानक कोणाचाही ट्रेडमिलवर धावता धावता मृत्यू होत आहे. तर काहीजण बॅडमिंटन खेळताना व्यायाम करताना आपला जीव गमावत आहेत. या घटनांमुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. (What To Do To Avoid Heart)
हार्ट अटॅकमुळे सतत वाढत असलेल्या मृत्यूंचे प्रमाण अनेक कोव्हिड साईड इफेक्ट्स असू शकतात. व्हायरस इंफेक्शननंतर इम्यून सिस्टिम ज्या पद्धतीने रिएक्ट करते. ज्यामुळे हृदयाचे नुकसान होऊ शकते. या स्थितीत ब्लड वेसल्स मोठे होऊ शकतात. ज्याचा परिणाम आपल्या रक्ताच्या पुरवठ्यावर होतो आणि हार्ट अटॅकची स्थिती उद्भवते. (What To Do To Avoid Heart Attack Follow These Yoga Tips And Home Remedies By Dr Ramdev Baba)
ऑक्सफोर्डच्या अभ्यासानुसार कोरोनाच्या भितीमुळे लोकांमध्ये ताणतणाव आणि डिप्रेशनचा धोका वाढत आहे आणि हृदय कमकुवत होत आहे. मेंदूच्या हालचालींचा थेट हृदयावर परिणाम होतो. त्यानंतर इजेक्शन फ्रॅक्शन वाढते. दीर्घकाळ हार्ट बीट अन्कंट्रोल राहिल्यानं हृदयाच्या गंभीर समस्या उद्भवतात. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग गुरू बाबा रामदेव यांनी काही उपाय सुचवले आहेत.
हार्ट अटॅकची लक्षणं
छातीत दुखणं,
खांद्यांमध्ये वेदना,
अचानक घाम येणं,
हृदयाचे ठोके वेगानं वाढणं,
थकवा येणं,
श्वास घ्यायला त्रास होणं.
हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी उपाय
अळशी, लसूण, दालचिनी, हळद या पदार्थांचे सेवन हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. रामदेव बाबा सांगतात हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ३० मिनिटं व्यायाम करा, योग आणि प्राणायम करा. ध्यान केल्यानं हृदय आणि मेंदू शांत राहण्यास मदत होते.
तरूण असल्यापासूनच हृदयाची काळजी घ्या, शाकाहारी खाल्ल्याने रोग होण्याचे प्रमाम कमी होते. प्लांट बेस्ड फूडमुळे कोलेस्टेरॉल कंट्रोल होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी १ चमचा अर्जुन झाडाच्या सालीची पावडर, २ ग्राम दालिचिनी, ५ तुळशी, उकळवून काढा बनवून घ्या. रोज हा काढा प्यायल्याने ब्लॉकेजची समस्या उद्भवत नाही.