आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या दिवसाची सुरुवात ही कॉफी पिऊनच होते. कॉफी प्यायल्याशिवाय कित्येकांना दिवसाची सुरुवात झाली आहे असे वाटतच नाही. कॉफी हे जगभरातील सगळ्यांचे आवडते पेय आहे. सकाळी उठल्यानंतर एक कप कॉफी (How to avoid heartburn from coffee) मिळाली तर दिवस चांगला जातो. इतकंच नाही तर ऑफिसच्या कामात व्यस्त असताना संध्याकाळीही ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत कॉफी पिणं अनेकांना आवडत, यामुळे मूड फ्रेश होतो. कॉफी प्यायल्याने आपल्या शरीराला इन्स्टंट ऊर्जा मिळते. जेव्हा कामाचा ताण वाढतो किंवा काम करून कंटाळा येतो तेव्हा पटकन रिफ्रेश होण्यासाठी कॉफीचा एक कप आपण घेतो(Does Coffee Cause Heartburn? 4 Proven Ways to Avoid Gut Pain from Coffee).
कॉफी प्यायल्याने थकलेलं, मरगळलेले शरीर पुन्हा एकदा रिफ्रेश होऊन पुढच्या कामाला लागते. कॉफी प्यायल्याने काही क्षणांतच फ्रेश वाटते यामुळेच आपण सकाळी सर्वात आधी उठल्यावर कॉफी पितो. त्यानंतर घरी किंवा ऑफिसमध्ये कॉफीची तलप लागल्यावर लगेच कॉफी पितो. परंतु अशी वारंवार कॉफी पिणे आपल्या शरीराला योग्य आहे की अयोग्य? काहीवेळा दिवसांतून भरपूर प्रमाणात कॉफी प्यायल्यास आपल्याला छातीत जळजळ होण्याची समस्या सतावते. अधिक प्रमाणात कॉफी प्यायलयास पचन आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कॉफी प्यायल्याने अशा समस्या निर्माण होऊ नये म्हणून नेमके काय करावे ते पाहूयात(4 Ways to Avoid Heartburn from Coffee).
कॉफी प्यायल्याने अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून...
१. जास्त कॉफी पिऊ नका :- जर तुम्हाला कॉफी पिणे आवडत असेल परंतु त्याच वेळी छातीत जळजळ होण्याची समस्या टाळायची असेल तर कमी प्रमाणात कॉफी प्यावी. जेव्हा तुम्ही कॉफी कमी प्रमाणात पितात, तेव्हा ते पोटात तयार होणाऱ्या अॅसिडचे प्रमाण कमी करते . त्यामुळे छातीत जळजळ होण्याचा धोका कमी होतो.
२. रिकाम्या पोटी कॉफी पिऊ नका :- ज्या लोकांना कॉफी प्यायल्यानंतर छातीत जळजळ किंवा अॅसिडीटी झाल्याची तक्रार करतात, ते सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कॉफी पितात. सकाळी उपाशी पोटी कॉफी पिणे टाळावे. कॉफी पिण्यापूर्वी नेहमी जेवण किंवा नाश्ता घ्यावा. कॉफी मधील जास्तीची आम्लता शोषून घेण्यासाठी कॉफी पिण्याआधी काहीतरी खाणे महत्वाचे असते. यामुळे अॅसिडीटी पोटात जळजळ होणे अशा समस्या निर्माण होत नाहीत.
३. योग्य कॉफीची निवड करा :- तुम्ही कोणत्या प्रकारची कॉफी पीत आहात हे देखील खूप महत्वाचे असते. जर तुम्हाला वारंवार छातीत जळजळ होत असेल तर खूप स्ट्रॉंग कॉफी पिणे शक्यतो टाळावे.अशावेळी माईल्ड किंवा लो अॅसेडिक कॉफी पिण्याला प्राधान्य द्यावे. माईल्ड किंवा लो अॅसेडिक कॉफी पिण्याने पोटासंबंधित इतर समस्या निर्माण होत नाहीत.
वजन कमी करण्यासाठी ‘वॉटर फास्टिंग’? पाण्याचा उपवास-हा काय भलताच ट्रेण्ड -५ गोष्टी चुकल्या तर..
४. साखर घेऊ नका :- कॉफी बनवताना शक्यतो साखरेचा वापर करणे टाळावे. साखर पोटातील अॅसिडचे उत्पादन वाढवू शकते यामुळे छातीत जळजळ होऊ शकते. आवश्यक असल्यास, आपण नॅचरल स्वीटनर्सची निवड करु शकता.
ड्रायफ्रूट्स दुधात भिजवावेत की पाण्यात? तज्ज्ञ सांगतात, सुकामेवा भिजवून खाण्याची योग्य पद्धत...