Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दिवसभर फ्रेश राहायचं, सुंदर दिसायचं तर उठल्यावर न विसरता करा १ काम, राहाल कायम ताजेतवाने...

दिवसभर फ्रेश राहायचं, सुंदर दिसायचं तर उठल्यावर न विसरता करा १ काम, राहाल कायम ताजेतवाने...

How To Be Energetic Throughout the Day 1 Simple Remedy : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार याविषयी नेमकं काय सांगतात पाहूया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 05:24 PM2023-05-10T17:24:50+5:302023-05-10T17:26:21+5:30

How To Be Energetic Throughout the Day 1 Simple Remedy : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार याविषयी नेमकं काय सांगतात पाहूया..

How To Be Energetic Throughout the Day 1 Simple Remedy : If you want to stay fresh all day, look beautiful, do 1 thing after waking up, you will stay fresh forever... | दिवसभर फ्रेश राहायचं, सुंदर दिसायचं तर उठल्यावर न विसरता करा १ काम, राहाल कायम ताजेतवाने...

दिवसभर फ्रेश राहायचं, सुंदर दिसायचं तर उठल्यावर न विसरता करा १ काम, राहाल कायम ताजेतवाने...

सकाळी उठल्यापासून आपला दिवस जो सुरू होतो तो थेट रात्री बेडवर आडवं झाल्यावरच शरीराला, मनाला आणि बुद्धीला आराम मिलतो. एकामागे एक इतक्या गोष्टी सुरू असतात की आपल्याला शांतपणे बसायला, आपल्या आवडीची एखादी गोष्ट करायला अजिबात वेळ होत नाही. दिवसभर घरातली कामं, बाहेरच्या जबाबदाऱ्या, ऑफीस, सणवार, आजारपणं एक ना अनेक गोष्टींचे ताण घेऊन आपण इतके थकून जातो की आपल्याला अनेकदा स्वत:कडे लक्ष द्यायचेही भान राहत नाही. रोज सकाळी उठल्या आपण चहा घेतोच घेतो. त्याआधी किंवा त्याऐवजी रात्रभर पाण्यात भिजवलेला सुकामेवा खाल्ल्यास त्याचा अनेक गोष्टींसाठी फायदा होतो. मूड फ्रेश राहण्यासाठी, दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी, केस आणि त्वचा चांगली राहण्यासाठी, पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि रात्री शांत झोप लागण्यासाठी याचा उत्तम फायदा होतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार याविषयी नेमकं काय सांगतात पाहूया (How To Be Energetic Throughout the Day 1 Simple Remedy)..

1. काळे मनुके

काळ्या मनुकामध्ये नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट असतात जे त्वचा आणि केसांसाठी चांगले असतात. त्यामध्ये एल-आर्जिनिन आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, त्यात भरपूर लोह असते, ज्यामुळे गर्भाशय आणि अंडाशयातील रक्तप्रवाह सुधारतो.

2. बदाम

बदामामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम आणि रिबोफ्लेविन, लोह, पोटॅशियम, जस्त आणि ब जीवनसत्त्वे भरपूर असतात. ते कोलेस्टेरॉल कमी करतात, रक्तदाब नियंत्रित करतात, स्मरणशक्ती सुधारतात आणि रक्तातील साखर टिकवून ठेवतात. कर्करोग टाळण्यासाठीही हे घटक अतिशय फायदेशीर असतात.

3. खजूर

सेलेनियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि तांबे यांसारखे सूक्ष्म पोषक घटक खजूरामध्ये भरपूर प्रमाणात असतात. खजूर तुम्हाला झटपट ऊर्जा देतात, त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. नियमित खजूर खाल्ल्याने निद्रानाश दूर होतो आणि हाडांच्या तक्रारी कमी होतात. 

4. पिस्ता

पिस्ते निरोगी फॅटस, फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन बी 6 आणि थायामिनचे उत्तम स्रोत आहेत. ते झोप, डोळ्यांचे आरोग्य, आतड्याचे आरोग्य यांसाठी उत्तम आहेत. कोलन कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी नियमित पिस्ते खाणे फायद्याचे ठरते.


5. आक्रोड

आक्रोड अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध आहेत, ओमेगा -3 चे सुपर प्लांट स्त्रोत असल्याने जळजळ कमी करण्यास मदत करतात, आतड्यांची निरोगी वाढ होण्यासाठी फायदेशीर आणि स्मरणशक्ती सुधारतात.

आयुर्वेदानुसार, काजू पचायला जड (गुरू) असतात कारण त्यात निरोगी चरबी, प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतात तसेच काजू प्रकृतीने गरम असतात. त्यामुळे काजू खाता तेव्हा त्यांना ६-८ तास भिजत ठेवा. भिजवल्याने त्याची उष्णता कमी होते, फायटिक ऍसिड/टॅनिन्स काढून टाकतात ज्यामुळे आपल्याला त्यांच्यापासून पोषण शोषून घेणे सोपे होते. सुकामेवा एखाद दिवस भिजवायला विसरलात तर कोरड्या भाजून खाणे केव्हाही चांगले. सकाळी उठल्या उठल्या किंवा मध्यान्ह / संध्याकाळचा नाश्ता म्हणूनही आपण हा सुकामेवा घेऊ शकतो. 

दररोज किती सुकामेवा खावा?

आता सामान्य पचन क्षमता असलेल्या लोकांसाठी, जे दररोज व्यायाम करतात, पुरेसे पाणी पितात आणि त्यांना कोणताही आजार नाही, दररोज एक औंस (जे हाताच्या तळहातात बसते) सुकामेवा खाणे आरोग्यदायी आहे. सुकामेवा खाल्ल्याने अपचन, ओटीपोटात जडपणा, उष्णतेची समस्या, अतिसार, वजन वाढणे, भूक न लागणे अशा समस्या उद्भवू शकतात कारण त्यात 80% फॅटस असतात. त्यामुळे बिंग करणे टाळा.

 

Web Title: How To Be Energetic Throughout the Day 1 Simple Remedy : If you want to stay fresh all day, look beautiful, do 1 thing after waking up, you will stay fresh forever...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.