Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > How to boost immunity : ऋतूबदल होताना इम्युनिटी चांगली हवीच, इम्युनिटी वाढवण्यासाठी रोजच्या जेवणात करा थोडे बदल

How to boost immunity : ऋतूबदल होताना इम्युनिटी चांगली हवीच, इम्युनिटी वाढवण्यासाठी रोजच्या जेवणात करा थोडे बदल

How to boost immunity सतत सर्दी, ताप, कफ किंवा आरोग्याच्या आणखी काही समस्या उद्भवत असतील तर आहारात थोडे बदल करायलाच हवेत, याबाबत आहारतज्ज्ञ मोलाचा सल्ला देताना सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 11:50 AM2022-02-09T11:50:39+5:302022-02-09T12:02:27+5:30

How to boost immunity सतत सर्दी, ताप, कफ किंवा आरोग्याच्या आणखी काही समस्या उद्भवत असतील तर आहारात थोडे बदल करायलाच हवेत, याबाबत आहारतज्ज्ञ मोलाचा सल्ला देताना सांगतात...

How to boost immunity: Immunity should be good during the change of seasons, make small changes in daily diet to increase immunity | How to boost immunity : ऋतूबदल होताना इम्युनिटी चांगली हवीच, इम्युनिटी वाढवण्यासाठी रोजच्या जेवणात करा थोडे बदल

How to boost immunity : ऋतूबदल होताना इम्युनिटी चांगली हवीच, इम्युनिटी वाढवण्यासाठी रोजच्या जेवणात करा थोडे बदल

Highlightsब्रेकफास्ट, लंच, डिनर या तीन महत्त्वाच्या वेळी नेमके काय खायला हवे याविषयी माहित असणे आवश्यक आहे...सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून पेय तयार करावे, त्यामुळे प्रतिकारशक्ती नक्कीच वाढेल

एकीकडे कोरोनाचा Corona वाढता प्रादुर्भाव आणि दुसरीकडे हवाबदल Weather change यांमुळे पुन्हा सर्दी, ताप, खोकला आणि कफ यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या हवाबदलाचा त्रास होत असून या काळात सहीसलामत राहायचे असेल तर आपली प्रतिकारशक्ती चांगली हवी How to boost immunity. प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी आपली जीवनशैली lifestyle म्हणजेच आहार, झोप, व्यायाम यांसारख्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे. यातही उत्तम प्रतिकारशक्तीसाठी संतुलित आणि घरचा आहार सर्वात गरजेचा असतो. आपण दिवसभरात घेत असलेल्या आहारामध्ये प्रामुख्याने ब्रेकफास्ट, लंच आणि डीनर यांचा समावेश असतो. या तिन्ही वेळी आहारात नेमके काय असायला हवे? कोणत्या गोष्टींचा समावेश केल्यास आपली प्रतिकारशक्ती चांगली राहील याबाबत आहारतज्ज्ञ नेमके काय सांगतात हे आपल्याला माहित असायला हवे. 

वेगवेगळ्या संसर्गांपासून आपल्याला वाचवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याला मदत करत असते. प्रतिकारशक्ती म्हणजे काय तर आपले अवयव, शरीरातील पांढऱ्या पेशी, प्रोटीन आणि शरीरात असणारे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स यांचे नेटवर्क. हे नेटवर्क चांगले ठेवायचे असेल तर त्यांना योग्य पद्धतीने पोषण मिळणे आवश्यक आहे. पाहूयात त्यासाठी नेमके काय करायला हवे, प्रसिद्ध आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांच्या म्हणण्यानुसार प्रतिकारशक्ती वाढवायची तर ते एक किंवा दोन दिवसाचे काम नाही तर ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि चांगला आहार आणि उत्तम जीवनशैली यांचा यामध्ये महत्त्वाचा रोल असतो. 

दिवसाची सुरुवात या पेयाने करा

आपल्याला विविध प्रकारच्या विषाणूंचा सामना करायचा असेल तर दिवसाची सुरुवात एका उत्तम अशा पेयान करायला हवी. अनेक जण सकाळी उठल्यावर आधी चहा किंवा कॉफी घेतात. मात्र उठल्यावर सर्वात आधी एक ग्लास हळद घातलेले पाणी प्यायला हवे. अर्धा चमचा हळद पाण्याच्या ग्लासमध्ये घालून हे पाणी प्यावे. यासोबतच धने आणि वेलची हेही चावून खाल्ल्यास त्याचा आरोग्याला अतिशय चांगला फायदा होतो.  

नाश्ता काय कराल? 

नाश्ता हा कायम हलका आणि पौष्टीक हवा. यामध्ये तुम्ही पोहे, भाज्यांचा दलिया, उरलेल्या पोळीसोबत सगळ्या भाज्या एकत्र करुन फ्रँकी किंवा झटपट होणारा पिझ्झा, नाचणीचे आंबील, भाज्यांचा पराठा यांसारखे पौष्टीक पदार्थ खाऊ शकता. नाश्ता केल्यानंतर लगेच चहा-कॉफी न घेता काही वेळाने तुम्ही चहा किंवा कॉफी घेतली तरी चालेल. 

जेवणाआधी फळ जरुर खा

जेवणाच्या आधी साधारण २ तास तुम्ही एखादे फळ नक्की घेऊ शकता. यामध्ये तुम्ही चिकू, पपई, सफरचंद, अननस यांसारखे फळ आवर्जून खाऊ शकता. फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

दुपारच्या जेवणात काय खाल? 

बरेचदा दुपारच्या जेवणात लोक मोड आलेली कडधान्ये किंवा सलाड खातात. मात्र ते योग्य नसून दुपारी पोळी भाजी, भात, वरण असे पूर्ण जेवण घ्यायला हवे. यामध्येही तुम्ही गव्हाची पोळी, ज्वारी-बाजरीची किंवा नाचणीची भाकरी असे घेऊ शकता. 

चहाच्या वेळी काय कराल? 

साधारणपणे ४ किंवा ५ वाजता आपण सकाळपासूनची कष्टाची आणि मेंदूची कामे करुन थकलेलो असतो. अशावेळी एखादा कप चहा किंवा कॉफी घेतली तर चालू शकेल. मात्र चहा किंवा कॉफी कोरी न घेता त्यामध्ये दूध आवर्जून असायला हवे. यासोबत आपण काही बिस्कीट खाऊ शकतो. सध्या बेकरीमध्ये गव्हाच्या पीठाची किंवा नाचणीच्या पीठाची बिस्कीट अगदी सहज मिळतात. मात्र चहा कॉफीसोबत नमकीन गोष्टी खाणे टाळायला हवे. नमकीन पदार्थांमध्ये तेल, मीठ जास्त असल्याने त्या आरोसाठी घातक असतात. 

रात्रीच्या जेवणाकडे विशेष लक्ष द्या

रात्रीचे जेवण हलके आणि पौष्टीक असायला हवे. यामध्ये भाज्या घातलेला दलिया, डाळ खिचडी, भाजी-पोळी असे घेऊ शकता. जेवणासोबत नेहमी कच्ची मिरची आवर्जून खा. त्यामुळे पोट साफ राहण्यास तसेच इतरही समस्या दूर होण्यास मदत होईल. तर झोपताना एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायला हवे. 
 

Web Title: How to boost immunity: Immunity should be good during the change of seasons, make small changes in daily diet to increase immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.