Join us   

एकादशीचा उपवास कसा सोडावा? काय खावे काय खाऊ नये, पाहा-तब्येतीला त्रास होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 7:14 PM

How to break the fast of Ashadhi Ekadashi (Ekadashicha Upwas Kasa Sodava) : उपवासाचा त्रास होऊ नये यासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी.

आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi 2024) उपवास अनेकजण श्रद्धेने करतात.  जर काहीजण उपवासाच्या पदार्थांचा आनंद घेण्यासाठी उपवास करतात. उपवासाचे पदार्थ सर्वांनाच पचतातच असं नाही. अनेकांना पित्त होतं तर कोणाला अजीर्णाचे ढेकर येतात. उपवासाचा त्रास होऊ नये यासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी. उपवास करताना ज्या प्रमाणे आपण काय खायचं, काय खाऊ नये हे लक्षात घेतो  त्याचप्रमाणे उपवास सोडाना काय खावं ते सुद्धा पाहायला हवं. कारण यामुळे तब्येतीची विकार उद्भवत नाहीत आणि उपवासाचा  त्रासही होत नाही. (Ashadhi Ekadashi Fasting Rules)

उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असल्यामुळे अनेकजण ऑफिसला पोहोचण्याच्या नादात सकाळी फक्त चहा-बिस्कीट खाता. त्यानंतर थेट १२ किंवा १ वाजता जेवतात पण आदल्या दिवशी उपवास असेल तर असं करणं टाळावं. सवय असेल तर सकाळी कमी चहा घ्या. जमल्यास नाश्ता करा अन्यथा पचनाचे विकार उद्भवू शकतात किंवा डोकेदुखीसुद्धा होते. 

सकाळी फळं खाऊ शकता किंवा फ्रुट ज्यूस घ्या.  केळी, संत्री या पदार्थांचे सेवन करा. किंवा रात्री पाण्यात भिजवलेले ड्राय फ्रुट्स सकाळी खा. अखरोट, काजू, द्राक्ष, मनुके, बटाटे, भात, गहू, ज्वारी या पदार्थांचा आहारात समावेश करा.

एकादशीला करा उपवासाचे मेदूवडे, १ वाटी भगरीचे २० कुरकुरीत खमंग वडे-पचायलाही हलके

उपवासाच्या दुसऱ्या दिवशी तिखट, मसालेयुक्त, तळलेले पदार्थ खाणं टाळा, उपवासामुळे  पोटाला एक प्रकारचा आराम मिळतो. पण पोटाला जास्त ताण दिल्याने पचनावर याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून हलका आहार घ्या. आहारात रव्याचा उपमा, शिरा, तांदळाची खीर, सूप, भात ज्वारीची भाकरी, दलियाचा उपमा असे पदार्थ खाऊ शकता.

जेवणात गोड पदार्थ असतातच अशावेळी तांदूळाची किंवा गव्हाची खीर, शेवयांची खीर असे पदार्थ बनवा कारण खिरीत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते यात कर्बोदकं असतात. उपवास सोडताना खीर खाल्ल्याने अशक्तपणाची तक्रार दूर होते. याशिवाय खीर करताना त्यात साखर कमी प्रमाणात घाला किंवा साखरेऐवजी गुळाचा वापर करा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल