Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुम्हीसुद्धा चुकीच्या पद्धतीने ब्रशवर टूथपेस्ट लावता का? पाहा योग्य पद्धत, दात होतील स्वच्छ...

तुम्हीसुद्धा चुकीच्या पद्धतीने ब्रशवर टूथपेस्ट लावता का? पाहा योग्य पद्धत, दात होतील स्वच्छ...

How to Brush Your Teeth Properly : The Right and Wrong Way to Brush Your Teeth : How to properly brush your teeth : दात घासण्याची व ब्रशवर टूथपेस्ट घेण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती, त्याचेच हे उत्तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 07:36 PM2024-10-15T19:36:06+5:302024-10-15T20:49:36+5:30

How to Brush Your Teeth Properly : The Right and Wrong Way to Brush Your Teeth : How to properly brush your teeth : दात घासण्याची व ब्रशवर टूथपेस्ट घेण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती, त्याचेच हे उत्तर...

How to Brush Your Teeth Properly The Right and Wrong Way to Brush Your Teeth How to properly brush your teeth | तुम्हीसुद्धा चुकीच्या पद्धतीने ब्रशवर टूथपेस्ट लावता का? पाहा योग्य पद्धत, दात होतील स्वच्छ...

तुम्हीसुद्धा चुकीच्या पद्धतीने ब्रशवर टूथपेस्ट लावता का? पाहा योग्य पद्धत, दात होतील स्वच्छ...

दातांची व ओरल हेल्थची काळजी घेण्यासाठी आपण सगळेच सकाळी उठल्यावर आधी ब्रश करतो. लहानपणापासूनच आपल्याला दात स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश व टूथपेस्टने दात घासण्याचा सल्ला दिला जातो. दररोज ब्रश केल्याने दात किडणे, हिरड्यांचे रोग, तोंडातील वाईट बॅक्टेरिया आणि प्लाक काढून टाकण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर ब्रशवर टूथपेस्ट घेऊन आपण दात घासतो. दात घासताना आपण ब्रश वापरुन संपूर्ण तोंड आणि दात घासून स्वच्छ करतो(How to Brush Your Teeth Properly).

दात घासताना आपण ब्रश संपूर्ण तोंडात फिरवतो पण आपल्या तोंडात काही भागांपर्यंत ब्रश (How to properly brush your teeth) पोहाचु शकत नाही. काहीवेळा आपण आपल्या नेहमीच्याच पद्धतीने दात घासतो. अशावेळी दातांच्या काही भागांच्या स्वच्छतेचा आपण विचारच करत नाही. यामुळे दात वरवर स्वच्छ होऊन आतून खोलवर स्वच्छ न केल्यास दातांच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी दात घासण्याची व ब्रशवर टूथपेस्ट घेण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती ते पाहूयात. podcast.pub या इंस्टाग्राम वरील अकाउंटवरून हा ओरल हेल्थ केअर संबंधित व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे(The Right and Wrong Way to Brush Your Teeth).

दात घासताना अशी घ्या काळजी... 

१. दातांच्या आतील भाग :- दात घासताना आपण शक्यतो डोळ्यांना दिसेल इतकाच दातांचा भाग घासतो. दात आपण वर - खाली अशा सगळ्या बाजूंनी घासले तरीही दातांच्या आतील भागाची आपण तितकीशी स्वच्छता करत नाहीत. नेहमीप्रमाणे दात फक्त वरुन घासणे इतकेच गरजेचे नसते तर दातांच्या आतल्या भागाची देखील तितकीच खोलवर स्वच्छता करणे गरजेचे असते. जर दातांच्या आतील भागाची योग्य पद्धतीने स्वच्छता केली नाही तर दात किडू शकतात तसेच ओरल हेल्थही खराब होऊ शकते. यासाठीच दात घासताना ते नेहमी वरवर न घासता दातांची आतून खोलवर स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. 

२. हिरड्या :- आपल्या दातांबरोबरच दातांच्या हिरड्यांमध्ये देखील अनेक प्रकारचे जिवाणू असतात. हिरड्यांमध्ये लपलेले हे जिवाणू आपली ओरल हेल्थ खराब करु शकतात. यासाठीच दातांसोबतच हिरड्यांच्या सफाईकडे देखील लक्ष दिले पाहिजे. ब्रश करताना तो थोडासा तिरका करून ४५ अंश झुकवून ब्रश केल्यास हिरड्यांवरील जिवाणूंची स्वच्छता नीट करता येते असे तज्ज्ञ सांगतात. दातांसोबतच हिरड्या देखील स्वच्छ करणे आवश्यक असते. 

मासिक पाळी वेळेवर यावी म्हणून ५ चुका तुम्हीही करता? पीसीओएस असेल तर 'या' चुका वेळीच टाळा...

३. जीभ :- आपल्या जिभेवर सर्वात जास्त प्रमाणात जिवाणू राहतात. जिभेवरील या जिवाणूंची वेळीच योग्य पद्धतीने स्वच्छता केली नाही तर तोंडाच्या दुर्गंधी सारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याचबरोबर आपल्या ओरल हेल्थवर देखील याचा वाईट परिणाम दिसू शकतो. यासाठीच दररोज दातांच्या सफाई सोबतच जिभेच्या स्वच्छतेकडे देखील तितकेच लक्ष द्यावे.  

योनीमार्गात प्रचंड कोरडेपणा, सतत आग - जळजळ होण्याची ५ कारणं, त्रास कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात..

ब्रशवर टूथपेस्ट लावण्याची योग्य पद्धत... 

ब्रशवर टूथपेस्ट लावताना आपण ब्रशच्या टोकावरील भागावर असणाऱ्या प्लॅस्टिकच्या ब्रेसेस मध्ये टूथपेस्ट लावतो. परंतु ही चुकीची पद्धत आहे. कारण अशा पद्धतीने टूथपेस्ट लावल्याने अर्धी टूथपेस्ट तर काहीवेळा खालीच पडते. अनेकदा ब्रशवर लावलेली टूथपेस्ट आपल्या दातांजवळ पोहोचेपर्यंत अर्धी टूथपेस्ट बेसिनमध्ये पडून जाते. यासाठी ब्रशवर टूथपेस्ट लावताना ती आडवी न लावता वरच्या दिशेने टूथपेस्ट करत उभी लावून घ्यावी. जेणेकरून टूथपेस्ट ब्रशवरुन पडत नाही आणि ब्रशच्या टोकावरील भागावर असणाऱ्या प्लॅस्टिकच्या ब्रेसेसमध्ये जाऊन व्यवस्थित बसते, यामुळे ती टूथपेस्ट खाली पडत नाही. ब्रशवर टूथपेस्ट  लावताना ती शक्यतो ब्रशच्या टोकावरील भागावर असणाऱ्या प्लॅस्टिकच्या ब्रेसेसच्या विरुद्ध दिशेने लावावी.


Web Title: How to Brush Your Teeth Properly The Right and Wrong Way to Brush Your Teeth How to properly brush your teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.