Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > विचारांचं काहूर - झोपेचं खोबरं,तुम्हांलाही आहे का 'नाईट एन्झायटी'? ५ सोपे उपाय, झोप लागेल शांत...

विचारांचं काहूर - झोपेचं खोबरं,तुम्हांलाही आहे का 'नाईट एन्झायटी'? ५ सोपे उपाय, झोप लागेल शांत...

Health night anxiety care tips know the trick to manage restless mind during sleep : How to Ease Anxiety at Night : 'नाईट एन्झायटी'ची समस्या कमी करण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2024 02:34 PM2024-08-23T14:34:23+5:302024-08-23T14:47:05+5:30

Health night anxiety care tips know the trick to manage restless mind during sleep : How to Ease Anxiety at Night : 'नाईट एन्झायटी'ची समस्या कमी करण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत ते पाहूयात...

How to calm anxiety at night naturally Tips for beating anxiety to get a better night’s sleep How to Ease Anxiety at Night | विचारांचं काहूर - झोपेचं खोबरं,तुम्हांलाही आहे का 'नाईट एन्झायटी'? ५ सोपे उपाय, झोप लागेल शांत...

विचारांचं काहूर - झोपेचं खोबरं,तुम्हांलाही आहे का 'नाईट एन्झायटी'? ५ सोपे उपाय, झोप लागेल शांत...

रात्रीची झोप ही खूप महत्वाची असते. रात्री किमान ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेतली तर आपले आरोग्य चांगले राहते. रात्रीची शांत, सलग झोप मिळाल्यास आरोग्याच्या बहुतांश तक्रारी दूर होतात. रात्रीच्या झोपेचे अनेक फायदे माहित असले तरीही आपण बरेचदा रात्री वेळेत झोपत नाही. रात्री झोपताना हातात असणारी स्क्रिन, ताणतणाव, कामाचे प्रेशर, घरगुती समस्या यांसारख्या काही ना काही कारणांनी आपण रात्री उशिरा झोपतो. रात्री झोपताना आपण उशीवर डोकं ठेवलं की काहीवेळा आपले मन हे वेगवेगळ्या विचारात गुंतून जाते(How to Ease Anxiety at Night).

रात्री झोपताना शांत वातावरण असते अशावेळी आपल्या मनात काही ना काही विचार येत राहतात. हे विचार मनात आल्याने आपण अनेकदा तासंतास या गोष्टींचा विचार करत बसतो. यामुळे आपले झोपेकडे दुर्लक्ष होते, परिणामी आपल्याला वेळेत झोप लागत नाही. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा आपण विचार करत राहतो यामुळे रात्रीची झोप येत नाही तसेच सकाळी काम असल्याने लवकर उठावे लागते. या सगळ्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि आरोग्य हळूहळू बिघडायला लागते. रात्री झोपताना अशा कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा विचार करुन त्याचा आपल्या झोपेवर वाईट परिणाम होणे यालाच 'नाईट एन्झायटी' असे म्हणतात. याच 'नाईट एन्झायटी' मुळे (How to calm anxiety at night naturally) आपल्याला रात्री झोपणे कठीण होऊन बसते. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरावरील ताण वाढतो, ज्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून येतो. ही कायमस्वरूपी समस्या नसली, तरी  या समस्येचे योग्य मॅनेजमेंट न केल्यास हे चक्र असेच सुरूच राहते. 'नाईट एन्झायटी' दूर करण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकत  ते पाहूयात(What to do if your mind is racing before sleep).

 'नाईट एन्झायटी' ची समस्या का निर्माण होते ? 

'नाईट एन्झायटी' ची अनेक कारणे असू शकतात. जर तुमच्या आयुष्यात काही मोठा बदल झाला असेल किंवा तुमची काही समस्या असेल ज्याचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर रात्रीच्या वेळी या सर्व गोष्टी तुमच्या मनात फिरू लागतात. दुसरे कारण असे असू शकते की झोपेत असताना तुमचे लक्ष एका जागी राहते आणि तुमचे मन तुमच्या आयुष्यातील समस्यांवर लक्ष केंद्रित करू लागते. याचे एक कारण हे देखील असू शकते की जर तुम्ही दिवसा तणावाखाली असाल तर रात्री देखील आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सच्या पातळीत वाढ होते. यामुळे आपल्याला 'नाईट एन्झायटी' होऊ शकते.

'नाईट एन्झायटी' कमी करण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत ?

१. डायरी लिहा :- 'नाईट एन्झायटी' कमी करण्यासाठी डायरी लिहिणे हा सर्वात सोपा उपाय असू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनात जे काही चालले आहे ते विचार एका डायरीत लिहा. यामुळे तुमचे मन मोकळे होईल.

२. झोपण्याच्या वेळेचे टाईमटेबल करा :- रात्री झोपण्याची एक वेळ निश्चित करुन आपल्या झोपण्याच्या वेळेचे टाईमटेबल तयार करा. 

प्या बडीशेप ओव्याचा हेल्दी चहा, वजन होईल झटपट कमी आणि पचनाच्या तक्रारीवर खास उपाय...

३. मोबाईल किंवा स्क्रिन पासून लांब राहा  :- रात्री झोपण्याच्या किमान एक तास आधी फोन बंद करुन स्वतःपासून दूर ठेवा. झोपण्यापूर्वी मोबाईल फोन वापरल्याने आपले मन स्वतःला आराम करण्यापासून रोखते यामुळे 'नाईट एन्झायटी'चा धोका वाढतो. त्याचबरोबर झोपण्यापूर्वी मोबाईलवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे कंटेट वाचतो, त्यानंतर आपण वाचलेल्या किंवा पाहिलेल्या गोष्टींवर विचार करत बसतो, याचा आपल्या झोपेवर परिणाम होतो. 

झटपट वजन घटवण्यासाठी खूप घाम गाळताय? थांबा, न्यूट्रिशनिस्ट सांगतात घाम आणि वजनाचा थेट संबंध...

४. ध्यान करा :- झोपण्यापूर्वी तुम्ही १० मिनिटे ध्यान करू शकता . हे तुमचे मन शांत करते, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो आणि तुम्हाला चांगली झोपही मिळते.

५. बेडरुम स्वच्छ करा :- जर तुमचा बेडरुम किंवा बेड झोपताना अस्वच्छ असेल तर तुमच्या मनातही असेच विचार येतात. त्यामुळे तुमचा बेडरुम आणि बेड  नेहमी व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवा.

Web Title: How to calm anxiety at night naturally Tips for beating anxiety to get a better night’s sleep How to Ease Anxiety at Night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.