Join us   

बेंबीत घाण साचल्याने मोठं इन्फेक्शन होतं, हे माहिती आहे का? पाहा उपाय आणि काळजी काय घ्यायची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2024 5:58 PM

Here’s Exactly How to Clean Your Belly Button : बेंबीत साचलेली घाण किंवा बॅक्टेरिया वाढले तर अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात म्हणून, ते योग्यरित्या स्वच्छ करणे फार महत्वाचे आहे...

निरोगी व हेल्दी राहण्यासाठी आपल्याला आरोग्यासोबतच शरीराची देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे.आपल्या शरीराची आतून - बाहेरुन अशा दोन्ही प्रकारे स्वच्छता राखली गेली पाहिजे. आपल्या शरीराची बाहेरुन स्वच्छता करण्यासाठी आपण नेहमी आंघोळ करतो. नेहमी आंघोळ करुन आपले शरीर आपण स्वच्छ ठेवतो. अंघोळ करताना आपण सगळ्या शरीराची स्वच्छता करतो खरे, परंतु यात काही शारीरिक अवयवांकडे दुर्लक्ष केले जाते. शक्यतो आंघोळ करताना आपण हात, पाय, चेहरा यांची दररोज स्वच्छता करतो. परंतु इंटिमेट एरिया, कानाच्या मागील भाग, पोटाची बेंबी (How to Clean Your Belly Button and Prevent Infection) यांसारख्या लहान जागांची स्वच्छता करणे थोडे कठीण काम असते(How To Clean Belly Button).

खरे तर आपण शरीराचा प्रत्येक अवयव स्वच्छ केला पाहिजे. विशेषतः पोटावरील बेंबी व्यवस्थित स्वच्छ करणे खूप महत्वाचे असते. या पोटाच्या बेंबीला  आपल्या शरीराचे केंद्र म्हणतात. या बेंबीत घाण किंवा बॅक्टेरिया वाढले तर अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. पोटावरील बेंबी हा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील भागांपैकी एक आहे. बेंबी स्वच्छ (Here’s Exactly How to Clean Your Belly Button) ठेवणे का महत्त्वाचे आहे आणि ती स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे हे जाणून घेऊया. आरोग्य प्रशिक्षक सिमरन कौर या पोटावरील बेंबीची स्वच्छता कशी ठेवावी याविषयी अधिक माहिती देत आहेत(The Right Way to Clean Your Belly Button).

पोटावरील बेंबीची स्वच्छता कशी करावी ? 

१. बेंबीची योग्य प्रकारे स्वच्छता न करणे, सतत घाम येऊन तो बेंबीत साचून राहणे किंवा इतर अनेक कारणांमुळे बेंबीची स्वच्छता न केल्यास बेंबीमध्ये संसर्ग होण्याची शक्यता असते. 

२. बेंबी लाल होणे, त्यातून चिकट स्त्राव येणे, जळजळ होणे किंवा नाभीत वेदना होणे ही नाभी संसर्गाची लक्षणे असू शकतात. 

३. नाभी संसर्ग टाळण्यासाठी, नाभी योग्य प्रकारे स्वच्छ करणे महत्वाचे असते. नाभी स्वच्छ करण्यासाठी, आपण कोमट पाणी आणि मीठ वापरू शकता.

रोज सकाळी ५ मिनिटं या ५ पदार्थांनी चेहऱ्याला करा मसाज, चाळीशी उलटली तरी चेहरा चमकेल...

४. मिठात अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात हे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. 

५. कोमट पाण्यांत मीठ घालून ते पाण्यात व्यवस्थित विरघळवून घ्यावे. या पाण्यात कापूस किंवा कोणतेही मऊ कापड भिजवून तुम्ही बेंबी आणि आजूबाजूचा भाग स्वच्छ करू शकता. त्यामुळे बेंबीत असलेले जंतू मरतात.

६. आंघोळ करतानाही नाभी पूर्णपणे स्वच्छ करणे गरजेचे असते. 

ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी पंपिंग करणे योग्य की अयोग्य ? तज्ज्ञ सांगतात अशी घ्या काळजी... 

७. पोटाच्या बेंबीला संसर्गापासून वाचवण्यासाठी, ती धुऊन स्वच्छ केल्यानंतर, कपड्याच्या मदतीने  ती संपूर्ण कोरडी करुन घ्यावी जेणेकरून बेंबीत पाणी शिल्लक राहणार नाही.

८. बेंबी अजिबात ओली ठेवू नये. विशेषत: जास्त घाम आल्यावरही बेंबी व्यवस्थित स्वच्छ करणे गरजेचे असते. 

९. झोपताना बेंबीमध्ये मोहरी किंवा कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने बेंबी स्वच्छ राहते आणि अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. नाभीमध्ये तेल लावल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स