Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > माठ धुवायचा राहिला की लगेच अळ्या होतात? माठ स्वच्छ करण्याची सोपी पद्धत वापरा; निरोगी राहा

माठ धुवायचा राहिला की लगेच अळ्या होतात? माठ स्वच्छ करण्याची सोपी पद्धत वापरा; निरोगी राहा

How to clean earthen water pot : गरमीच्या दिवसात माठातलं पाणी प्यायल्यास थकवा जाणवत नाही. या पाण्याच्या सेवनानं डोकंदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 04:02 PM2023-05-23T16:02:52+5:302023-05-24T13:01:23+5:30

How to clean earthen water pot : गरमीच्या दिवसात माठातलं पाणी प्यायल्यास थकवा जाणवत नाही. या पाण्याच्या सेवनानं डोकंदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.  

How to clean earthen water pot : Best way to clean your clay pots | माठ धुवायचा राहिला की लगेच अळ्या होतात? माठ स्वच्छ करण्याची सोपी पद्धत वापरा; निरोगी राहा

माठ धुवायचा राहिला की लगेच अळ्या होतात? माठ स्वच्छ करण्याची सोपी पद्धत वापरा; निरोगी राहा

उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांचीच थंड पाणी पिण्याची इच्छा होते. पण फ्रिजमधलं पाणी प्यायल्यानं अनेकदा सर्दी, खोकल्याचा त्रास होतो अशावेळी लोक फ्रिजचं पाणी पिणं टाळतात. माठात एकदा पाणी भरलं की २ ते ३ तासांनी थंडगार होतं. (Best way to clean your clay pots) माठातलं पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत म्हणूच लोक फ्रिजचं पाणी पिण्याऐवजी माठातलं पाणी पिण्याला जास्त महत्व देतात. कित्येक दिवस माठ धुण्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यात किडे, अळ्या होतात. दुषित पाणी प्यायल्यानं आजार होण्याची शक्यता असते. माठ धुण्याची योग्य पद्धत पाहूया. (How to clean earthen water pot)

१) जर तुम्हाला माठात थंड पाणी राहावं असं वाटत असेल तर अशा ठिकाणी ठेवा जिथे हवा खूप जास्त येते. असं केल्यानं पाणी बराचवेळ थंड राहतं.

२) कधीच माठ जमिनीवर ठेवू नका जमिनीवर एखादा स्टॅण्ड  ठेवल्यानंतर त्यावर माठ ठेवा. यामुळे पाणी सतत हलणार नाही आणि थंड राहील.

३) माठातलं पाणी नेहमी झाकून ठेवा. यामुळे पाणी थंड राहील आणि आत धूळ शिरणार नाही. 

४) जर तुम्ही माठाच्या तोंडाला  कॉटनचा कपडा बांधणार असाल तर पाणी स्वच्छ आणि थंड राहील.

५) माठातलं पाणी रोज बदला जर रोज बदलणं शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा पाणी बदला. याशिवाय माठ रोजच्या रोज स्वच्छ करत राहाल. माठ स्वच्छ करण्यासाठी कोणतंही केमिकल्सयुक्त पाणी वापरू नका.

माठ स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

सगळ्यात आधी माठातलं पाणी एका स्टिलच्या मोठ्या भांड्यात काढून घ्या. जेणेकरून पाणी स्वच्छ आहे की त्यात अळ्या पडल्या आहेत ते तुमच्या लक्षात येईल. नंतर माठात २ ते ३ ग्लास पाणी घालून माठ गोल फिरवा आणि ते पाणी बाहेर फेकून द्या.

थोड्या वेळानं  पुन्हा पाणी घालून एका कॉटनच्या कापडानं आतल्या बाजूनं माठ पुसून घ्या आणि ते पाणी बाहेर फेका. २ ते ३ वेळा सारख्या स्टेप्स रिपिट केल्यानं तुमचा माठ धुवून स्वच्छ होईल. त्यात ओल्या कापडानं माठाची बाहेरील बाजूही स्वच्छ करू शकता. 

माठातलं पाणी पिण्याचे फायदे

गरमीच्या दिवसात माठातलं पाणी प्यायल्यास थकवा जाणवत नाही. या पाण्याच्या सेवनानं डोकंदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.  पोटदुखी, एसिडीटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. मातीत शुद्धीकरण करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे विषारी पदार्थ शोषले जातात.

Web Title: How to clean earthen water pot : Best way to clean your clay pots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.