जर तुम्ही एखाद्याच्या घरात गेलात किंवा आपल्या घरी कोणी आलं आणि घर व्यवस्थित दिसत नसेल तर ऐनवेळी आवराआवर कशी करायची हा प्रश्न पडतो. जर एखादा पाहुणा घरात आला आणि त्याने अस्वच्छ घर पाहिले तर ते खूप खराब दिसू शकते. (Easy Cleaning Hacks) कधी-कधी आपलं घर घाण नसतं, पण कुठल्या ना कुठल्या कारणाने ते घाण दिसतं. घरात या चुका केल्या तर तुमचे घर नेहमीच अस्वच्छ दिसेल. (5 reasons why your house is looking messier) या लेखात घर झटपट आवरलं जाण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि घरही झटपट स्वच्छ होईल (Quickly Cleaning Tips)
१) टेबल, खर्च्यांवर जास्त सामान ठेवणं
जर तुम्ही टेबल, ड्रेसिंग टेबल, किचन काउंटर, साइड स्टँडवर भरपूर सामान ठेवलं असेल तर ते नेहमीच अस्वच्छ आणि अव्यवस्थित दिसेल. कारण त्यावर धूळ खूप लागू शकते. जर कपाटावर सामान ठेवला असेल तर धूळ बसते. म्हणून कमीत कमी सामान ठेवा आणि रोज कपाट, टेबलावर डस्टिंग करा.
रिसर्च-रोज आंबे खाल्ल्यानं कमी होतील म्हतारपणाच्या खुणा; पण किती प्रमाणात खायचा? जाणून घ्या
२) गरेजेपेक्षा जास्त अंथरूणं बाहेर काढणं
जर तुम्ही उशा, चादरी, बेडशीट जास्तीच्या वर काढून ठेवत असाल तर घरात नेहमीच पसारा असल्यासारखं जाणवेल. म्हणून लागेल तेव्हढेच सामान वर ठेवा. बाकीचे कपडे, उशांचे कव्हर्स घडी करून पलंगात किंवा पलंगाखाली झाकून ठेवून ठेवून द्या. उशा जागच्या जागी ठेवा. जर उशा इकडे तिकडे पडल्या असतील तर घर खूपच विचित्र दिसतं. बेडशीट, उशांच्या कव्हर्सना चुरगळ्या पडणार नाहीत याची काळजी घ्या.
३) कमी जागेत जास्त सामान
जर खोली अधिक रिकामी दिसली तर ती अधिक चांगली दिसू शकते. जर तुम्ही छोट्या जागेत खूप जास्त फर्निचर ठेवलं तर जास्त धूळ त्यावर बसते याशिवाय घरही अव्यवस्थित दिसते. जागा कमी असल्यास अडजस्टेबल बेड किंवा सोफा घरात ठेवा जेणेकरून जास्त जागा लागणार नाही.
४) खिडक्यांवर लक्ष न देणं
खिडक्या उघडणे, चांगले पडदे लावणे चांगले आहे, पण खिडकीच्या काचेवर धूळ साचत असेल तर ती रोज साफ करणे देखील आवश्यक आहे. त्याकडे लक्ष देणे थांबवले तर खिडक्या, लाकडी दरवाजे इत्यादींच्या काचेवर धूळही लवकर जमा होते. खिडक्या वारंवार साफ करूनही त्या धुळीमुळे घराला घाण करतात. दररोज खिडक्या उघडा आणि सूर्यप्रकाश आणि ताजी हवा घरात येऊ द्या आणि त्याच वेळी दररोज खिडक्या देखील स्वच्छ करा.
५) पडदे न धुणं
कार्पेट पडदे रोज धुणं शक्य होत नाही. याचा अर्थ असा नाही की पडदे कधीच स्वच्छ करायचे नाहीत. व्हॅक्यूम क्लिनरने तुम्ही पडदे स्वच्छ करू शकता. जेणेकरून पडदे जास्त दिवस टिकतील आणि त्यामुळे आपल्या घरात अस्वच्छताही कमी होते. कार्पेट, पडदे, टेबल कव्हर, टीव्ही कव्हर, फ्रीज कव्हर नियमितपणे साफ करत राहा.