Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चोंदलेलं नाक-सुजलेले सायनस आणि खोकलाही होईल कमी, करा ५ उपाय- फुप्फुसांची कार्यक्षमताही वाढेल

चोंदलेलं नाक-सुजलेले सायनस आणि खोकलाही होईल कमी, करा ५ उपाय- फुप्फुसांची कार्यक्षमताही वाढेल

How To Clean Lungs At Home and Detox Tips : फुफ्फुसांमध्ये खूपच लवकर टॉक्सिन्स जमा होतात. ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह थांबतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:20 AM2024-01-25T10:20:55+5:302024-01-25T13:34:23+5:30

How To Clean Lungs At Home and Detox Tips : फुफ्फुसांमध्ये खूपच लवकर टॉक्सिन्स जमा होतात. ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह थांबतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो.

How To Clean Lungs At Home and Detox Tips : 5 Natural Ways To Cleanse Your Lungs | चोंदलेलं नाक-सुजलेले सायनस आणि खोकलाही होईल कमी, करा ५ उपाय- फुप्फुसांची कार्यक्षमताही वाढेल

चोंदलेलं नाक-सुजलेले सायनस आणि खोकलाही होईल कमी, करा ५ उपाय- फुप्फुसांची कार्यक्षमताही वाढेल

थंडीत आरोग्यासंबंधी (Winter Care Tips) अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातील एक म्हणजे प्रदूषित हवा. सध्याच्या दिवसांत हा सगळ्यात चिंतेचा विषय आहे. (How to Clear My Lungs At Home) कारण याचा थेट परिणाम फुफ्फुसांवरही होतो. दुसरीकडे स्मोकींग, व्यायाम न करणं अशा समस्यामुळे नुकसान पोहोचते. (How to Detox And Cleanse Your Lungs Naturally) फुफ्फुसांमध्ये खूपच लवकर टॉक्सिन्स  जमा होतात. ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. (Tips to Cleanse Your Lungs)

वाफ घेणं (Right Way to Take Steam)

मेडिकल न्युज टु डे च्या रिपोर्टनुसार फुफ्फुसांना स्वच्छ करण्यासाठी स्टिम घेणं फायदेशीर ठरतं. (Ref) वायुमार्ग म्यूकस रिलिज करतो. प्रदूषित आणि थंड वातावरणात वायु मार्गात म्यूकस मेंब्रेन सुकते. जेव्हा तुम्ही वाफ घेता तेव्हा फुफ्फुसांना मॉईश्चरबरोबरच उष्णताही मिळते. ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत नाही. छातीत जमा झालेला कफ हळूहळू वितळू लागतो. स्टिम थेरेपी युकेलिप्टस, पेपरमिंट आणि टी ट्री ऑईल यांसारख्या तेलांचा बराच फायदा होतो.

ब्रिदींग टेक्निक

पल्मोनोलॉजिस्ट डॉ. कुट्टी शारदा विनोद यांनी दिलेल्या माहितीनुसार डिप ब्रीदिंग व्यायामाने तुम्हाला श्वास घेण्याचे त्रास उद्भवणार नाहीत. (Ref)हा व्यायाम करण्यसाठी हळूहळून तोंडातून श्वास सोडा आणि नंतर नाकाने दीर्घ श्वास घ्या.  ज्यामुळे छातीत जमा झालेला कप बाहेर निघण्यास मदत होते आणि ही प्रक्रिया  तुम्ही २ वेळा करू शकता.

दातांवर पिवळा थर आलाय, दुर्गंध येतो? किचनमधल्या ४ गोष्टींनी दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात

छातीतील कफ कमी  करण्यासाठी इतर उपाय

सीओपीडीमुळे फुफ्फुसांमुळे गरजेपेक्षा जास्त कफ जमा होतो. यामुळे सतत खोकला होतो,  खोकल्यामुळे फुफ्फुसांतील कफ पूर्णपणे कमी होत नाही. कंट्रोल्ड कफिंग आणि ब्रिदिंग व्यायामाने  कफ बाहेर काढू शकता आणि श्वास घ्यायला त्रास होण्याची समस्या कमी होते. ही टेक्निक अशा लोकांसाठी जास्त फायदेशीर असते  ज्यांना फुफ्फुसांच्या समस्या उद्भवतात.

रोज व्यायाम करा (Exercise For Lungs)

रेग्युलर व्यायाम केल्याने फक्त आरोग्यालाच नाही तर फुफ्फुसांच्या कार्य क्षमतेवरही चांगला परिणाम  होतो.  आठवड्यात ५ दिवसांत ३० मिनिटांचा वेळ काढून व्यायाम नक्की करा. यामुळ रेस्पिरेटरी सिस्टिम चांगली राहते आणि फुफ्फुसं चांगली राहण्यास मदत होते.

लंग्ज क्लिंजिंग डाएट (Foods For Lungs Cleaning)

एंटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन सी ने परीपूर्ण आहार घेतल्यास फुफ्फुसं  साफ होण्यास मदत होते. आहारात आंबट फळं,  पालेभाज्या, जांभूळ या फळांचा समावेश करा. यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि फुफ्फुसांतील सूज कमी होते. याव्यतिरिक्त आपल्या आहारात फळं, भाज्यांचा समावेश करा. आलं आणि हळद सगळ्यात उत्तम पर्याय आहेत. 

Web Title: How To Clean Lungs At Home and Detox Tips : 5 Natural Ways To Cleanse Your Lungs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.