Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कबुतरांच्या विष्ठेमुळे खूप घाण होते? ३ ट्रिक्स;बाल्कनी होईल स्वच्छ, कबुतरं राहतील लांब

कबुतरांच्या विष्ठेमुळे खूप घाण होते? ३ ट्रिक्स;बाल्कनी होईल स्वच्छ, कबुतरं राहतील लांब

How To Clean Pigeon Poop From Balcony : व्हिनेगर, भांडी धुण्याचे साबण,पाणी, स्क्रब पॅड, जंतुनाशक हे साहित्य वापरून तुम्ही बाल्कनी स्वच्छ करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 04:23 PM2022-06-15T16:23:11+5:302022-06-16T00:56:48+5:30

How To Clean Pigeon Poop From Balcony : व्हिनेगर, भांडी धुण्याचे साबण,पाणी, स्क्रब पॅड, जंतुनाशक हे साहित्य वापरून तुम्ही बाल्कनी स्वच्छ करू शकता.

How To Clean Pigeon Poop From Balcony : How to Clean Bird Droppings in Your Balcony | कबुतरांच्या विष्ठेमुळे खूप घाण होते? ३ ट्रिक्स;बाल्कनी होईल स्वच्छ, कबुतरं राहतील लांब

कबुतरांच्या विष्ठेमुळे खूप घाण होते? ३ ट्रिक्स;बाल्कनी होईल स्वच्छ, कबुतरं राहतील लांब

प्रत्येकाला घराच्या बाल्कनीत थोडा वेळ घालवायला आवडतं.  तुमची बाल्कनी सजवण्यासाठी तुम्ही लहान रोपे देखील लावू शकता. जेणेकरून ते ठिकाण फ्रेश राहील आणि ताजा सुगंध येईल. (Home Cleaning Tips) पण वारंवार बाहेर घालवूनही बाल्कनीत कबुतरं येतात. कधी विष्ठा तर कधी बारीक बारीक पिसांमुळे कबुतरं गॅलरी खराब करतात. यामुळे आरोग्यास धोका उद्भवू शकतो. (How to Clean Bird Droppings in Your Balcony)

याशिवाय कबुतरांच्या घाणीमुळे महिलाही त्रस्त आहेत. बाल्कनीत दुर्गंधी पसरते. तुम्हालाही कबुतरांच्या विष्ठेचा त्रास होत असेल तर लवकरात लवकर तुमची बाल्कनी स्वच्छ करा. (Cleaning Pigeon Droppings & Bird Droppings) आज आम्ही तुमच्यासाठी असे काही उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता. (How do you get dried bird poop off a balcony)

१) बाल्कनी कशी स्वच्छ करायची?

व्हिनेगर, भांडी धुण्याचे साबण,पाणी, स्क्रब पॅड, जंतुनाशक हे साहित्य वापरून तुम्ही बाल्कनी स्वच्छ करू शकता.  कबूतरांच्या घाणीमुळे ऍलर्जी होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ऍलर्जी टाळण्यासाठी फेस मास्क आणि हातमोजे घाला. बाल्कनीतले डाग स्वच्छ करण्यासाठी, व्हिनेगर आणि डिश वॉशिंग द्रव वापरा. यासाठी 1 कप व्हिनेगर, 1 कप पाणी आणि 2 चमचे डिश वॉशिंग लिक्विड मिसळा. हे मिश्रण लावून १५ मिनिटं तसेच सोडा.  

नळातून कमी वेगानं पाणी येतं? ४ ट्रिक्स वापरा, प्लंबरला न बोलावताच पाण्याचा वेग वाढेल

नंतर ब्रशने स्क्रब करा. साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. एकदा साफ केल्यानंतर, स्वच्छता राखण्यासाठी पृष्ठभाग जीवाणू मुक्त करणे देखील आवश्यक आहे. फ्लोअर क्लीनरनं फरशी बॅक्टेरियामुक्त करा ज्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईट सक्रिय घटक असेल ज्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतील.

घरातल्या तुटलेल्या फरश्या रिपेअर करण्यासाठी ३ ट्रिक्स वापरा; घर नेहमी दिसेल नीटनेटकं

आता, डिस्पोजेबल मायक्रो फायबर कापड वापरून तुमच्या बाल्कनीतून फ्लोअर क्लिनर पुसून टाका. हट्टी डागांसाठी, फ्लोअर क्लिनर थेट डागावर घाला आणि ते पुसण्यापूर्वी 10 मिनिटे थांबा. कबुतरांची घाण स्वच्छ करण्यासाठी  बाल्कनीचा मजला पाण्याने धुवावा. यामुळे घाणेरडा वास निघून जाईल आणि फ्रेश वाटेल. 

२) बाल्कनीत कबुतरं येऊ नये यासाठी उपाय

कबूतरांना व्हिनेगर आणि बेकिंग सोडाचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे या दोन गोष्टींचे मिश्रण करून बाटलीमध्ये स्प्रे तयार करा आणि ज्या ठिकाणी कबुतरे येतात त्या ठिकाणी फवारणी करा.

कबूतरांना दालचिनीचा वासही आवडत नाही. त्यामुळे पाण्यात दालचिनी टाकून उपाय तयार करा आणि तुमच्या बाल्कनीमध्ये शिंपडा. असे करूनही कबुतर त्या ठिकाणी येत नाहीत.

१ नंबर! २५ वर्ष जुनं घर रिसायकल करून बांधला इको फ्रेंडली बंगला; ना AC ची गरज, ना पुराची भिती

३) खबरदारी बाळगा

कबुतरांचा कचरा, विष्ठा मानवांसाठी हानिकारक असू शकतात. म्हणूनच कबूतरांची विष्ठा साफ करताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. साफसफाई करताना फक्त हातमोजेच नाही तर मास्क, कव्हर शूज आणि पॅंट आणि पूर्ण बाह्यांचा टॉप घालूनच स्वच्छ करा. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांनी कबूतरांची विष्ठा साफ करू नये. नकळतपणे आजार पसरण्याची भिती असू शकते. त्यामुळे योग्य ती खबरदारी बाळगावी.

Web Title: How To Clean Pigeon Poop From Balcony : How to Clean Bird Droppings in Your Balcony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.