Join us   

सकाळी-सकाळी पोट नीट साफच होत नाही? दिवसभर अस्वस्थ होतं, डॉक्टर सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2023 1:45 PM

How To Clean Stomach In Morning Tips for Constipation Problem: पोट साफ व्हावं असं वाटत असेल तर जीवनशैलीत बदल गरजेचे

सकाळी झोपेतून उठल्यावर पोट नीट साफ झालं तर ठिक नाहीतर दिवसभर अस्वस्थ होत राहतं. अनेकदा झोप नीट न झाल्याने, पाणी कमी प्यायल्याने किंवा आणखी काही कारणाने आपला कोठा जड होतो आणि सकाळी उठल्या उठल्या आपल्याला प्रेशर येत नाही. अनावश्यक घटक पोटात साठून राहीले की आपल्याला एकतर पोट जड झाल्यासारखे वाटते किंवा फ्रेश वाटत नाही. मग पूर्ण दिवस आळसावलेला किंवा कंटाळवाणा जातो. यालाच आपण बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टीपेशन झाले असे म्हणतो (How To Clean Stomach In Morning Tips for Constipation Problem). 

पोट साफ न होण्यामागे बद्धकोष्ठता, फिशर यांसारखी काही महत्त्वाची कारणे असतात. त्यांचा वेळीच शोध घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. याबाबत प्रसिद्ध डॉ. रविंद्र काळे सांगतात, सतत पेनकिलरच्या गोळ्या घेणे, फायबरयुक्त आहार न घेणे, झोप कमी होणे ही बद्धकोष्ठता होण्यामागची मुख्य कारणे असतात. शरीर आपल्याला उपयुक्त नसणारे घटक शरीराच्या बाहेर टाकते. मात्र बद्धकोष्ठता झाल्यास या क्रियेत अडथळा येतो आणि पोट साफ होण्यास कष्ट पडतात.

(Image : Google)

बद्धकोष्ठता हा आजार नसून आरोग्याच्या इतर समस्यांना कारणीभूत ठरणारे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते. कारण पोट वेळच्या वेळी साफ झाले नाही तर शरीराच्या इतर क्रियेत अडचणी येतात. त्यासाठी आहारात फळं, सलाड, डाळी यांचा योग्य प्रमाणात समावेश करायला हवा. नियमित व्यायाम करणे, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना कोमट पिणे, अन्न नीट चावून खाणे या गोष्टी योग्य पद्धतीने केल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता ही आपल्या चुकीच्या जीवनशैलीचे एक महत्त्वाचे लक्षण असून वेळीच जीवनशैलीत बदल केल्यास पोट वेळच्या वेळी साफ होण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल