Join us   

दातांवर पिवळा-चिकट थर दिसतो? अमेरीकन डेंटिस्ट सांगतात ५ गोष्टी करा-पांढरेशुभ्र होतील दात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 2:29 PM

How To Clean Teeth : तुम्हाला नैसर्गिकरित्या दात चमकवायचे असतील तर तुम्ही  काही घरगुती उपाय करू शकता.

आजकाल दात चमकवण्यासाठी बाजारात बऱ्याच ट्रिटमेंट दिसून येतात. ऑईल पुलिंगपासून कोळसा रगडण्यापर्यंत अनेक उपाय आहेत ज्यामुळे दातांवर चमक येते. (Effective Ways To Make Your Yellow Teeth To Whiten) पांढऱ्या दातांमुळे फक्त चेहऱ्याची चमक वाढत नाही तर सौंदर्यातही भर पडते. दांताचा पिवळेपणा दूर करण्यासाठी ओरल हायजीनवर लक्ष देणं फार महत्वाचे असते. अन्यथा दातांवर टार्टर आणि प्लाक जमा होते. (How To Clean Teeth)

दात स्वच्छ करण्याचे उपाय

अमेरिकन डेंटल असोशियेशनद्वारे सांगण्यात आलेले उपाय करून तुम्ही पांढरेशुभ्र चमकदार दात मिळवू शकता. डेटिंस्टकडे जाऊन हजारो रूपये खर्च करण्यापेक्षा पण जर तुम्हाला नैसर्गिकरित्या दात चमकवायचे असतील तर तुम्ही  काही घरगुती उपाय करू शकता. (American Dental Association Told 6 Effective Ways To Make Your Yellow Teeth To Whiten)

आंबट फळांच्या सेवनाने दात पांढरे होतात का?

काही लोकांना असे वाटते की लिंबू,  संत्री,  एप्पल सायडर व्हिनेगर, अननस किंवा आंबा आणि बेकींग सोडा यांसारख्या पदार्थांचा वापर दातांवर केल्याने दात चमकदार दिसण्यास मदत होते. पण एडीएच्या रिपोर्टनुसार यामुळे दातांची वरची लेअर कमकुवत होऊ शकते. दातांच्या सुरक्षेसाठी वरची लेअर महत्वाची असते जी दातांना कॅव्हिटीजपासून बचाव बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरते.

चारकोल लावल्याने दात  पांढरे होतात का?

या पद्धतीने चारकोल किवा बेकींग सोडा, हायड्रोजन पेरोक्साईडची पेस्ट लावल्याने दातांचा चमकण्यास मदत होईल. एडीएच्या रिपोर्टनुसार असा कोणताही पुरावा नाही की ज्यामुळे दिसून येईल दातांच्या सुरक्षेसाठी कोळसा प्रभावी ठरतो. 

हळदीचा वापर केल्यानं दात स्वच्छ राहतात का?

तोडात नारळाचे तेल घालून ऑईल पुलिंग केल्यानं किंवा हळदीसारख्या मसाल्यांचा वापर केल्यानं दात स्वच्छ  राहण्यास मदत होतेच असं नाही. याचा कोणताही  पुरावा नाही की ऑईल पुलिंग केल्याने दात पांढरे चमकदार राहण्यास मदतहोते. तेल आणि मसाले थेट लावण्यापासून दातांचा बचाव करा. 

दात चमकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती (How To Whiten Yellow Teeth At Home)

१) दातांना दिवसातून २ वेळा ब्रश करा

२) एडीए सील ऑफ  एक्सेंप्टेंस असलेल्या व्हाईटनिंग टुथपेस्टचा वापर करा

३) दिवसातून कमीत कमी एकदा दात स्वच्छ करा. 

४) कॉफी, चहा आणि रेड वाईन यांसारख्या पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करा.

५) धुम्रपान करू नका. दात क्लिन ठेवण्यासाठी नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य