Join us   

पिवळे दात, हिरड्या काळ्या पडल्यात? फक्त ३ दिवस 'हा' उपाय करा, मोत्यासारखे चमकतील दात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 1:33 PM

How to clean yellow teeth : जर तुमचे दात किंवा दाढ किडायला सुरूवात झाली तर हजारो रुपये खर्च करून पुन्हा नवीन दात बसवावे लागतात.

दात पिवळे (Yellow Teeth) पडण्याचं मुख्य कारण दातांची व्यवस्थित स्वच्छता न करणं हे असू शकतं. दातांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर त्यावर पिवळा थर जमा होतो. कालांतराने दात काळे-पिवळट दिसू लागतात. याला प्लाक असं म्हणतात. काहीजण रोज स्वच्छ ब्रश करतात तरीही त्यांचे दात पिवळे दिसतात. सतत चहा-कॉफी घेणं, काहीही खाल्ल्यानंतर चूळ न भरणं ही यामागची कारणं असू शकतात. (How to Whiten Yellow Teeth)

जर तुमचे दात किंवा दाढ किडायला सुरूवात झाली तर हजारो रुपये खर्च करून पुन्हा नवीन दात बसवावे लागतात. दात पिवळे असतील तर चारचौघात बोलताना किंवा हसताना अवघडल्यासारखंही वाटतं. काही सोपे घरगुती उपाय तुमचे दात मोत्यांसारखे चमकवण्यास मदत करू शकतात. (How to clean yellow teeth)

पांढऱ्याशुभ्र दातांसाठी घरी टुथपेस्ट तयार कशी करायची?

पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी आणि प्लाक काढून टाकण्यासाठी तुम्ही घरीच एक पेस्ट तयार करू शकता. ही पेस्ट बनवण्यासाठी एक चमचा मीठ, थोडा लिंबाचा रस आणि मोहोरीचं तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या ब्रशला लावून दात स्वच्छ करा. यातील एंटी बॅक्टेरियल आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण दातांवर चांगला परीणाम करतात. (Teeth Whitening At Home In Marathi)

दातांचा पिवळेपणा घालवण्याचे घरगुती उपाय

१) दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. बेकिंग सोड्याचा वापर प्लाक काढून टाकण्यासाठी केला जातो. यासाठी तुम्ही टुथपेस्टमध्ये बेकींग सोडा मिसळा आणि २ ते ३ आठवडे दातांवर ब्रश करा. यामुळे दातांवर चांगला परीणाम दिसेल. 

२) याशिवाय फळांची सालंही दात स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरतात. ताज्या संत्र्याचे किंवा केळीचे साल रोज रात्री झोपण्याआधी दातांवर घाला. यामुळे दातांची चांगली स्वच्छता होते याशिवाय तोंडाच्या दुर्गंधीपासूनही आराम मिळतो. 

३) नारळाच्या तेलानं ऑईल पुलिंग (Coconut Oil Pulling)  करणं फायदेशीर ठरतं. ऑईल पुलिंग केल्यानं दातांच्या कानाकोपऱ्यात लपलेली घाण आणि प्लाक बाहेर निघण्यास मदत होते. ऑईल पुलिंग करण्यासाठी तुम्हाला तोंडात नारळाचं तेल घालून २ ते ३ वेळी फिरवून गुळणी करावी लागेल.  

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य