Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोट साफ - आतडी तंदुरुस्त ठेवायची? करा ४ स्टेप्स, २१ दिवसात वजन घटेल - त्वचाही चमकेल

पोट साफ - आतडी तंदुरुस्त ठेवायची? करा ४ स्टेप्स, २१ दिवसात वजन घटेल - त्वचाही चमकेल

How to clean your stomach and intestines? : आपले पोट आणि आतडे नैसर्गिकरित्या कसे स्वच्छ करावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 04:51 PM2024-07-25T16:51:18+5:302024-07-25T16:52:26+5:30

How to clean your stomach and intestines? : आपले पोट आणि आतडे नैसर्गिकरित्या कसे स्वच्छ करावे?

How to clean your stomach and intestines? | पोट साफ - आतडी तंदुरुस्त ठेवायची? करा ४ स्टेप्स, २१ दिवसात वजन घटेल - त्वचाही चमकेल

पोट साफ - आतडी तंदुरुस्त ठेवायची? करा ४ स्टेप्स, २१ दिवसात वजन घटेल - त्वचाही चमकेल

शरीराचे आरोग्य बऱ्याच प्रमाणात पोटावर अवलंबून असते (Health tips). पोट स्वतः अन्नाचे पचन करते आणि अन्नातील पोषक तत्वे शोषून घेते आणि शरीराच्या विविध भागांमध्ये पोहोचवते (Stomach). पण पोटाचे आरोग्य चांगले नसेल तर, पोटाच्या संबंधित विविध विकार वाढू लागतात (Gut Health). यासाठी हेल्दी पदार्थ खाणं गरजेचं आहे.

केवळ पोटच नाही तर आतडेही स्वच्छ असणे गरजेचे आहे. पोटातली घाण आणि आतडे स्वच्छ करण्यासाठी, पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी सांगितलेल्या सोप्या ४ स्टेप्स फॉलो करून पाहा. यामुळे नक्कीच आतडे आणि पोटाचे आरोग्य निरोगी राहील(How to clean your stomach and intestines?).

आतडे स्वच्छ कसे करावे?


पोषणतज्ज्ञ सांगतात, पोटाचे आरोग्य आणि आतडेचे आरोग्य भूक आणि चयापचय नियंत्रित करते. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल, शिवाय त्वचा आणि केसांच्या संबंधित समस्या सोडवायचं असेल तर, आतडे आणि पोटाचे आरोग्य निरोगी ठेवावे लागेल.

किडनी स्टोन असेल तर 'हे' ४ पदार्थ खाणे टाळावेत, धोका वेळीच टाळा

पहिली स्टेप

आतडे आणि पोटाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी, आपण ३ दिवस फक्त ज्यूस पिऊ शकता. यामुळे फळातील पौष्टीक घटक शरीराला योग्यरित्या मिळेल. शिवाय शरीरातील घाणेरडे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होईल. यासाठी आपण बीटरूट ज्यूस, गाजर ज्यूस, काकडी आणि कोथिंबिरीचा रस पिऊ शकता.

दुसरी स्टेप

पुढील २१ दिवसांसाठी साखर, ग्लूटेन, दुग्धजन्य पदार्थ, अँटीबायोटिक्स, अनहेल्दी फॅट्स, अॅल्कोहल, स्वीटनर्स आणि पॅक्ड फूड्स खाणं टाळा. यामुळे पोट साफ आणि आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत होईल.

तिसरी स्टेप

पुढील २१ दिवसांसाठी आंबवलेले पदार्थ, भाज्यांचे रस, ताज्या फळांचे रस, फळे, सीड्स, कडधान्य हे पौष्टीक पदार्थ खा. आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, गुड फॅट्स, व्हिटॅमिन आणि खनिजे असलेल्या पदार्थांचा समावेश करा.

दाताला ब्रेसेस लावल्या? ४ गोष्टी खाणं टाळा; दात किडतील - दुखणं वाढेल

चौथी स्टेप

पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी या संपूर्ण प्रक्रियेनंतर २१ दिवसांनी संतुलित आहार घ्यावा. आहारातून वगळलेल्या पदार्थांचा पुन्हा समावेश करावा. आहारामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, प्रथिने, गुड फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असावीत.

Web Title: How to clean your stomach and intestines?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.