Join us

दात पिवळे-दाढांनाही कीड लागली? डेंटिस्ट सांगतात ३ उपाय, दात होतील पांढरेशुभ्र-दुखणंही कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:52 IST

How To Clean Your Yellowish Teeth Within One Weak : दातांची योग्य काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

दातांमुळे तुमच्या पर्सनॅलिटीवरही परिणाम होत असतो. दात चांगले स्वच्छ दिसावेत यासाठी बरेच लोक दिवसातून २ वेळा ब्रश करतात पण व्यवस्थित ब्रश करूनही दातांवर चांगला परीणाम दिसत नाही. काही सोपे उपाय करून तुम्ही चमकदार दात मिळवू शकता क्लोव्ह डेंटलच्या डेंटिस्ट डॉ. शिल्पी कौर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. दात स्वच्छ ठेवण्यासाठी आणि दातांवर चमक आणण्यासाठी काय करावं, काय करू नये ते समजून घ्यायला हवं. (How To Clean Your Yellowish Teeth Within One Weak Dr Explains Tips To Whiten Teeth)

डॉ. शिल्पी कौर यांनी सांगितले की मीठ आणि तेल मिसळून दातांवर रगडून घ्या. जुन्या काळात काही लोक हा उपाय करत असत. तुम्ही रेग्युलर काही दिवस हा उपाय केल्यास दातांवरील इनॅमल निघून जाईल. दातांवर मीठ आणि तेल घाला. बेकींग सोड्याचा  वापर दातांवर कधीच करू नका. यामुळे दात अधिकच खराब होऊ शकतात.

या ३ उपयांनी दात पांढरेशुभ्र राहतील 

1) गरम पाणी आणि मीठ

एप्पल वूड डेंटलच्या रिपोर्टनुसार हा उपाय केल्यानं तोंडाचा दुर्गंध येत नाही, तोडांची पीएच लेव्हल मेंटेन राहते. हिरड्यांमधून रक्त येण्याचा त्रास थांबतो, रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स होत नाहीत, डॉ. सांगतात की दातांच्या पिवळेपणाचे कारण बॅक्टेरिया, फंगस  हे आहे (Ref). दात व्यवस्थित स्वच्छ न केल्यामळे दातांना ही कीड लागते आणि दातांमध्ये कॅव्हिटीज तयार होतात. हा एक सोपा उपाय आहे. कोमट पाण्यात मीठ घालून पाण्याने गुळण्या करा. यामुळे दात आणि हिरड्यांना बॅक्टेरियाजपासून मुक्ती मिळेल. 

2) ऑईल पुलिंग

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही ऑईल पुलिंगची मदत घेऊ शकता. ऑईल पुलिंग करण्यासाठी कोणतंही तेल घ्या आणि तोंडात घाला तेल घश्यात जाऊ न देता तोंडाच्या चारही बाजूंना फिरवा. यासाठी तुम्ही  नारळाच्या तेलाचा वापर करू  शखता. नारळाचे तेल बॅक्टेरियाज आणि दातांची कॅव्हिटी काढून टाकण्यास मदत करते. 

जेवणाआधी पाणी प्यायलं की वजन वाढत नाही? तज्ज्ञ सांगतात वजन कमी करण्याासाठी पाणी कसं प्यावं

3) हायड्रोजन पेरॉक्साईड

हा केमिकली ट्रिटेट उपाय आहे. म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साईड एक केमिकल आहे जे दातांवर घासावं लागतं. यात नॅच्युरल ब्लिचिंग एंजंट असतात आणि  दातांतील बॅक्टेरिया वाढतात याशिवाय दात स्वच्छ  दिसू लागतात.

4) दातांसाठी खास डाएट

फास्ट फूड, जंक फूड खाऊ नका.  फळांमध्ये संत्र्याचे सेवन करा.  संत्री, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी या पदार्थांचा आहारात समावेश करा.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल