सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठ्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार होणे फारच कॉमन आहे. हिवाळ्यात होणाऱ्या सर्दीमुळे अनेकदा आपले नाक चोंदले (Ayurvedic Remedy For Blocked Nose & Congestion In Winter Season) जाते. एकदा सर्दी झाली की पुढेच काही दिवस या सर्दीने हैराण होते. सर्दीमुळे काहीवेळा आपल्याला दोन्ही नाकपुड्या चोंदतात. सर्दीने नाक चोंदण्याच्या समस्येमुळे नाकपुड्या बंद होऊन काहीवेळा (How to Clear a Stuffy Nose & Congestion During Winter Season) श्वास घ्यायलाही त्रास होतो. ही समस्या विशेषतः रात्रीच्या वेळी प्रचंड वाढते. बंद नाकामुळे नीट श्वास घेता येत नाही. त्यामुळे नीट झोप देखील लागत नाही. आणि याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. (Stuffy nose in winter? Try this home remedy).
नाक चोंदण्याची समस्या आपला संपूर्ण दिवस, रुटीन आणि रात्रीची झोप देखील खराब करते. अशावेळी श्वास घेणंही कठीण होतं. नाक चोंदण्यामुळे कित्येकदा बोलण्यात किंवा ऐकण्यातही अडचण येते. नाक चोंदण्याने (Natural Remedy for Congestion Relief & Stuffy Nose) आपले नाक आणि डोके अनेकदा दुखू लागते. सर्दीमुळे चोंदलेल नाक मोकळं करण्यासाठी लगेच केमिकल्सयुक्त औषध, गोळ्या, सीरप घेण्यापेक्षा प्राथमिक घरगुती उपचार करणे अधिक फायदेशीर ठरते. चोंदलेल नाक मोकळं करण्यासाठी आपण एका जादुई पोटलीचा वापर करू शकतो. या पोटलीमध्ये नेमकं कोणते जिन्नस घालावेत किंवा ही आयुर्वेदिक पोटली कशी तयार करायची ते पाहूयात.
सर्दीमुळे नाक बंद झालं असेल तर उपाय...
सर्दीमुळे नाक बंद झालं असेल किंवा चोंदल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असेल तर काय उपाय करायचा, याची माहिती nuttyovernutritionn या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. ही आयुर्वेदिक पोटली घरच्याघरीच कशी तयार करायची ते पाहा.
साहित्य :-
१. कापूर - १० ते १२ कापराच्या वड्या
२. ओवा - १ ते २ टेबसलस्पून (भाजलेला ओवा)
३. लवंग - ५ ते ६ काड्या
४. मेंथॉल क्रिस्टल - ६ ते ७ (मेंथॉल क्रिस्टलच्या काड्या)
५. निलगिरी तेल - ६ ते ७ ड्रॉप्स
६. कॉटनचे कापड - १ छोटासा रुमाल
कॉमेडियन भारती सिंह सांगते, केस काळे करण्याचा सुपरहिट फॉर्म्युला, पांढऱ्या केसांची चिंताच सोडा....
कृती :-
सगळ्यात आधी एक पातळसर कॉटनचा रुमाल घ्यावा. या रुमालाच्या बरोबर मध्य भागात सर्वात आधी कापूर वड्या ठेवाव्यात. त्यानंतर भाजलेला ओवा, लवंग, मेंथॉल क्रिस्टलच्या काड्या असे सगळे घटक एकत्रित ठेवून द्यावेत. त्यानंतर सगळ्यात शेवटी या सगळ्या घटक पदार्थांवर निलगिरीच्या तेलाचे ६ ते ७ थेंब ड्रॉपरच्या मदतीने घालावेत. त्यानंतर हे सगळे जिन्नस त्या रुमालाच्या बरोबर मध्य भागीच राहतील असे ठेवून रुमालाची चारही टोक एकत्रित करून रुमालाला गाठ बांधून त्याची पोटली तयार करून घ्यावी.
काय सांगता? चक्क प्राण्यांसारखे चालून व्हा फिट, अंशुका परवानी सांगते फिटनेसचा अनोखा फंडा...
'या' ५ व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे महिलांच्या हृदयाचे आरोग्य येते धोक्यात, जीव वाचवायचा तर...
या पोटलीचा वापर कसा करावा ?
सर्दीमुळे जर नाक चोंदलं असेल तर चोंदलेले नाक मोकळं करण्यासाठी आपण या खास आयुर्वेदिक पोटलीचा वापर करणार आहोत. या पोटलीमध्ये काही आयुर्वेदिक पदार्थ घेऊन त्याची पोटली बांधायची. मग ही बांधलेली पोटली नाकाजवळ घेऊन जाऊन त्यातून येणारा सुगंध नाकावाटे आत ओढायचा आहे. दिवसभरात जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तसे ही पोटली नाकाजवळ धरून त्याचा वापर करायचा आहे. या आयुर्वेदिक पोटलीच्या वापराने आपलं चोंदलेल नाक अगदी मिनिटभरात मोकळं होण्यास विशेष मदत मिळते.