Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > १ कप गुलकंद सरबत उन्हाळ्यात रोज प्या! कॉन्स्टिपेशनचा भयंकर त्रास, ॲसिडिटी - गायब!

१ कप गुलकंद सरबत उन्हाळ्यात रोज प्या! कॉन्स्टिपेशनचा भयंकर त्रास, ॲसिडिटी - गायब!

How to consume Gulkand for constipation and acidity? उष्णता वाढल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या अनेक त्रासांवर औषध म्हणून १ चमचा गुलकंद ठरतो गोड उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 04:07 PM2023-05-22T16:07:51+5:302023-05-22T17:24:04+5:30

How to consume Gulkand for constipation and acidity? उष्णता वाढल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या अनेक त्रासांवर औषध म्हणून १ चमचा गुलकंद ठरतो गोड उपाय

How to consume Gulkand for constipation and acidity? | १ कप गुलकंद सरबत उन्हाळ्यात रोज प्या! कॉन्स्टिपेशनचा भयंकर त्रास, ॲसिडिटी - गायब!

१ कप गुलकंद सरबत उन्हाळ्यात रोज प्या! कॉन्स्टिपेशनचा भयंकर त्रास, ॲसिडिटी - गायब!

बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या कोणाला कधीही होऊ शकते. अनेकांना जंक फूड खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठता व ॲसिडिटीचा त्रास होतो. काहींना ॲसिडिटीचा त्रास दररोज होतो. पण हे लोकं या समस्येला दुर्लक्ष करतात. पण या समस्येला दुर्लक्ष न करता त्यावर उपाय करणं आवश्यक आहे. बद्धकोष्ठतेची समस्या, पोट नीट साफ न होणे, ॲसिडिटीचा त्रास, या समस्यांवर एक घरगुती उपाय आपल्याला मदत करू शकेल.

यासंदर्भात, डायटीशियन रिद्धिमा बत्रा यांनी एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ज्यात त्यांनी या समस्यांवर उपाय म्हणून गुलकंद सरबत या रेसिपीची कृती शेअर केली आहे. या उपायामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या कमी होईल व आपल्याला आराम मिळेल(How to consume Gulkand for constipation and acidity?).

गुलकंद सरबतचे फायदे

गुलकंद सरबताचे सेवन केल्याने शरीराला अनेक पौष्टीक घटक मिळतात. यातील पौष्टीक गुणधर्म आतड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करते. ज्यामुळे पोटातील चांगले बॅक्टेरिया व म्यूकस वाढण्यास मदत होते. या कारणामुळे पोट साफ राहते.

जर सकाळी तुमचे पोट साफ होत नसेल तर, गुलकंदाचे सरबत प्या. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या दूर होते. तसेच अँटी-अ‍ॅसिडिटी गोळ्यांमुळे शरीराला झालेले नुकसान दुरुस्त करते.

ताक आणि राजगिरा खाऊन सुटलेलं पोट कमी होईल? खा ५ गोष्टी, सोपा आहार - पाहा बदल

डिंकाच्या सेवनाने पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. सब्जा सीड्समध्ये पेक्टिनसह फायबर आढळते. पेक्टिन हे प्रीबायोटिक आहे. जे चयापचय सुधारण्यास आणि आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढविण्यात मदत करते. त्यामुळे ॲसिडिटीही कमी होते.

गुलकंदाचे सरबत करण्यासाठी लागणारं साहित्य

सब्जा सीड्स

डिंक

गुलकंद

दूध

कृती

भात खाल्ल्याने वजन वाढते, मग पोहे खा! तज्ज्ञ सांगतात, भरपूर भाज्या घालून पोहे खाण्याचे फायदे

सर्वप्रथम, एका ग्लासमध्ये एक चमचा गुलकंद, २ टेबलस्पून भिजवलेले चिया सीड्स, २ चमचे भिजवलेले डिंक, व २०० मिली दूध घालून मिश्रण चांगले मिक्स करा. साहित्य एकत्र मिक्स केल्यानंतर त्यात २ टेबलस्पून ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा. अशा प्रकारे गुलकंदाचे सरबत रेडी. 

Web Title: How to consume Gulkand for constipation and acidity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.