Join us   

जेवताना फक्त ३ गोष्टींची काळजी घ्या- ब्लड प्रेशर वाढण्याचं टेन्शन विसरा, वाचा डॉक्टरांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2024 9:14 AM

3 Tips To Control Blood Pressure: रक्तदाब नेहमीच नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावं, याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेली माहिती... (How to control blood pressure?)

ठळक मुद्दे याशिवाय रोजच्या रोज थोडा का असेना पण व्यायाम होईल, याकडे लक्ष द्यावे. 

रक्तदाब किंवा ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. हल्ली आपण बघतो की प्रत्येक घरात रक्तदाब नियंत्रित ठेवणाऱ्या गोळ्या- औषधी घेणारी एक तरी व्यक्ती असतेच. प्रत्येक गोष्टीचा वाढलेला ताण आणि जीवनशैलीमध्ये झालेला बदल यामुळे हल्ली कमी वयातच हा आजार गाठू लागला आहे (3 tips to control blood pressure). या आजाराविषयी जनजागृती म्हणूनच १७ मे हा दिवस World Hypertension Day म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने तज्ज्ञ अशी माहिती सांगत आहेत की रोजचा आहार घेताना आपण काही ठराविक गोष्टींकडे लक्ष दिले तर त्यामुळे आपला रक्तदाब नेहमीच कंट्रोलमध्ये राहू शकतो.(How to control blood pressure?)

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी?

 

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी खाण्या- पिण्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी याविषयी डॉ. हेमंत रे यांनी दिलेली माहिती झी न्यूजने प्रकाशित केली आहे. त्यानुसार आहार घेताना ३ गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

 वाढणाऱ्या वजनाचं टेंशन आलं? ९-१ चा हा घ्या सोपा फॉर्म्युला, महिनाभरात घटेल चरबी

१. तळलेले पदार्थ टाळा

जर तुम्ही नेहमीच तळलेले पदार्थ अधिक प्रमाणात खात असाल तर तुमचा रक्तदाब वाढण्याचा धोका जास्त असतो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यातून शरीरात सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट जास्त प्रमाणात जातात. ते शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. 

 

२. मीठ 

जेवणात वरून मीठ घेण्याची सवय अनेकांना असते. याशिवाय आपल्या आहारात बऱ्याचदा खारवलेली लोणची असतात. याचा परिणाम शरीरातील सोडियमची पातळी वाढविण्यावर होतो.

स्वयंपाक चविष्ट करता पण अन्नातलं पोषणच गायब? ICMR सांगते, तुम्हीही 'या' चूका करताय..

सोडियम जास्त प्रमाणात असेल आणि पोटॅशियम कमी प्रमाणात असेल तर त्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे खूप मीठ खाऊ नका. तसेच पोटॅशियम असणारे पदार्थ आवर्जून खा.

 

३. पौष्टिक पदार्थ खा

आहारातील जंकफूडचे प्रमाण बऱ्याच जणांच्या बाबतीत वाढले आहे. यातून पोटात खूप जास्त मीठ, साखर जाते.

राखी सावंतच्या गर्भाशयात ट्यूमर! का होतो हा आजार- कशी ओळखाची लक्षणं? तज्ज्ञ सांगतात....

ते शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे जंकफूड टाळावे किंवा खूपच कमी प्रमाणात खावे. याशिवाय रोजच्या रोज थोडा का असेना पण व्यायाम होईल, याकडे लक्ष द्यावे. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न