Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वाढलेली शुगर घटवण्यासाठी पेरूची पानं ठरतात गुणकारी; अभ्यास सांगतात पेरुच्या पानांचे उपयोग

वाढलेली शुगर घटवण्यासाठी पेरूची पानं ठरतात गुणकारी; अभ्यास सांगतात पेरुच्या पानांचे उपयोग

How to Control Blood Sugar Level : NCBI च्या अहवालानुसार, पेरूच्या पानांचा औषधी गुणधर्मांमुळे अनेक देशांमध्ये औषध म्हणून वापर केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 12:59 PM2022-12-29T12:59:19+5:302022-12-29T17:56:57+5:30

How to Control Blood Sugar Level : NCBI च्या अहवालानुसार, पेरूच्या पानांचा औषधी गुणधर्मांमुळे अनेक देशांमध्ये औषध म्हणून वापर केला जातो.

How to control blood sugar level naturally ncbi study suggests guava leaves tea manage diabetes at home | वाढलेली शुगर घटवण्यासाठी पेरूची पानं ठरतात गुणकारी; अभ्यास सांगतात पेरुच्या पानांचे उपयोग

वाढलेली शुगर घटवण्यासाठी पेरूची पानं ठरतात गुणकारी; अभ्यास सांगतात पेरुच्या पानांचे उपयोग

डायबिटीस (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे जो वेगानं परसतो.  शुगर कंट्रोल करण्याचे बरेच उपाय परिणामाकारक ठरतात. (Blood Sugar)  यामुळे सतत लघवी येणं, तहान लागणं, जखम भरण्यासाठी वेळ लागणं यांसारखी गंभीर लक्षणं जाणवतात. डायबिटीसवर कोणतेही उपचार आलेले नाहीत. वाढलेली सारखेची पाकळी शरीरातील अनेक अवयवांना इजा पोहोचवू शकते. (How to control blood sugar level) तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांच्या सेवनानं साखरेची पातळी वाढत नाही. याशिवाय नियमित स्वरूपात व्यायाम करण्याचाही सल्ला दिला जातो. (How to control blood sugar level naturally ncbi study suggests guava leaves tea manage diabetes at home)

डायबिटीसचे घरगुती उपाय

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवून मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. यासाठी औषधांसोबत अनेक घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आहेत. पेरूची पाने हा देखील मधुमेहावरील घरगुती उपायांपैकी एक आहे. पेरूची हिरवी पाने मधुमेहावर कशी नियंत्रण ठेवू शकता ते समजून घेऊया.

NCBI च्या अहवालानुसार, पेरूच्या पानांचा औषधी गुणधर्मांमुळे अनेक देशांमध्ये औषध म्हणून वापर केला जातो. विशेषतः पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये, पेरूच्या पानांचा रस मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरला जातो. पेरूच्या पानांच्या रसामुळे काही प्राण्यांच्या मॉडेल्समध्ये अँटी-हायपरग्लायसेमिक गुणधर्म आढळून आले आहेत आणि यामुळेच पेरुचे सेवन रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यात मदत करू शकते. यामुळेच जपानसह अनेक देशांमध्ये पेरूच्या पानांचा चहा घेतला जातो.

पेरूच्या पानांचा चहा दीर्घकालीन उपचारांसाठी आहारोपचार म्हणून उपयुक्त मानला जातो. एका मानवी अभ्यासात असे आढळून आले आहे की पेरूच्या पानांच्या चहाचे प्रत्येक जेवणासोबत सतत सेवन केल्याने हायपोएडिपोनेक्टिनेमिया आणि हायपरग्लाइसेमिया सुधारतो. म्हणजे पेरूच्या पानांपासून चहा बनवून पिऊ शकता किंवा बाजारातून विकत घेऊ शकता.

पेरूची हिरवी पाने केवळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात असे नाही. तर त्यांच्या नियमित वापरामुळे अतिसारापासून बचाव होतो, कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, वजन कमी होते, कर्करोगाशी लढा मिळतो, दृष्टी आणि त्वचेचा पोत सुधारतो.

Web Title: How to control blood sugar level naturally ncbi study suggests guava leaves tea manage diabetes at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.