Join us   

वाढलेली शुगर कमी करण्यासाठी रामदेव बाबा सांगतात ४ सोपे उपाय; डायबिटीस राहील कायम नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 4:30 PM

How To Control Blood Sugar or Diabetes advice by baba Ramdev : आयुर्वेदिक उपायांनी रक्तातील साखर ठेवा नियंत्रणात

डायबिटीस ही भारतात गेल्या काही वर्षात वेगाने वाढत असलेली समस्या आहे. हा आजार नसून ती जीवनशैलीविषयक एक समस्या आहे. चुकीची आहारपद्धती, व्यायामाचा अभाव, वाढते ताणतणाव आणि जीवनशैलीतील इतर गोष्टी यांमुळे डायबिटीसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. समाजाच्या सर्व स्तरात सर्व वयोगटात वेगाने वाढणारा डायबिटीस भविष्यातील अनेक आजारांचे महत्त्वाचे कारण ठरत आहे. याबाबत वेळीच योग्य ती काळजी न घेतल्यास शरीरात बऱ्याच गुंतागुंती निर्माण होतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असेल तर यकृत, किडणी, हृदय यांच्या तक्रारी निर्माण वाढत जातात (How To Control Blood Sugar or Diabetes advice by baba Ramdev) .

हल्ली लहान वयात डायबिटीस होण्याचे प्रमाणही वाढले आहे. पूर्वी पन्नाशीत होणारी ही समस्या आता चाळीशीतच उद्भवते. अनेकदा डायबिटीस झाला हे लक्षातच येत नाही आणि मग एकाएकी कधीतरी आपल्याला ही समस्या असल्याचे कळते मात्र तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आपले शरीर आपल्याला काही लक्षणे दाखवत असते, मात्र आपण त्याकडे पुरेसे लक्ष न देता कानाडोळा करतो. त्यामुळे ही समस्या वेळीच लक्षात येत नाही आणि गुंतागुंत वाढत जाते. डायबिटीस नियंत्रणात ठेवायचा असेल तर आहार, व्यायाम, औषधोपचार या गोष्टींकडे योग्य पद्धतीने लक्ष द्यायला हवे. प्रसिद्ध योगगुरु बाबा रामदेव रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात येण्यासाठी काय करावे याबाबत काही महत्त्वाचे उपाय सांगतात ते कोणते पाहूया..  

(Image : Google)

१. आयुर्वेदिक औषधे

मधुग्रिट आणि मधुनाशिनी ही आयुर्वेदिक औषधे घेतल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र ही औषधे योग्य सल्ल्यानेच घ्यायला हवीत तसेच त्याबरोबरच व्यायाम करणेही अतिशय महत्त्वाचे आहे. 

२. आवळा 

आवळा अतिशय शक्तीशाली आयुर्वेदिक औषध आहे. या फळात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटस चांगल्या प्रमाणात असल्याने साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. दररोज न चुकता आपल्याला आवडेल त्या स्वरुपात आवळा खाल्ल्यास डायबिटीस नियंत्रणात राहतोच राहतो असे बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे. 

३. त्रिफळा चूर्ण 

त्रिफळा चूर्णात हरीतकी, आवळआ आणि बिभितकी अशा ३ गोष्टी असतात. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी आणि पोटाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. अँटीऑक्सिडंटस असलेले हे चूर्ण ताणतणाव कमी करण्यासही उपयुक्त ठरतात. त्रिफळा चूर्णचा वास आवडत नसेल तर त्याची टॅबलेटही घेऊ शकता.

 

४. ताक आणि कोरफड

कोरफड केस, त्वचा यांसाठी अतिशय फायदेशीर असते हे आपल्याला माहित आहे. पण कोरफडीच्या पानातील गर शुगर कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतो. यासाठी हा गर काढून तो ताकात मिसळून हे ताक प्यायल्यास चांगला फायदा होतो.             

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेहरामदेव बाबा