Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; हृदय राहील ठणठणीत

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; हृदय राहील ठणठणीत

How to control cholesterol : तुम्ही दिवसभरात जे काही खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावरही होतो. (How to control cholesterol)

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 10:57 AM2023-05-16T10:57:53+5:302023-05-16T13:41:28+5:30

How to control cholesterol : तुम्ही दिवसभरात जे काही खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावरही होतो. (How to control cholesterol)

How to control cholesterol : Cholesterol Control tips by yog guru baba ramdev | बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; हृदय राहील ठणठणीत

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; हृदय राहील ठणठणीत

जगभरात हार्ट अटॅकमुळे(Heart disease)  अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागतो. हृदयाशी संबंधित आजारांमुळे दरवर्षी जवळपास १७.९ लोकांचा मृत्यू होतो. अशा स्थितीत हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं असतं. तुम्ही दिवसभरात जे काही खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावरही होतो. (How to control cholesterol) फॅट्सयुक्त पदार्थांच्या अतिसेवनानं कोलेस्टेरॉल वाढते.

कोलेस्टेरॉल असा पदार्थ आहे. (How to Lower cholesterol Level) जो रक्ताच्या नसांना ब्लॉक करून शरीरातील ब्लड ब्लड फ्लो थांबवतो. यामुळे स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. योगगुरू बाबा रामदेव यांनी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. कोलेस्टेरॉल वाढल्यानं रक्ताच्या गुठळ्या होऊन नसांमध्ये रक्त जमा होतं. अनेकदा ब्लड वेसल्समध्ये ब्लॉकेजमुळे मेंदूपर्यंत पोहोचल्यानं हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. याशिवाय रोज एक ग्लास बीटरूटचा रस प्यायल्याने रक्तवाहिन्यांमधील जळजळ होण्याची लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते.  अंगाची रक्त वाढून कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

५ फळं आणि भाज्या रोज खा, कॅल्शियमचा खजाना-म्हातारपणातही शरीरातील सगळी हाडं राहतील ठणठणीत

रिसर्चनुसार हाय कोलेस्टेरॉल असलेल्या इतर रुग्णांच्या तुलनेत कोरोना इंफेक्शनंतर हार्ट अटॅकचे चान्सेस  २० टक्क्यांनी वाढले आहेत.  चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अनुवांशिकता, जास्त दारू पिणं, ताण-तणाव, वर्कआऊट न करणं,  जास्त प्रमाणत मीठाचे सेवन या गोष्टी कोलेस्टेरॉल वाढण्यास कारणीभूत ठरतात. 

बाबा रामदेव यांच्यामते सूर्यनमस्कार, ताडासन, मांडूकासन, पश्चिमोत्तनासन, गोमुखासन, हलासना, योग मुद्रा, पायाची मुद्रा, जॉगिंग या योगासनांनी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवता येतं.  ताडासनामुळे रक्ताभिसारण योग्य पद्धतीनं होतं, गुडघे मजबूत होतात, थकवा-ताणतणाव दूर होतो.  सुर्यनमस्कारानं शरीराला उर्जा मिळते. एनर्जी लेव्हल वाढते,  शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढून पचनतंत्रही सुधारते. 

कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खायचं काय टाळायचं?

जेवणात रिफाईंड अन्न म्हणजे  ब्रेड, पास्ता ऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी अशा धान्यांचा समावेश करा. हे पदार्थ फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्सनी परिपूर्ण असतात.  यामुळे कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. रोज एक चमचा आळशीचं सेवन केल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. याशिवाय हृदयाच्या आजारांचा धोका टळतो. रोज जवळपास ४ मोठे चमचे आळशीच्या बीया खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात.

सोया उत्पादने जसे की टोफू, टेम्पे आणि सोया दूध हे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहेत. त्यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.  रोज एक ग्लास बीटरूटचा रस प्यायल्याने रक्तवाहिन्यांमधील जळजळ होण्याची लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते. अंगातील रक्त वाढून कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Web Title: How to control cholesterol : Cholesterol Control tips by yog guru baba ramdev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.