हल्ली युरीक ॲसिड, वजन, काेलेस्ट्रॉल वाढलेल्या व्यक्तींची आकडेवारी खूप दिसून येते. अगदी कमी वयातच अनेकांना हा त्रास होतो. यासाठी बदललेली जीवनशैलीदेखील खूप जबाबदार आहे. पण तरीही आपण रोज ज्या काही चुका वारंवार करतो, त्यामुळेही तब्येतीवर परिणाम होतोच. त्यापैकीच एक चूक म्हणजे जेवणानंतर गटागट पाणी पिणे. बहुतांश लोक ही चूक करतात. जेवण झालं की ते जवळपास अर्धा लीटर पाणी अगदी सहज पितात. जेवण केल्यानंतर असं गटागट पाणी पिऊन तुम्हाला समाधान मिळत असलं तरी ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे (how much water can we have after meal?). त्याचे काय परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतात ते पाहा..(how to control cholesterol, weight gain and uric acid level?)
जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा भरपूर पाणी पिता का?
जेवण केल्यानंतर आपल्या जठराचं काम सुरू झालेलं असतं. अन्न पचविण्यासाठी मदत करणारे अनेक बॅक्टेरिया, पाचक रस जठरामध्ये तयार होत असतात. अशावेळी जर आपण भरपूर पाणी प्यायलो तर त्या पाण्यामुळे पाचक रस तयार होण्याचं काम थांबतं.
मुलं अजिबात ऐकत नाहीत-हट्टीपणा करतात? एक्सपर्ट सांगतात १ उपाय- मुलं ऐकतील- गुणी होतील
पचनक्रिया मंदावते. अन्नपचन व्यवस्थित होत नाही. न पचलेल्या अन्नामुळे मग शरीरात युरीक ॲसिड तयार होतं. शरीरातील बॅड कोलस्ट्रॉलचे प्रमाणही वाढते.. अन्नपचन चांगलं झालं नाही तर त्याचा परिणाम साहजिकच शरीरावर अतिरिक्त चरबीचे थर जमा होण्यात दिसून येतो. त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच गटागट पाणी पिऊ नये..
जेवल्यानंतर कधी पाणी प्यावं?
याविषयी तज्ज्ञ असं सांगतात की जेवताना किंवा जेवल्यानंतर खूप पाणी पिऊ नये. तुम्हाला तहान सहन होतच नसेल तर जेवणाच्या मध्ये अगदी घोट- घोट पाणी प्या.
कंटाळा येतो म्हणून एकदाच कणिक भिजवून फ्रिजमध्ये ठेवता? त्यापेक्षा शिळ्या पोळ्या खा, कारण....
असं थोडं थोडं पाणी पिणं पचनासाठी मदत करणारं असतं. शिवाय जेवण झाल्यानंतरही एखादा घोटभर पाणी प्या. त्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी थोडं थोडं करून प्या. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होतात.