Join us   

How to control diabetes : डायबिटीस नियंत्रणात ठेवतात रोजच्या वापरातील ४ पदार्थ; अचानक शुगर वाढण्याचा टळेल धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 11:40 AM

How to control diabetes : काही पारंपारीक पदार्थांचा घरगुती वापरात समावेश केल्यास या आजाराची तीव्रता कमी करता येऊ शकते. 

डायबिटीस (Diabetes lifestyle disease) हा जीवनशैलीशी निगडीत असलेला आजार असून याला सायलेंट किलर असंही म्हणतात.  खाण्यापिण्यातील बदल, राहणीमानात सुधारणा करून या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. (diabetes control tips)  ज्या लोकांच्या  शरीरात रक्तीतील सारखेचं प्रमाण जास्त असतं त्यांना औषध घेण्याची गरज भासते. याशिवाय काही पारंपारीक पदार्थांचा घरगुती वापरात समावेश केल्यास या आजाराची तीव्रता कमी करता येऊ शकते.  (Diabetes Care Tips)  डायबिटीस कसं नियंत्रणात ठेवता येऊ शकतं? (Easy Ways to Lower Blood Sugar Levels Naturally)

कडुलिंब

कडुलिंब आपल्या औषधी गुणधर्मांमुळे प्रसिद्ध आहे. शरीरातील विषारी पदार्थ काढण्यापासून दातांची स्वच्छता, त्वचेची काळजी असे कडुलिंबाचे अनेक फायदे आहेत. यात फ्लेवोनोइड्स, ग्लाइकोसाइड्स आणि ट्रायटरपेनोइड्स असतात ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. डायबिटीसच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं दिवसातून २ वेळा कडुलिंबाचे सेवन करायला हवे. 

 गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत देतात बायकांमध्ये जाणवणारी 'ही' लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय

आलं

प्रत्येकाच्यात स्वयंपाकघरात आलं असतंच. आल्यातील औषधी गुणधर्म शरीराला आतून उष्णता देण्यास प्रभावी ठरतात. आरोग्य तज्ज्ञांच्यामते आलं इंसुलिनस्त्राव नियंत्रणात ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. कच्चं आलं अधिक फायदेशीर ठरतं. दरम्यान आल्याचं अतिसेवन पोटासंबंधी आजाराचं कारण ठरू शकतं. म्हणून मर्यादित सेवन करायला हवं. 

मेथी

मेथीच्या गुणकारी फायद्यांबद्दल तुम्ही ऐकून असालच. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी फायदेशीर ठरते. ग्लूकोज टॉलरेंसला प्रभाव चांगला राहण्यास मेथीच्या सेवनानं मदत होते. यात डाएटरी फायबर्सचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पचन संथगतीनं होऊन साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. मेथीमधील प्रोबायोटिक्स गुण बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. 

किचनमधली काम संपता संपत नाहीत, रात्री खूप थकवा जाणवतो? ७ ट्रिक्स वापरा नेहमी टवटवीत, फ्रेश राहाल

दालचीनी

दालचीनीचं सेवन करून डायबिटीसला लांब ठेवता येऊ शकतं. दालचिनीमुळे जेवणाची चव तर वाढते. त्याचबरोबर इंसुलिन एक्टिव्हिटीवरही सकारात्मक परिणाम होतो.  दालचीनीचा चहा बनवून या चहाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. 

टॅग्स : मधुमेहआरोग्यहेल्थ टिप्स