कोलेस्टेरॉल हा शरीरातील एक महत्त्वाची घटक असून रक्तात असणारा हा मेणयुक्त पदार्थ निरोगी पेशींच्या निर्मितीसाठी गरजेचा असतो. असे असले तरी शरीरातील कोलेस्टेरॉल योग्य त्या प्रमाणातच असायला हवे. ही मर्यादा ओलांडल्यास शरीराचे नुकसान होऊ शकते. (How to Control High Cholesterol)कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल अशा दोन नावांनी ओळखले जाते. चांगल्या कोलेस्टेरॉलला एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) आणि बॅड कोलेस्टेरॉलला एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) म्हणतात. रक्तवाहिन्यांमध्ये या मेणासारख्या पदार्थाचे प्रमाण वाढते तेव्हा ते रक्त प्रवाह कमी होण्याची शक्यता असते. ज्यामुळे हृदयरोग, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे केव्हाही चांगले (Wheat grass can Decrease Bad Cholesterol and Increase good Cholesterol).
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात ठराविक गोष्टींचा अजिबात समावेश करु नये असे सांगितले जाते. मात्र कोणत्या पदार्थांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी चांगली राहू शकते याबाबतही आपल्याला माहिती असायला हवी. साधारणपणे गोड पदार्थ, जंक फूड, तळलेले, मसालेदार पदार्थ यांचा आहारात समावेश करु नये. या पदार्थांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. आता शरीरातील बॅढ कोलेस्टेरॉल बाहेर पडावे यासाठी नेमके काय करावे याबाबत आपल्याला माहिती असायला हवी. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर आपल्याला विविध प्रकारची औषधे देतात. मात्र त्याबरोबरच काही घरगुती उपाय केल्यास ही पातळी नियंत्रणात राहण्यास त्याचा निश्चितच चांगला उपयोग होतो.
करा हा १ उपाय...
व्हिटग्रास म्हणजेच गव्हांकुर हा कोलेस्टेरॉलवरील एक उत्तम उपाय आहे. शेतात गहू लावल्यानंतर त्याचे कोवळे अंकुर जे असतात त्यालाच गव्हांकुर म्हणतात. हे अंकुर आपण शेतातच नाही तर घरातही एखाद्या कुंडीत लावू शकतो. गव्हांकुरात असंख्य पोषक तत्त्व असून काही आजारांवर ते अतिशय उपयुक्त असते. अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरीयल, अँटीइन्फ्लमेटरी गुणधर्म असणारे गव्हांकुर आपल्या आहारात असायला हवे. याशिवाय यामध्ये आयर्न, कॅल्शियम, एंझाइम, मॅग्नेशियम, १७ अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन ए, सी, ई, के, बी कॉम्प्लेक्स, क्लोरोफील आणि प्रोटीन असते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन च्या अहवालानुसार, नियमितपणे गव्हांकुर खाल्ल्यास खराब कोलेस्टेरॉल कमी होते आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढते. यासोबतच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी गव्हांकुराचा अतिशय चांगला उपयोग होतो.