Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी फक्त १५ मिनिटं एक काम करा; दिवसभर शुगर कंट्रोल राहील, डॉक्टरांचा सल्ला

सकाळी फक्त १५ मिनिटं एक काम करा; दिवसभर शुगर कंट्रोल राहील, डॉक्टरांचा सल्ला

How to control sugar level : डायबिटीक रुग्णासाठी वजन कमी करणं खूप गरजेचं असतं. डान्स ही अशी एक्टिव्हीट आहे जी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 10:22 AM2023-05-13T10:22:46+5:302023-05-13T10:28:02+5:30

How to control sugar level : डायबिटीक रुग्णासाठी वजन कमी करणं खूप गरजेचं असतं. डान्स ही अशी एक्टिव्हीट आहे जी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

How to control sugar level : Easy Ways to Lower Blood Sugar Levels Naturally | सकाळी फक्त १५ मिनिटं एक काम करा; दिवसभर शुगर कंट्रोल राहील, डॉक्टरांचा सल्ला

सकाळी फक्त १५ मिनिटं एक काम करा; दिवसभर शुगर कंट्रोल राहील, डॉक्टरांचा सल्ला

वयस्कर लोकांमध्येच नाही तर तरूणांमध्येही डायबिटीस आजार वाढत आहे. या आजारात रुग्णाची ब्लड शुगर नियंत्रणात राहत नाही. दीर्घकाळ साखर वाढल्यानं  शरीराच्या विविध अवयवांचे नुकसान होते. त्रास जास्त वाढल्यास रुग्णांना सतत लघवी येणं, थकवा, धुसर दिसणं, वजन कमी होणं,  जखमा ठिक न होणं, किडनी खराब होणं अशी लक्षणं आणि समस्या उद्भवतात. डॉक्टर प्रीत पाल ठाकूर यांनी एका हिंदी वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार यात चिंतेचं काही कारण नाही. डायबिटीसला डाएट आणि एक्टिव्ह लाईफस्टाईलनं कंट्रोल करता येऊ शकतं. (Easy Ways to Lower Blood Sugar Levels Naturally)

डायबिटीक रुग्णासाठी वजन कमी करणं खूप गरजेचं असतं. डान्स ही अशी एक्टिव्हीट आहे जी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. डान्स केल्यानं शरीरातील ग्लूकोज लेव्हल कंट्रोल करता येते. डान्स करताना मांसपेशींमध्ये उर्जा मिळते आणि शरीराला या उर्जेचा उपयोग करण्यास मदत होते.

डान्स

डान्समुळे शरीरात एंडोर्फिनसारखे हार्मोन्स बाहेर पडतात, जे तुम्हाला आनंदी आणि तणावमुक्त बनवतात. तणाव वाढल्याने तुमची स्थिती आणखी वाईट होऊ शकते. इतकेच नाही तर नृत्यामुळे मानसिक आरोग्यही सुधारते, जे मधुमेही रुग्णांसाठी आवश्यक आहे. रोज डान्स केल्यानं शरीरातील रक्तपुरवठा चारही बाजूंनी व्यवस्थित होतो. ब्लड प्रेशर आणि लिपिड प्रोफाईल संतुलित राहते.

डान्स शरीरातील सेल्युलर ऊर्जेची पातळी वाढवते जी मधुमेही रुग्णांच्या शरीरातील ग्लुकोजचे व्यवस्थापन करते आणि त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करते. नृत्य केल्याने शरीराचा समतोल राखला जातो आणि रुग्णाचे वजनही कमी होते, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.

किती वेळ डान्स करायचा?

सकाळी 15 ते 20 मिनिटे डान्स केल्याने मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. रात्री डान्स करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डान्स करताना तुमच्या शरीराच्या संकेतांकडे लक्ष द्या आणि खूप थकल्यासारखे वाटत असल्यास लगेच ब्रेक घ्या.

Web Title: How to control sugar level : Easy Ways to Lower Blood Sugar Levels Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.