Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > युरिक ॲसिड कमी करतील ३ उपाय; शरीर होईल डिटॉक्स, कायम राहाल फिट

युरिक ॲसिड कमी करतील ३ उपाय; शरीर होईल डिटॉक्स, कायम राहाल फिट

How to Control Uric Acid : युरिक ॲसिड वाढल्यास तब्येतीच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 03:54 PM2023-03-06T15:54:53+5:302023-03-06T18:20:18+5:30

How to Control Uric Acid : युरिक ॲसिड वाढल्यास तब्येतीच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

How to Control Uric Acid : 3 exercise to manage high uric acid in blood to prevent gout and kidney stone | युरिक ॲसिड कमी करतील ३ उपाय; शरीर होईल डिटॉक्स, कायम राहाल फिट

युरिक ॲसिड कमी करतील ३ उपाय; शरीर होईल डिटॉक्स, कायम राहाल फिट

युरीक एसिड शरीरातलं असं कमेकिल आहे जे शरीराच्या आत तयार होतं. प्युरिनयुक्त खाद्यपदार्थांच्या अतिसेवनानं हे वाढते. युरीक एसिड वाढल्यास तब्येतीच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. रक्तात युरीक एसिड जमा होण्याच्या समस्येला हायपरयुरीसिमिया असं म्हटलं जातं. (How to control uric acid)

ज्यामुळे संधीवात, किडनीच्य समस्या  उद्भवतात. या युरीक एसिडमुळे सांधेदुखी, उदमरल्यासारखं वाटणं, सतत लघवी येणं, लघवीतून रक्त बाहेर येणं अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (3 exercise to manage high uric acid in blood to prevent gout and kidney stone)

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

Pubmed च्या रिसर्चनुसार जर तुम्ही कोणतीही औषधं न घेता युरीक एसिड शरीरातून बाहेर काढण्याच प्रयत्न करत असाल तर जीवनशैलीत बदल करायला हवा. व्यायाम करणं, ताण तणाव कमी घेणं वजन कमी करण्यास साहाय्यक ठरू शकतं.

हायपरयुरिसेमियाचे व्यवस्थापन करण्यासोबतच पोहणे मनालाही आराम देते. त्याच्या नियमित सरावाने शरीराचे संतुलन आणि मुद्रा सुधारू शकते. पोहण्यामुळे भरपूर कॅलरीज बर्न होतात, त्यामुळे वजन नियंत्रित ठेवता येते.

सायकल चालवणं हा एक उत्तम व्यायाम आहे, ज्यामुळे स्नायूंवर जास्त ताण पडत नाही. ज्यांना जास्त यूरिक ऍसिडचा त्रास आहे, त्यांनी दररोज काही वेळ सायकल चालवली पाहिजे. ही शारीरिक क्रिया करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही साधनांची किंवा विशेष सुविधांची आवश्यकता नाही. हा व्यायाम तुम्ही घराबाहेर, टेरेसवर, उद्यानात किंवा घराच्या आत करू शकता. याच्या मदतीने युरिक अॅसिड कमी करण्यासोबतच हृदयविकार आणि लठ्ठपणाही दूर करू शकता. 

युरीक एसिड कोणत्या पदार्थांनी तयार होतं?

सी फूड, मद्य अतिप्रमाणात घेणं, लाल मांस, आइस्क्रीम, सोडा, फास्ट फूड या पदार्थांच्या अति सेवनानं शरीरात युरीक एसिड तयार होतं. म्हणून कमीत कमी प्रमाणात युरीक एसिडचं सेवन करा.

Web Title: How to Control Uric Acid : 3 exercise to manage high uric acid in blood to prevent gout and kidney stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.