Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > युरिक ॲसिड वाढलंय, ५ पदार्थ खा- युरिक ॲसिड होईल कमी, दुखणंही येईल नियंत्रणात

युरिक ॲसिड वाढलंय, ५ पदार्थ खा- युरिक ॲसिड होईल कमी, दुखणंही येईल नियंत्रणात

How to Control Uric Acid : युरिक ॲसिड प्रमाण इतके वाढते की ते सांध्यामध्ये जमा होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 12:10 PM2022-10-08T12:10:45+5:302022-10-08T13:43:57+5:30

How to Control Uric Acid : युरिक ॲसिड प्रमाण इतके वाढते की ते सांध्यामध्ये जमा होते.

How to Control Uric Acid : According to harvard health include 5 foods in your diet to lower uric acid fast | युरिक ॲसिड वाढलंय, ५ पदार्थ खा- युरिक ॲसिड होईल कमी, दुखणंही येईल नियंत्रणात

युरिक ॲसिड वाढलंय, ५ पदार्थ खा- युरिक ॲसिड होईल कमी, दुखणंही येईल नियंत्रणात

युरिक ॲसिड  हा एक घातक पदार्थ शरीरात आढळतो. शरीर ते तयार करत नाही परंतु तुम्ही खात असलेल्या 'प्युरीन' तत्वाने समृद्ध असलेल्या पदार्थांद्वारे शरीरात साठवले जाते. काही खाद्यपदार्थ ज्यामध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते.  त्यांच्या अधिक सेवनानं शरीरातलं एकूणच युरिक ॲसिडचं प्रमाण वाढू शकतं. (According to harvard health include 5 foods in your diet to lower uric acid fast)

शरीरात युरिक ॲसिड  किती असावे? 

साधारणपणे शरीर तुमच्या मूत्रपिंड आणि लघवीद्वारे युरिक ॲसिड  फिल्टर करत असते, परंतु काहीवेळा त्याचे प्रमाण इतके वाढते की ते सांध्यामध्ये जमा होते. कधीकधी रक्तातील त्याचे प्रमाणही वाढते. युरिक ॲसिडची सामान्य श्रेणी 6.8 mg/dL पेक्षा कमी आहे.

जेव्हा युरिक ॲसिड  वाढते तेव्हा काय होते?

उच्च युरिक ॲसिड  पातळी (6.8 mg/dL वर), ज्याला वैद्यकीयदृष्ट्या हायपर्युरिसेमिया म्हणतात. यामुळे गाउट नावाचा रोग होऊ शकतो ज्यामुळे सांधे दुखतात ज्यामध्ये युरेट क्रिस्टल्स जमा होतात. हे तुमचे रक्त आणि लघवी अम्लीय बनवू शकते. हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार, यूरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी, तुम्ही खालील उपाय करून पाहायला हवेत.

प्रोटिन्सचा खजिना आहेत रोजच्या खाण्यातल्या ५ भाज्या; रोज खा, कायम हेल्दी, फिट राहा

लो फॅट डेअरी उत्पादनं

असे काही पदार्थ आहेत जे गाउट असलेल्या लोकांनी शक्य तितक्या मर्यादित किंवा पूर्णपणे टाळावेत. मात्र काही पदार्थ फायदेशीर ठरू शकतात. उदाहरणार्थ, अनेक अभ्यासांमध्ये कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ वापरणाऱ्या लोकांमध्ये यूरिक ऍसिडची पातळी कमी असल्याचे आढळून आले आहे. कॅल्शियम असलेली उत्पादने तुमच्या हाडांचे संरक्षण करण्यास तसेच वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.

ओमेगा ३ फॅट्स

सी फूड आक्रोडमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात जे निरोगी आहाराचा भाग असतात. पण काही सीफूडमध्ये प्युरीन्सचे प्रमाण जास्त असते. संधिरोग असलेल्या लोकांना मासे पूर्णपणे वर्ज्य करण्याची गरज नाही परंतु शेलफिश, सार्डिन आणि अँकोव्हीजचे प्रमाण मर्यादित केले पाहिजे कारण यामध्ये सर्वाधिक प्रमाणात प्युरीन असते. 

व्हिटामीन सी

अभ्यासातून असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन सी यूरिक ऍसिडची पातळी कमी करू शकते. लिंबूवर्गीय फळे आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले इतर पदार्थ (जसे की स्ट्रॉबेरी आणि मिरी) त्यांच्या आहारात समाविष्ट केल्याने संधिरोग असलेल्या लोकांना मदत होऊ शकते. काही रिसर्च असे सूचित करतात की चेरी खाल्ल्याने संधिरोगाचा त्रास कमी होतो आणि वेदना सुधारतात.

प्लांट बेस्ड फूड

आपण आपल्या आहारात वनस्पती आधारित पदार्थांचा समावेश करावा. याचा अर्थ असा की आपण अधिक फळे आणि भाज्या आणि शेंगांचे सेवन केले पाहिजे. या व्यतिरिक्त संपूर्ण धान्य देखील या श्रेणीत येते, ज्याचे सेवन जास्त करावे.

हार्ट अटॅकचे संकेत देतात साधी वाटणारी ४ लक्षणं; समजून घ्या बचावाचे उपाय, तब्येत राहील उत्तम

लीन प्रोटीन

चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे. विशेषत: तुम्ही कमी सॅच्युरेटेड फॅटचे सेवन केले पाहिजे. त्याऐवजी, शेंगा,पनीर, भाज्या, सोयाबीन या पदार्थांचा  आहारात समावेश करायला हवा. 

Web Title: How to Control Uric Acid : According to harvard health include 5 foods in your diet to lower uric acid fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.