Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > युरीक ॲसिड सारखं वाढतं? डॉक्टर सांगतात ५ सोपे उपाय, पपईचा चहा आणि कडूनिंबाची कमाल

युरीक ॲसिड सारखं वाढतं? डॉक्टर सांगतात ५ सोपे उपाय, पपईचा चहा आणि कडूनिंबाची कमाल

How To Control Uric Acid : आहारात आणि जीवनशैलीत बदल केल्यास हा त्रास नियंत्रणात राहू शकतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2023 10:16 AM2023-02-23T10:16:39+5:302023-02-23T13:23:56+5:30

How To Control Uric Acid : आहारात आणि जीवनशैलीत बदल केल्यास हा त्रास नियंत्रणात राहू शकतो..

How To Control Uric Acid : How does uric acid increase? Doctor says 5 simple remedies, health will remain strong... | युरीक ॲसिड सारखं वाढतं? डॉक्टर सांगतात ५ सोपे उपाय, पपईचा चहा आणि कडूनिंबाची कमाल

युरीक ॲसिड सारखं वाढतं? डॉक्टर सांगतात ५ सोपे उपाय, पपईचा चहा आणि कडूनिंबाची कमाल

युरीक ॲसिड ही आपल्या शरीरातील आवश्यक गोष्ट असते. हे जरी खरे असले तरी हे ॲसिड जास्त प्रमाणात वाढले किंवा कमी झाले तर शरीराच्या कार्यात अडथळे येतात. आपली मूत्रपिंडे युरिक अ‍ॅसिड नैसर्गिकरित्या बाहेर टाकू शकत नाहीत तेव्हा शरीरात या युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते. युरीक ॲसिड वाढण्यामागे बरीच कारणे असतात. पण वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही तर ही समस्या गंभीर होऊ शकते. जास्त वजन असणे, मधुमेह असणे, लघवीचे प्रमाण वाढवणारे पदार्थ घेणे आणि जास्त अल्कोहोलचे सेवन यांमुळे यामुळे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढण्याची शक्यता असते. युरीक ॲसिड वाढलं की गाऊट, सांधेदुखी, हृदयरोग, किडणीशी संबंधित समस्या उद्भवतात. आयुर्वेदिक डॉ. डिंपल जांगडा हे युरीक ॲसिड नियंत्रणात राहावे यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगतात, ते कोणते पाहूया (How To Control Uric Acid)...

१. त्रिफळा- त्रिफळा हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ "तीन फळे" असा होतो. नावाप्रमाणेच, हा एक हर्बल उपचार आहे ज्यामध्ये बिभिताकी, अमलाकी आणि हरितकी या तीन फळांचा समावेश आहे. या तीन फळांचे चूर्ण म्हणजेच त्रिफळा चूर्ण आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळते. त्रिफळामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने युरीक ॲसिड वाढण्याचा त्रास असेल तर हे चूर्ण आवर्जून घ्यायला हवे.

(Image : Google)
(Image : Google)

२. कडू औषधी वनस्पती - गिलोय, कडुनिंब, कारले यांसारखे चवीला कडू असणारे घटक युरिक ऍसिड कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे या गोष्टींचा रस घेतल्यास युरीक ॲसिड नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

३. चेरी आणि बेरी सारखी तुरट फळे- युरीक ॲसिड कमी होण्यासाठी विविध प्रकारच्या चेरीज आणि बेरीज उपयुक्त असतात त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करावा.

४. हळद -आले - आयुर्वेदात या दोन्हीही पदार्थांना बरेच महत्त्व असून विविध आजारांचा सामना करण्यासाठी हळद आणि आलं किंवा सुंठ पावडर आवर्जून वापरली जाते. 

५. पपईचा चहा - हिरवी पपई बारीक करून पाण्यात उकळा. हा चहा रिकाम्या पोटी फिल्टर करून प्या. पपईमध्ये "पपेन" हे एक प्रोटीओलाइटिक एन्झाईम असल्याने ती गाउट ग्रस्तांसाठी अतिशय चांगली असते. शरीराला अल्कलाईन लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि रक्तातील यूरिक ॲसिडचा प्रतिबंध करण्यासाठी ही पपई फायदेशीर असते.  

याबरोबरच दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि अल्कोहोलचे सेवन कमी करणे किंवा ते पदार्थ पूर्णपणे काढून टाकणे, नियमितपणे व्यायाम करा यांसारख्या गोष्टी केल्यास युरीक ॲसिड नियंत्रणात राहण्यास मदत होते. 


 

Web Title: How To Control Uric Acid : How does uric acid increase? Doctor says 5 simple remedies, health will remain strong...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.