Join us   

लिव्हरचा त्रास नको, शरीर निरोगी राहावं असं वाटतं? बाबा रामदेव सांगतात १ उपाय, लिव्हर होईल डिटॉक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 3:25 PM

Baba Ramdev Told Ayurvedic Remedies For Healthy Liver : हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते लिव्हरच्या समस्येचं सगळ्यात मोठं कारण चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी हे आहे.

लिव्हर आपल्या शरीरातील महत्वपूर्ण अवयवांपैकी एक आहे. ज्यामुळे पचनक्रिया, इम्यूनिटी, मेटाबॉलिझ्म चांगला राहतो.  याशिवाय शरीरातील पोषक तत्वांसाठी आवश्यक असते.  (Home Remedies To Naturally  Detox Liver) ज्यामुळे लिव्हरची हेल्थही चांगली राहते. फॅटी लिव्हर,  हाय बीपी, हाय कोलेस्टेरॉल आणि डायबिटीस  यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. (How to Detox Liver)

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते लिव्हरच्या समस्येचं सगळ्यात मोठं कारण चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी हे आहे. तुम्ही जे काही खाता-पिता ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. (Liver Detoxing Tips) लक्ष न दिल्यास लिव्हर खराब होण्याचाही धोका असतो. हे टाळण्यासाठी योग गुरू बाबा रामदेव यांनी काही उपाय सांगितले आहेत. (Easy Steps To Detox Your Liver)

रिसर्चनुसार यातील फायबर्समुळे पोट फुगणं,बद्धकोष्टता या तक्रारी दूर होतात.  ज्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते.  यात जवळपास ९६ टक्के पाणी असते. (Baba Ramdev Told Best Ayurvedic Home Remedies For Healthy Liver) ज्यामुळे शरीर थंड राहते. यात व्हिटामीन बी आणि सी  असते ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह एक्शन्स  सुरळीत होतात. ज्यामुळे ग्रे हेअर टाळण्यासही मदत होते. याशिवाय ताण-तणाव कमी होण्यासही मदत होते, याशिवाय हृदयाचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. दुधीचा ज्यूस लिव्हर मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतो.

पोटाची चरबी लटकतेय? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा १ उपाय, झरझर घटेल चरबी-स्लिम दिसाल

दुधीचा ज्यूस एका नॅच्युरल डिटॉक्सिफायरप्रमाणे काम करतो.  शरीरातील विषारी पदार्थ  बाहेर पडण्यास मदत होते लिव्हर चांगले राहते. बाबा  रामदेव यांच्यामते लिव्हरच्या संबंधित समस्या टाळण्यासाठी दुधीचा ज्यूस फायदेशीर ठरतो.  दुधी पौष्टीक गुणांनी परिपूर्ण असते, पचायलाही चांगली असते. ज्यामुळे लिव्हर मजबूत राहण्यास मदत  होते. 

घरच्याघरी दूधीचा रस कसा  करायचा?

बाबा रामदेव सांगतात की दुधीचा ज्यूस घरी बनवणं खूपच सोपं आहे.  हा ज्यूस बनवण्यासाठी २ चमचे गाईचं तूप गरम करून त्यात  हिंग, जिरं, ओवा, आलं, लसूण आणि कांदा फ्राय करून घाला. शेवटच्या टप्प्यात व्यवस्थित दुधी व्यवस्थित क्रश करून कढईत घाला काहीवेळ तसंच ठेवल्यानंतर थंड करून प्या. 

आयुर्वेदीक पद्धती फायदेशीर ठरतील

आयुर्वेदात पंचकर्म महत्वाचे मानले जाते लिव्हर शुद्ध करण्यासाठी या पद्धती प्रभावी ठरतात. याव्यतिरिक्त त्रिफळा, कडुलिंबाची पानं, मेथीच्या बिया लिव्हरची साफ-सफाई करण्यास फायदेशीर ठरतात. लसूण आणि कांद्यात आयुर्वेदीक गुण असतात. ज्यामुळे लिव्हर हेल्दी राहण्यास मदत होते. ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि पचनक्रिया चांगली राहते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलरामदेव बाबा