Join us   

शरीरातील नको असलेली टॉक्सिन्स बाहेर काढण्याचा १ सोपा उपाय; पचन सुरळीत, राहाल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2022 11:58 AM

How to Detox your Body Easy Home Made Recipe : शरीरात असणारे विविध धातू, टॉक्सिन्स अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. या गोष्टी शरीरातून बाहेर पडल्या तरच आपली पचनसंस्था आणि एकूण आरोग्य चांगले राहू शकते.

ठळक मुद्दे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठीही हा ज्यूस फायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हा ज्यूस तयार होत असल्याने तो करायला अतिशय सोपा आहे

आपण सकाळी उठल्यापासून वेगवेगळे पदार्थ खातो आणि काही ना काही पेय पितो. हे सगळे आपल्या शरीराला आवश्यक असतेच असे नाही. शरीराला आवश्यक असणाऱ्या घटक शरीर घेते आणि अनावश्यक घटक लघवी आणि विष्ठेच्या माध्यमातून बाहेर टाकले जातात. या दोन्ही क्रिया व्यवस्थित असल्या की आपले शरीर स्वच्छ होते किंवा निरोगी आहे असे आपल्याला वाटत राहते. मात्र या दोन्ही गोष्टींशिवायही अनेक घटक शरीरात असतात. जे घटक शरीराबाहेर पडले नाहीत तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. यामध्ये शरीरात असणारे विविध धातू, टॉक्सिन्स अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. या गोष्टी शरीरातून बाहेर पडल्या तरच आपली पचनसंस्था आणि एकूण आरोग्य चांगले राहू शकते. आता या गोष्टी बाहेर काढायच्या तर काय करायचं असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी एक अतिशय सोपा उपाय सांगतात. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला असून एक सोपे पेय प्यायल्यास बॉडी डीटॉक्स होण्यास मदत होते असे त्या सांगतात (How to Detox your Body 1 Easy Home Made Recipe Coriander Juice). 

तर कोथिंबीरीचा ज्यूस हा त्यावरचा रामबाण उपाय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा ज्यूस कसा करायचा आणि त्याचा शरीराला कसा फायदा होतो याविषयी अंजली यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. कोथिंबीरीचा ज्यूस हा फक्त चवीलाच चांगला लागतो असं नाही तर आरोग्यासाठीही तो अतिशय उपयुक्त असतो असं त्या सांगतात. पचनासाठी हा कोथिंबीर ज्यूस अतिशय चांगला असतो. तसेच शिसं, अॅल्यूमिनिअम, कॅडमिअम आणि अर्सेनिक, पारा यांसारखे धातू शरीराच्या बाहेर टाकण्यासाठीही याचा अतिशय चांगला उपयोग होतो. तसेच शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठीही हा ज्यूस फायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आरोग्याच्या अतिशय महत्त्वाच्या समस्यांवरील हा एक सोपा उपाय असून त्याचा अवलंब करायला हवा असे अंजली यांचे म्हणणे आहे. 

कसा करायचा कोथिंबीर ज्यूस ? 

१. २ वाट्या कोथिंबीर घेऊन त्याची मिक्सरवर बारीक पेस्ट करुन घ्या. 

२. त्यात १५० मिलीग्रॅम पाणी घाला. 

३. यामध्ये चिमूटभर जीरे पावडर आणि खडे मीठ घाला.

४. यात एका लिंबाचा रस घाला. 

५. चांगले हलवून घ्या, हा ज्यूस प्यायला तयार होईल.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल