Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > How To Drink Water : केस गळणं, कॉन्स्टिपेशनचं कारण ठरतंय चुकीच्या पद्धतीनं पाणी पिणं;  समजून घ्या योग्य पद्धत

How To Drink Water : केस गळणं, कॉन्स्टिपेशनचं कारण ठरतंय चुकीच्या पद्धतीनं पाणी पिणं;  समजून घ्या योग्य पद्धत

How To Drink Water : तज्ज्ञ प्रशांत यांच्या मते, बहुतेक लोक घाईघाईने पाणी पितात. काही लोक धावताना किंवा चालतानाही पाणी पितात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 04:37 PM2022-10-21T16:37:57+5:302022-10-21T17:16:51+5:30

How To Drink Water : तज्ज्ञ प्रशांत यांच्या मते, बहुतेक लोक घाईघाईने पाणी पितात. काही लोक धावताना किंवा चालतानाही पाणी पितात.

How To Drink Water : 85 percent people drink water wrongly know how to drink water by expert leads to hair fall and constipation | How To Drink Water : केस गळणं, कॉन्स्टिपेशनचं कारण ठरतंय चुकीच्या पद्धतीनं पाणी पिणं;  समजून घ्या योग्य पद्धत

How To Drink Water : केस गळणं, कॉन्स्टिपेशनचं कारण ठरतंय चुकीच्या पद्धतीनं पाणी पिणं;  समजून घ्या योग्य पद्धत

पाण्याशिवाय जगण्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि चांगल्या तब्येतीसाठी भरपूर पाणी पिणं खूप महत्वाचं असतं. (Drinking water benefits) अष्टांग सराव करणारे आणि प्राणायम प्रशिक्षक प्रशांत यांनी दिलेल्या माहितीनुसार ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लोक चुकीच्या पद्धतीनं पाणी पितात. यामुळे हेअर फॉल, गॅस सारखे आजार उद्भवतात. ( 85 percent people drink water wrongly know how to drink water by expert leads to hair fall and constipation)

पाणी पिण्याची योग्य पद्धत

आपण कोणत्याही प्रकारे किंवा कोणत्याही स्थितीत कधीही पिऊ शकत नाही. त्यामुळे पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती, चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने काय समस्या येतात, पाणी कसे प्यावे, पाणी कधी प्यावे, दिवसातून किती पाणी प्यावे हे माहित असायला हवं.

उभं राहून पाणी पिण्याची पद्धत चुकीची 

तज्ज्ञ प्रशांत यांच्या मते, बहुतेक लोक घाईघाईने पाणी पितात. काही लोक धावताना किंवा चालतानाही पाणी पितात. पण असे केल्याने तुमची किडनी खराब होऊ शकते. कारण, या स्थितीत किडनी पाणी फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे किडनीमध्ये सूज येण्यासारखी समस्या उद्भवते आणि शरीरातील द्रव संतुलन बिघडते. द्रव संतुलन बिघडल्याने सांधेदुखी किंवा संधिवात होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, बसून पाणी प्यावे. शक्य असल्यास, पाणी पिण्याची सर्वोत्तम स्थिती म्हणजे स्क्वॅट स्थिती. या स्थितीत मूत्रपिंड संतुलित आणि आराम करतात. कारण, त्यांना नितंब आणि पायाचा आधार मिळत आहे. या स्थितीत पोटाचे स्नायू देखील शिथिल असतात.

वेगात पाणी पिऊ नका

जलद पाणी प्यायल्याने शरीर पाणी योग्यरित्या शोषून घेत नाही आणि बाहेर टाकू शकत नाही. अशा प्रकारे तुम्हाला पाणी पिण्याचे फायदे मिळत नाहीत. याशिवाय जलद पाणी प्यायल्याने त्याचे पचनही होत नाही. पाणी पचत नसल्याने पोटदुखी, गॅस, पोट फुगणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे पाणी एक एक घोट करून प्यावे.

फ्रिजचं ठंड पाणी पिऊ नका

फ्रिजचं पाणी प्यायल्यानं घसा बसू शकतो. याशिवाय खोकला, कफची समस्या उद्भवते. थंड पाणी प्यायल्यानं रक्तवाहिन्या आकुंचन पावतात यामुळे पचनक्रिया खराब होऊ शकते. खाण्यासोबत थंड पाणी प्यायल्यानं फॅट्सचे प्रमाण वाढते. यामुळे सांधेदुखी, हृदयाचे आजार उद्भवतात. म्हणून कोमट पाणी तांब्याच्या भांड्यात प्या.

पाणी कधी प्यायचं?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हाही तहान लागते तव्हा पाणी प्या. सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याची सवय कधीही उत्तम. सकाळी उठल्यानंतर १ ते २ ग्लास पाणी प्या. जेवणाच्या ३० ते ४० मिनिटं आधी पाणी प्या. आणि जेवल्यानंतर ४० मिनिटांनी पाणी प्या. (When to drink water before or after meal)

एका दिवसातील तुमची पाण्याची गरज तुमचे वय, लिंग, शारीरिक हालचाली, उंची इत्यादींवर अवलंबून असते. व्यक्तीने दररोज सरासरी 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. तुम्हाला फळे आणि भाज्यांमधूनही पाणी मिळेल. त्यामुळे पाण्याचे आवश्यक प्रमाण जाणून घेण्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

Web Title: How To Drink Water : 85 percent people drink water wrongly know how to drink water by expert leads to hair fall and constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.