Join us   

वजन कमी करण्याासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत पाहा; वजन घटेल-पोटही साफ राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 4:54 PM

How to Drink Water Correctly In a Day : पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी पाणी पिण्याच्यावेळेबद्दल अधिक माहिती दिली आहे.

शरीर निरोगी राहण्यासाठी पाणी पिणं फार महत्वाचे असतं. डॉक्टरसुद्धा शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. (Health Tips) आयुर्वेदानुसार  एका जागेवर बसून पाणी व्यवस्थित घोटून घोटून प्यायला हवं. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रात रहाते आणि शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत पाणी पिण्याचे बरेचसे नियम आहेत. पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी पाणी पिण्याच्यावेळेबद्दल  अधिक माहिती दिली आहे.(How to Drink Water Correctly In a Day)

पाणी पिण्याची योग्यवेळ कोणती? (Right Time To Drink Water)

हेल्थएक्सचेंजच्या रिपोर्टनुसार झोपतून उठल्यानंतर, जेवणाच्या काहीवेळ आधी पाणी पिणं, जेवणाच्या आधी पाणी पिणं, अंघोळीच्याआधी आणि झोपण्याच्या आधी पाणी पिणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं. तुम्हाला जेव्हाही तहान लागेल तेव्हा पाणी प्यायलाच हवं. 

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?  (What Is Right Way To Drink Water)

एक्सपर्ट्सच्या मते सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी प्यायला हवं. सकाळी रिकाम्या पोटी १ ते २ ग्लास पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर कधीच थंड पाणी पिऊ नका. कोमट पाणी प्यायला हवं किंवा पाणी रूम टेंम्परेचरवर असायला हवं. ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट चांगला राहतो आणि टॉक्सिन्स कमी होण्यास मदत होते. (केस खूपच पातळ झालेत? दाट-लांब केसांसाठी खा 'हे' ५ आंबट पदार्थ, पटापट वाढतील केस)

जेवणाच्या अर्धा तास आधी नक्कीच पाणी प्या. ज्यामुळे टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि डायजेस्टिव्ह सिस्टिम चांगली राहते.  खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते. अंघोळीच्या आधी कोमट पाणी नक्की प्या. ज्यामुळे हार्ट  अटॅक येण्याचा धोका कमी होतो आणि मूडही चांगला राहतो.

आलिया सांगतेय तिच्या ग्लोईंग त्वचेचं सोपं सिक्रेट; ६ स्किन केअर टिप्स; नाजूक-सुंदर दिसेल चेहरा

उभं राहून घाईघाईत पाणी पिऊ नका. जर तुम्ही जेवताना पाणी प्यायलात तर गॅस्ट्रिक ज्यूस आणि पोटातील एसिड पातळ होत जाते.  ज्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो. न्युट्रिएंट्स एब्जॉर्ब करणं कठीण होतं. प्लास्टीकच्या बॉटलने पाणी प्यायल्याने हॉर्मोनल संतुलन बिघडते.  दिवसभरातून ८ ते १० ग्लास पाणी प्यायलाच हवं ज्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. पाणी कमी प्यायल्याने कमकुवतपणा आणि थकवा जाणवतो. 

टॅग्स : हेल्थ टिप्सलाइफस्टाइल