वाढत्या वयात शरीराला पोषण मिळण्यासाठी हेल्दी पदार्थांचे सेवन करणं गरजेचं असतं. हाडांना कॅल्शियम मिळाले तर ते कमकुवत होऊ लागतात. (Ragi For Strong Bones) रोजच्या खाण्यात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा अभाव असल्यास हाडं कमकुवत होतात. खाण्यात कॅल्शियमने परिपूर्ण दूध आणि डेअरी उत्पादनांचा समावेश करायला हवा. (How To Eat High Calcium And Protein Rich Finger Millet Or Ragi to Strengthen 206 Bones And Muscles)
रिसर्चनुसार नाचणीच्या पिठात हाय प्रोटीन आणि हाय फायबर्स असतात. नाचणी ही पूर्णपणे ग्लुटेन फ्री असून कॅल्शियमचा एक उत्तम नॉन डेअरी सोर्स आहे. मिलेट नॅच्युरली ग्लुटेन फ्री, ग्रेट अल्टरनेटिव्ह आहे. (Ref) याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. यामुळे ब्लॉटींगची समस्या उद्भवत नाही. वजन कमी करण्यासााठी तुम्ही नाचणीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.
हाडांना मजबूत कसे बनवावे?
काही लोकांना लॅक्टोज इन्टॉलरेंट असतो. ज्यांना दूध किंवा दूधापासून बनवलेल्या पदार्थांची एलर्जी असते त्यांनी आहारात कॅल्शियमसाठी पर्यायी पदार्थ खायला हवेत ज्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. नाचणीत कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. नाचणी कोणत्या पद्धतीने खावी हे समजूनन घ्यायला हवं. नाचणीत जवळपास ३४४मिलीग्राम कॅल्शियम असते. कॅल्शियम हाडांच्या मजबूतीसाठी महत्वाचे असते.
दूध-दही पित नसाल तर नाचणीचे सेवन करा. नाचणीत फायटोकेमिकल्स असतात. ज्यामुळे पचनसंथ होते. यामुळे ग्लुकोजसुद्धा हळूहळू रक्तात पोहोचते. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. मधुमेहांच्या रुग्णांसाठी एक उत्तम डाएट आहे. ज्यामुळे किडनी खराब होण्याचा धोका कमी होतो.
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर नाचणीचे सेवन करा. ज्यामुळे एनिमियाचा धोका कमी होतो. यात आयर्न मोठ्या प्रमाणात असते. ज्यात रेड ब्लड सेल्सचे उत्पादन वाढते. कमकुवतपणा आणि थकवा दूर होतो. प्रोटीन आणि हेल्दी कार्ब्स असतात. ज्यामुळे मसल्स वाढू लागतात आणि कमकुवतपणा दूर होतो. ज्यामुळे शरीर मजबूत राहते. नाचणीच्या सेवनाने मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. स्ट्रेस, एंग्जायटी आणि डिप्रेशन होतअसेल तर मिलेट्सचे सेवन करा. ज्यामुळे शरीर आणि मेंदू रिलॅक्स राहण्यास मदत होते.