Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गुडघे- कंबर खूपच दुखते? ५ मिनिटांत करा हेल्दी रेसिपी, चाळिशीनंतरही सांधे दुखणार नाहीत

गुडघे- कंबर खूपच दुखते? ५ मिनिटांत करा हेल्दी रेसिपी, चाळिशीनंतरही सांधे दुखणार नाहीत

How To Eat Superfoods To Make Bones And Joints : ५ मिनिटांत एक हेल्दी रेसिपी बनवा ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:30 IST2024-12-05T12:09:07+5:302024-12-05T14:30:27+5:30

How To Eat Superfoods To Make Bones And Joints : ५ मिनिटांत एक हेल्दी रेसिपी बनवा ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळेल.

How To Eat Superfoods To Make Bones And Joints Strong Naturally Calcium Rich Foods | गुडघे- कंबर खूपच दुखते? ५ मिनिटांत करा हेल्दी रेसिपी, चाळिशीनंतरही सांधे दुखणार नाहीत

गुडघे- कंबर खूपच दुखते? ५ मिनिटांत करा हेल्दी रेसिपी, चाळिशीनंतरही सांधे दुखणार नाहीत

हिवाळा (Winter) सुरू होताच महिलांमध्ये सांधेदुखीच्या वेदना वाढतात. खासकरून वयस्कर लोकांमध्ये गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास उद्भवतो तुम्हालाही असा त्रास होत असेल तर काही सोप्या  गोष्टी फॉलो करून तुम्ही तब्येतीच्या समस्य टाळू शकता. (How To Eat Superfoods To Make Bones) ५ मिनिटांत एक हेल्दी रेसिपी बनवा ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळेल. (Bones And Joints Strong Naturally Calcium Rich Foods)

ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही. फक्त ४ हेल्दी वस्तू मिसळून झटपट एक हेल्दी रेसिपी बनवावी लागेल. यामुळे वेदना कमी होतील आणि तुमची तब्येतही चांगली राहील. (How To Eat Superfoods To Make Bones And Joints Strong Natutally Calcium Rich Foods)

आईची तब्येत तुमची जबाबदारी

लहानपणी आपण जेव्हा आजारी असायचो तेव्हा आईला रात्रभर जागावे लागत होते. आपल्याला जराही त्रास झाला तर आई  अस्वस्थ व्हायची, आता आईचे वय वाढत चालले आहे. आईची काळजी घेणं मुलांची जबाबदारी आहे, घरातल्या कामांचा आईला थकवा येतो ज्यामुळे सांध्यांमध्ये वेदना जाणवतात. सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी काही सुपरफूड्स खाऊ घालायला हवेत ज्यामुळे वेदनांपासून आराम मिळेल.

मेनोपॉज सुरू होताच महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन हॉर्मोनचा स्तर कमी होऊ लागतो. या कारणामुळे महिलांची हाडं कमकुवत होऊ लागतात आणि सांध्यांचे दुखणं सुरू होते. ज्यामुळे त्यांना थकवा, उदास वाटणं, हताश होणं अशी लक्षणं जाणवतात. याच वयात महिला ऑस्टिओपॅरोसिस या आजाराचे शिकार होतात. यावेळी महिलांची योग्य देखभाल, योग्य आहार, योग्य लाईफस्टाईल आणि फिटनेसकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. हाडांना मजबूत बनवण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहार फार महत्वाचा असतो.

महिलांनी वयाच्या चाळिशीनंतर ४ सुपरफूड्चा आहारात समावेश करायला हवा. या सुपरफूड्समुळे हाडं कमजोर होत नाहीत आणि महिला सांधेदुखीच्या वेदनांपासून बचाव होतो. ओमेगा ३ फॅटी एसिड्सने परिपूर्ण अक्रोड मेंदूसाठी उत्तम ठरते.  ज्यामुळे शरीराची  सूज कमी होते महिलांना मूड स्विंग्स होत नाही. फायबर्स, कार्ब्सने परिपूर्ण रताळे खाल्ल्यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये येते आणि शरीराची उर्जा वाढते.

दह्यातील प्रोटीन आणि प्रोबायोटिक गट हेल्थ दुरूस्त करते. यामुळे मूड चांगला राहतो आणि शरीराची सूज कमी होतो. डाळिंबात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. यातील इस्ट्रोजन हॉर्मोन लेव्हल कंट्रोल होण्यास मदत होते आणि सांध्याच्यां वेदनांपासून आराम मिळतो ताण-तणाव दूर होण्यासही मदत होते.


सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी सुपरफूड्सची ही रेसिपी ट्राय  करा. सगळ्यात आधी एक वाटीत दही घ्या. त्यात उकडलेले रताळ्याचे तुकडे घाला त्यात अक्रोड मिसळा. नंतर डाळिंबाचे दाणे घाला. या रेसिपीला चटपटीत बनवण्यासाठी तुम्ही यात चाट मसाला मिक्स करू शकता. प्रोटीन, हेल्दी फॅट आणि एंटी ऑक्सिडेंट्सची परिपूर्ण ही रेसिपी ट्राय केल्यास हाडांना बळकटी येईल आणि एनर्जेटीक वाटेल. 

Web Title: How To Eat Superfoods To Make Bones And Joints Strong Naturally Calcium Rich Foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.